Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 31, 2018

पेटीएम मॉलचा ‘महा कॅशबॅक दिवाळी सेल’


 मुंबई । प्रतिनिधी 
जर तुमची सुरुवातीसच दिवाळी सेलचा लाभ घेण्याची संधी हुकली असेल, किंवा दिवाळीची काही खरेदी अजून बाकी राहिली असेल, तर तुमच्याकडे एक सुवर्ण संधी चालून  येत आहे, कारण पेटीएम मॉलचा ‘महा कॅशबॅक दिवाळी सेल’ 1 नोव्हेंबर ते 7 नोव्हेंबरपर्यन्त पुन्हा असणार आहे.
शून्य शुल्काने इएमआय आणि एक्स्चेंजमार्फत कोट्यावधीचे कॅश बॅक, मोफत डिलिव्हरी आणि इन्स्टॉलेशन, वैकल्पिक वाढीव वॉरंटी आणि किफायतशीरपणा यांच्याद्वारे ग्राहकांना खुश करण्याची एकही संधी कंपनी सोडणार नाही आहे. सहा दिवसांच्या या सेलमध्ये दैनिक मर्यादित कालावधीचे फ्लॅश सेल आणि रात्री  8 ते 12 या वेळेत घसरलेल्या किंमतींचे ‘गोल्डन अवर्स’, परस्पर संवादी गेम्स आणि त्यासोबत प्रत्येक तासाला सोने आणि 7 रेनो क्विड कार जिंकण्याची संधी असणार आहे. 
3000 रुपयांच्या किमान ऑर्डर वर अ‍ॅक्सिस बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास 2500 रुपयांपर्यंत 10 टक्के अतिरिक्त कॅश बॅक मिळेल. ही ऑफर क्रेडिट कार्ड इएमआय व्यवहारांवर देखील लागू आहे.
Share:

मुलींचा ठाणे संघ मिनी रोल बॉल स्पर्धेत प्रथम


 कल्याण । प्रतिनिधी 
10 वी राज्यस्तरीय मिनी रोल बॉल (अंडर 11) चॅम्पियनशीप 2018 धामणगाव यवतमाळ येथे आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांनी यात सहभाग घेतला होता. यात मुलींच्या ठाणे संघाने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. तर मुलांच्या ठाणे जिल्हा संघाने तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदकावर आपले नाव कोरले.
या विजयी संघामध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, वाणी विद्यालय, लुड्स हायस्कूल या शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमधील दिव्या सिंग या विद्यार्थिनीला उत्कृष्ट खेळाडू होण्याचा मान मिळाला असून तिच्या या यशात शाळेतील प्राचार्य, मुख्याध्यापक यांचा मोठा सहभाग आहे. या यशाबद्दल कल्याण स्पोर्ट्स अ‍ॅण्ड फाईन आर्ट्स या संस्थेचे माजी नगरसेवक संजय पाटील यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
Share:

पर्रिकर यांची निवासस्थानी कॅबिनेट बैठक


 पणजी । वृत्तसंस्था 
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्यांच्या निवासस्थानी कॅबिनेट बैठक आयोजित केली होती. ‘गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड’च्या या बैठकीमध्ये पर्रिकर यांनी अनेक प्रकल्पांवर चर्चा केली. बैठकीमध्ये माहिती व तंत्रज्ञानमंत्री रोहन खौंटे, पर्यटनमंत्री मनोहर अजगांवकर यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. 
मनोहर पर्रिकर यांच्यावर दिल्लीतील ‘एम्स’ रुग्णालयात अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. आपल्या आजारपणामुळे पर्रिकर अनेक दिवसांपासून राजकीय जीवनातून अलिप्त होते. यावरून बर्‍याच चर्चा होताना दिसत होत्या. गोव्यातील सरकार बरखास्त करून नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात, अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आली होती.
दरम्यान, मनोहर पर्रिकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग झाला आहे, अशी माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी नुकतीच दिली. तसेच त्यांना एम्समधून त्यांच्या निवासस्थानी आणून तेथेच उपचार सुरू असल्याचेही राणे यांनी सांगितले होते.
Share:

वैज्ञानिक संशोधनाचे फायदे सामान्यांपर्यत पोहोचवा नवी दिल्ली । वृत्तसंस्था 
विज्ञानातील संशोधनाची उपयुक्तता फक्त संशोधन केंद्र व प्रयोगशाळेपुरती मर्यादीत न राहता, त्याचा फायदा लोकांपर्यंत पोहचायला हवा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी केले. ते भारत-इटली टेक्नॉलॉजी समिटमध्ये बोलत होते.भारतात डिजीटल पेमेंटची वाढ वेगाने होत असून याचा वेग महिन्याला 250 कोटी व्यवहार असा आहे. भारतात गेल्या 4 वर्षांत 1 जीबी डेटाची किंमत 90 टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. त्यानुसार आमचे ध्येय आहे की, संशोधन आणि विकास कार्यक्रम हे केवळ संशोधन केंद्रांपर्यंत मर्यादित स्वरुपात न राहता लोकांपर्यंत पोहोचायला हवेत, असे ते म्हणाले.
इटलीचे पंतप्रधान ज्युसेपे कॉन्टे यांचे एक दिवसीय भारत दौर्‍यावर मंगळवारी नवी दिल्लीत आगमन झाले. या दौर्‍यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. कॉन्टे हे भारत-इटली टेक्नॉलॉजी समिटमध्ये भाग घेण्यासाठी आपल्या उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासोबत भारतात आले आहेत. दरम्यान, त्यांनी पंतप्रधान मोदींसह व्यापार, शिक्षण, अरोस्पेस, आरोग्य आणि गुंतवणूक अशा महत्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढीबाबत चर्चा केली.
भारतात जन्म दाखल्यापासून निवृत्तीनंतर पेन्शनपर्यंतच्या अनेक सुविधा आज तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाइन करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर 300 पेक्षा अधिक केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवांना उमंग या अ‍ॅपच्या माध्यमातून एकाच प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले आहे. देशातील 3 लाखांपेक्षा अधिक कॉमन सर्विस सेंटर्सद्वारे गावागावांत ऑनलाइन सेवा देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
Share:

कनेक्शन नको गॅस मोफत द्या!

चित्रा वाघ यांची सरकारकडे मागणी

  खोपोली । प्रतिनिधी
मोदी सरकारने घराघरात गॅस कनेक्शन दिले मात्र, गॅस कनेक्शनने पोट भरणार नाही. महागाईमुळे सामान्यांना भीक मागण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मोफत एलपीजी गॅस द्याय 2019 ला ही सत्ता पुन्हा येता कामा नये, अशी घणाघाती टिका महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. त्या महिला मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होत्या. 
सोमवारी कर्जत दहिवली यशदा मंगल कार्यालयात खास महिलांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कर्जत, नेरळ, माथेरान, खोपोली, खालापूरमधून तमाम महिलांनी उपस्थिती दर्शवून राष्ट्रवादीचा अजेंडा कायम राहणार असल्याचे दाखवून दिले आहे. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा चित्रा वाघ, जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, मतदार संघ आमदार सुरेश लाड, माजी नगराध्यक्ष दत्ता मसुरकर, रायगड जिल्हा अध्यक्ष दीपिका चिपळूणकर, प्रदेश सरचिटणीस हिराताई दुबे, कर्जत विधान सभा संघटक प्रतीक्षा लाड, जिल्हा परिषद बालकल्याण सभापती उमा मुंढे, रेखा दिसले, उपाध्यक्षा भावना पाटील, नगराध्यक्षा रजनी गायकवाड, सुमन ओसरमन, शहर अध्यक्षा स्मिता पतंगे, सरपंच रुचिता लाँगले, वंदना थोरवे, पूजा थोरवे स्मिता खेडकर, तनुजा गायकवाड आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share:

महिलांनी सुरक्षेबाबत जागरूक राहणे आवश्यक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांचे महिलांना मार्गदर्शन

 कल्याण । प्रतिनिधी
महिलांवरिल अत्याचार, लैंगिक छळ आणि फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत. त्यामुळे महिलांनी आपल्या सुरक्षेबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे मत महात्मा फुले पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी व्यक्त केले.  महिला सुरक्षिततेबाबत महात्मा फुले पोलीस ठाण्यात सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
सभेत महिला पोलीस, वकील, डॉक्टर, पत्रकार, राजकीय क्षेत्रातील महिला, समाजसेविका, नगरसेविका आदी महिला यावेळी सभेला उपास्थित होत्या. अ‍ॅड. सारिका शेलार यानी महिलांसंबंधित कायद्याची माहिती सांगितली. तसेच आई वडिलांनी मुलांशी सुसंवाद साधणे आवश्यक आहे. एखादा गुन्हा घडत असेल तर त्याची माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे आवश्यक आहे, असे सांगत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अ‍ॅड. सारिका यांनी महिलांसाठी काम करणार्‍या समिती आणि संस्था यांची माहिती देखील दिली. तर घरातून बाहेर जाताना महिलांनी आपण स्वतः सुरक्षित कसे राहू शकते याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच बाहेर जाताना, मोर्निग वॉकला जाताना मौल्यावान वस्तू व दागिने परीधान करू नये असे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक बाविस्कर यांनी उपस्थितांना केले. यावेळी मनसे प्रदेश सचिव उर्मिला तांबे यांनी सांगितले की विविध क्षेत्रात वावरत असताना महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यावेळी आपण कसे सुरक्षित राहू शकतो याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगितले.
Share:

‘मस्ती की पाठशाला’मध्ये विद्यार्थ्यांना स्वावलंबनाचे धडे

आर्य गुरुकुल शाळेचा स्त्यूत्य उपक्रम

कल्याण । प्रतिनिधी
विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच स्वावलंबन व आपल्या आवडत्या क्षेत्रात रुची निर्माण व्हावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा या हेतूने कल्याण पूर्व नांदिवली येथील आर्य गुरुकुल शाळेत मस्ती की पाठशाला आयोजित करण्यात आली होती. सलग चार दिवस सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी जेवण बनवण्यापासून ते विविध वस्तू बनवणे, लघुपट तयार करणे आदीचे प्रशिक्षण घेतले.
दिवाळीच्या सुट्ट्यांआधी परीक्षा संपल्यानंतर कल्याण पूर्वेकडील नांदिवली येथील आर्य गुरुकुल शाळेत चार दिवस मस्ती की पाठशाला हा उपक्रम राबवण्यात येतो. मुले स्वावलंबी बनावित, त्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळावा, शालेय शिक्षणाव्यतिरिक्त विविध विषयांशी त्यांची ओळख व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या चार दिवसांत मुलांना विविध सामाजिक विषयांबाबत जागृती निर्माण व्हावी या करिता लघुपट बनवणे, मातीचे भांडे बनवणे, जेवण बनवणे, शोभेच्या रोजच्या वापरातील विविध वस्तू बनवणे, विविध खेळाचे प्रशिक्षण तज्ज्ञ शिक्षकांच्या देखरेखीखाली दिले जाते. या उपक्रमात शाळेतील पहिली ते दहावीपर्यंतच्या सुमारे 1400 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी वेळी विद्यार्थ्यांचा उत्साह कमालीचा होता. 
Share:

शिक्षण मंडळातील विद्यार्थ्यांच्या संख्येत गडबड

 शिक्षण समिती सभापती रवी जग्यासी यांचा आरोप
उल्हासनगर । प्रतिनिधी
उल्हासनगर महापालिकेचे नवनियुक्त शिक्षण समिती सभापती रवी जग्यासी यांनी त्यांच्या दालनात शिक्षण मंडळातील मुख्याध्यापकांची बैठक बोलावली होती. या बैठकीचे विद्यार्थी संख्येबाबतची माहिती घेऊन येण्यास सांगण्यात आले होते, या विद्यार्थी संख्येत मोठी गडबड असल्यामुळे मुख्याध्यापकांनी बैठकीला गैरहजर राहणे पसंत केले. 
उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या 28 शाळा आहेत. या शाळांमध्ये तब्बल 6 हजार विद्यार्थी असल्याचे धरून शिक्षण मंडळातुन निविदा काढल्या जातात. मात्र सध्या शिक्षण मंडळात अवघे तीन ते सडे तीन हजार विद्यार्थी आहेत, अशी माहिती शिक्षण समिती सभापती रवी जग्यासी याना मिळाली होती. हि माहिती खरी आहे का खोटी हे तपासण्यासाठी महिला आठवड्यात रवी जग्यासी यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलावली होती. 
या बैठकीत 27 शाळांपैकी अवघ्या 4 शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित राहिले, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे चिडलेल्या जग्यासी यांनी महापौर पंचम कलानी यांची भेट घेऊन अनुपस्थित राहणार्‍या मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी केली.
Share:

जेजुरीच्या पालखी मैदानाला शाहीर सगन भाऊ यांचे नाव द्या!  जेजुरी । प्रतिनिधी
अठरापगड जाती धर्माच्या सामाजिक ऐक्याची परंपरा जतन करून ठेवणार्‍या जेजुरीकरांनी शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ यांचा एकशे सत्तरावा शाहिरी लोककला महौत्सव साजरा केला. शाहीर सगन भाऊ स्मृती मंच मंडळांने हा कार्यक्रम साजरा केला. या महोत्सवात लोककला क्षेत्रात कामगिरी करणार्‍या लोककलावंताचा शाहीर सगन भाऊ स्मुर्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
दोन दिवस साजरा झालेल्या या उत्सवात जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास नाना देवकाते, जेजुरी नगराध्यक्षा विना सोनावणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश निकुडे यांच्या शुभ हस्ते शाहीर अमोल पांढरे, प्रख्यात लेखक संतोष पवार आणि दुसर्‍या दिवशी श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त संदीप जगताप आणि समाजसेवक एन डी जगताप यांच्या  शुभ हस्ते नृत्य कलाकार योगेश देशमुख आणि जुन्या पिढीतील रंगकर्मी भोसले यांना शाहीर सगन भाऊ स्मृती या मांनाच्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी जेजुरी पालिकेचे सर्व नगरसेवक आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी जेजुरीच्या पालखी मैदानाला मिळणार शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली.या पूर्वीही या मंचावरून अभिनेत्री मधु कांबीकर, ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांचा सन्मान करण्यात आला आहे.
Share:

आमदार टिळेकरांनी पाय पकडून मागितली माफी

माफी नव्हे तर विनंती केल्याचा टिळेकरांचा खुलासा

  पुणे । प्रतिनिधी
हडपसर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार मागे घेण्यासाठी आमदार टिळेकर यांनी फिर्यादीचे हात जोडून पाय धरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.मी रवींद्र बराटे यांची माफी मागितली नाही, खोट्या प्रकरणात मला अडकवू नका, अशी विनंती केल्याचा खुलासा टिळेकरांनी केला.
खंडणी मागितल्याप्रकरणी टिळेकर यांच्यासह तिघांनी फायबर ऑप्टीकलचे काम करणार्‍यास 50 लाखांची खंडणी मागितली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना अशाप्रकारे भाजप आमदारावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये टिळेकरांबरोबर त्यांचा भाऊ चेतन टिळेकर आणि गणेश कामठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे तातडीने आमदार टिळेकर यांनी यावर प्रतिक्रिया देत बराटे चुकीची माहिती देत असल्याचे स्पष्टीकरण दिले.
Share:

बुटक्या अंबुला पाहण्यासाठी गर्दी

दोन बाय 3 फुटाच्या गायीची पलुसच्या प्रदर्शनात चर्चा

  सांगली । प्रतिनिधी
जिल्ह्यातील पलूसमध्ये आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात बुटकी गाय पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या गायीची उंची दोन फूट असून 3 फुट लांब आहे. त्यामुळे प्रदर्शनात फक्त आणि फक्त या ‘अंबु’ नावाच्या गायीचाच बोलबाला पाहायला मिळत होता. खिलार मिक्स जातीची ही गाय असून या गाईचे वय 4 वर्ष 6 महिने आहे. भारतातातील सर्वात बुटकी गाय म्हणून तिला ओळखले जाते.
क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख अरुण लाड यांच्या वाढदिवसानिमित्त पलूस येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय कृषी-पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शेतकरी तसेच सामान्य जनतेसाठी आवश्यक असणारे विविध शेकडो स्टॅाल्स या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. मात्र, या प्रदर्शनात सगळ्यात आकर्षण आणि चर्चेचा विषय ठरला तो, भारतातील सगळ्यात अंबु नावाची बुटकी गाय.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसरच्या या ‘अंबुने’ संपुर्ण प्रदर्शनात चांगलाच भाव खाल्ला होता. कारण 10 रुपयांचे तिकीट देऊन या बुटक्या अंबुला पाहण्यासाठी नागरिकांची  झुंबड उडाली होती. साडे चार वर्षांची ही बुटकी ‘अंबु’ गाय दक्षिण आफ्रिकामधून सफल जाधव यांनी आणली आहे. भारतातील ही पहिलीच बुटकी गाय आहे. ही गाय खिलार मिक्स जातीची पैदास आहे. गायीच्या तुलनेत ही बुटकी गाय 25 टक्के खाद्य खाते, अशी माहिती जाधव यांनी दिली.
अंबु दिसायला बुटकी तरी ती 7 महिन्याची गाभण आहे. म्हणजे ही अंबु लवकरच आपल्यासारख्या आणखी एका पिलाला जन्म देणार आहे. एकादा माणूस जसा बुटका राहिला असतो तशीच ही गाय देखील बुटकी राहिली आहे, अशी माहिती गायीचे मालक सफल जाधव यांनी दिली.
Share:

समुपदेशनाची रंगसफेदी नको, मुलभूत सुविधांचे काय?


छडी लागे छम-छम विद्या येई घमघम शाळेत ऐकू येणार्‍या या ओळी, तत्कालिन संपूर्ण शिक्षण पद्धतीची ओळख करून देतात.  तेव्हा काठीच्या धाकावर विद्यार्थी अभ्यासाला लागायचे आणि यशस्वी व्हायचे. पण आता अशाच प्रकारचा धाक विद्यार्थ्यांपेक्षा शाळा प्रशासनाला दाखवला तर शाळा प्रशासन कामाला लागते, असे म्हणणे चुकीचे ठरू नये. गेल्या काही वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या शिक्षण पद्धतीवर चौफेर टीका होत होती आणि आजच्या घडीलाही होत आहे. याच अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या शाळांची प्रतिमा बदलण्यासाठी मुंबई महापालिकेचे जागरूक प्रशासन कामाला आहे. म्हणजेच काय तर प्रशासनाने या शाळांचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी शाळांच्या मुंबई महापालिकेच्याच शाळा सरस करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यासाठी पालिकेने शाळांच्या दुरुस्तीची तसेच पुनर्बांधणीची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतली आहेत. शाळेचे रुपडं पालटून विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना खासगी स्वरुपाच्या धर्तीवर बनविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या शाळांमध्ये वेगवेगळ्या रंगाचा वापर करून त्या रंगाच्या आणि त्याद्वारे काढण्यात आलेल्या चित्राद्वारे विद्यार्थ्यांना शाळेप्रती गोडी निर्माण करण्यासाठी पालिका प्रयत्न करत आहे. तर अत्याधुनिक शिक्षणाबरोबरच प्रसन्नतेचे वातावरण येथे असणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी समुपदेशक निवडले जाणार आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेने नियोजलेलेया या संकल्पनेमुळे पालिका शाळेत शिकणार्‍या गरीब घरातील मुलांना याचा फायदा होणार आहे. मात्र, वरवरची रंगसफेदी करण्यासोबतच पालिका शाळांच्या मूलभुत सुविधांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.     
पालिकेच्या शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे आर्थिक दुर्बल घटकातील असतात. आई- वडीलांच्या खिश्यात पुरेसा पैसा नसल्यामुळे, मात्र, शिक्षण घेणे गरजेचे असल्यामुळे हे विद्यार्थी महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. परंतु, घरातील वातावरण, बाहेरची संगत किंवा वाईट गोष्टींचा नाद यामुळे हे विद्यार्थी नेहमीच मानसिक तणावाखाली असतात. याचा परिणाम त्यांच्या अध्ययन कौशल्यावर नकळत का होईना पण होत असतो. यामुळेच मुंबई महापालिकेच्या 1187 शाळांमध्ये 12 हजार शिक्षक प्राथमिक-माध्यमिकच्या 2 लाख 96 हजार 815 विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. मात्र इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षण घेत असताना शाळांमध्ये समुपदेशक का नाही असा प्रश्न शिक्षण समिती सदस्यांनी विचारला होता. दरम्यान, अत्यंत महत्वाचा मुद्दा असलेल्या समुपदेशकाचा विषय शिक्षणाधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे पडद्याआड राहिला असल्याचा आरोप सदस्यांनी समिती बैठकीत केला.  पालिका शाळेच्या माध्यामातून विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा आणि उत्तम शिक्षण दिले जात असताना समुपदेशक नसल्यामुळे विद्यार्थी बाहेरील खोट्या आकर्षणाला बळी पडत आहेत. त्यामुळे समुपदेशक नेमल्यास विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेऊन मार्गदर्शन करणे सोयीचे ठरणार आहे. त्यामुळे आत्महत्या आणि विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण टाळणे शक्य होईल. विशेष म्हणजे या शालेय विभागासाठी अर्थसंकल्पात 2570 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे समुपदेशक नेमण्यात आर्थिक अडचण येणार नाही, अशी मागणी सदस्यांनी केली होती. सर्वपक्षीय सदस्यांनी समुपदेशक नेमण्याची मागणी लावून धरल्यामुळे समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी समुपदेशकांची नियुक्ती करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यामुळे समुपदेशकांच्या माध्यमातून मुलांच्या मनात चाललेल्या अनेक बाबीं समजून घेणे सोपे होणार आहे. 
गेल्या आर्थिक वर्षांत एकूण 98 शालेय इमारतींची 411 कोटींची कामे हाती घेण्यात आली. अशीच कामे यंदाच्या वर्षीही घेण्यात आले. दरम्यान ही कामे वर्षाअखेरीस पूर्ण करण्याचे प्रशासनाचे ध्येय आहे. दरम्यान, पालिकेच्या काही शाळा धोकादायक असल्याचे सिद्ध झाल्यावर तर त्या शाळा जमीनदोस्त केल्या जातात. आणि तेथे शिकणार्‍या विद्यार्थ्यांना पर्यायी दुसर्‍या शाळेत पाठवले जातात. या शाळा कित्येक विद्यार्थ्यांच्या घरापासून जास्त अंतरावर असतात. त्यामुळे मुलांच्या सुरक्षेसाठी पालिकेच्या लांबच्या शाळा नकोच! हा पर्याय विद्यार्थ्यांचे पालक निवडतात. याचा परिणाम विद्यार्थी आणि त्याच्या पाल्यावर दोहोंवर होत असतो. कित्येकवेळा शिक्षणाची आवड असूनही त्या विद्यार्थ्याला वंचित राहावे लागते. आणि परिस्थितीचा बळी म्हणून घराच्या कारभाराला हातभार लावावे लागते.  यामुळे जर पालिका प्रशासन दर्जा सुधारणे आणि पोषक वातावरण निर्माण करण्याच्या विचारात असेल तर पालिकेने या घटनाकडेही लक्ष देणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. अन्यथा पालथ्या घडावर पाणीच! अशी आरोळी ठोकण्याची वेळ पालिकेच्या शिक्षण विभागावर आल्याशिवाय राहणार नाही.   
शिक्षणविभागासाठी पालिकेचे स्वतंत्र अर्थसंकल्प मांडले जाते. यानुसार दरवर्षी शिक्षणविभागाच्या अर्थसंकल्पात वाढ केली जाते. मागीलवर्षी यांच्या अर्थसंकल्पात अडीच हजार कोटींची तरतुद केली होती. मात्र, यंदा अनेक कारण समोर ठेवत यात कपात करून 2 हजार 311 कोटींची तरतूद केली आहे. शालेय विभागाच्या वेगळ्या अर्थसंकल्पातून शाळांत दाखल झालेल्या मुलांना गणवेष, पुस्तके, पोषक आहार व अन्य शैक्षणिक साहित्य पुरविण्याचे काम केले जाते. व्हर्च्युअल क्लासपासून तसेच आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करून दिले जात आहेत. तरीही येथील विद्यार्थ्याना योग्य ते शिक्षण मिळत नसल्याचे विविध माध्यमातून समोर आले आहे.  यामुळे आपल्या पाल्यांच्या भविष्याचा विचार करत पालक महापालिकेच्या शाळेकडे पाठ फिरवतात. सध्याच्या स्पर्धेच्या जगात दर्जेदार शिक्षणाशिवाय पालिका शाळा चालणार नाहीत. तसेच मोडकळीस आलेल्या शाळांच्या इमारतीची दुरुस्ती व पुनर्बांधणी, पालिकेच्या शाळांत चतुर्थश्रेणी कर्मचार्यांचीही कमतरता, त्यामुळे शालेय परिसराची, वर्गखोल्यांची तसेच शौचालयांची स्वच्छता राखली जाणे तितकेच गरजेचे आहे अन्यथा याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याचीही शक्यता आहे. तसेच, महापालिकेच्या शाळांमध्ये सुरु असलेले अन्य उद्योगधंदे बंद केल्यास याचा फायदा हा विद्यार्थ्यांनाच होणार आहे. त्यांच्या बालमनावर कोणत्याही चुकीच्या गोष्टीचा पगडा राहणार नाही. याचा विचार पालिकेने करणे महत्वाचे आहे. केवळ विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून समुपदेशक नेमण्याऐवजी इतर घडामोडीकडेही लक्ष दिल्यास पालिका शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल असेल.
Share:

राम मंदिरासाठी नुरा कुस्ती

कुस्तीच्या आखाड्यातही कधी कधी लुटुपुटीच्या कुस्ती खेळवल्या जातात, गावागावांतील जत्रांतही असे सामने रंगतात.   त्याबद्दल एक भारी शब्द गावाकडे ऐकला होता. नारळासाठी कुस्ती. म्हणजे नारळ मिळतो, कुस्ती खेळल्याचा मान मिळतो म्हणून उगा आपले दंड थोपटून मातीत फिरून यायचं. समोरचा प्रतिस्पर्धी आला की नांगी टाकायची. अशा नाटकी खडाखडींना नुरा कुस्ती म्हणायचे पूर्वी. निवडणुका जवळ आल्या की निवडणुकांच्या आखाड्यातही नुरा कुस्ती सुरू होते. जशी आता भाजपा आणि एमआयएममध्ये सुरू झाली आहे. भाजपा आणि संघ स्वत:ला हिंदुंचे एकमेव कैवारी समजतात, शिवसेना त्यातही वाटेकरी आहेच आणि इकडे एमआयएमचे ओवेसी बंधू मुस्लिमांचे तारणहार म्हणून मिरवतात. अयोध्या आणि राम मंदिर प्रकरणावरून आता निवडणुकीपर्यंत पद्धतशीर वातावरण तापवत नेले जाणार आहे. त्याची पूर्वतयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहेच. एखादी धार्मिक दंगल वगैरे भडकवून, पाचपन्नास बळी घेऊन हिंदुत्ववादी आणि मुस्लिमांचे स्वयंघोषित संरक्षक त्या विद्वेषाच्या आगीवर त्यांच्या स्वार्थाची खरपूस पोळी भाजून घेतील हे आता स्पष्ट दिसू लागले आहे. दोन्ही बाजूंची पावले तशीच पडू लागली आहेत. विशेषत: रामजन्मभूमी बाबरी मशीद या वादग्रस्त प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सबुरीचा सल्ला देत पुढच्या सुनावणीसाठी जानेवारी महिना मुक्रर केल्यावर तर दंड थोपटण्याला, शड्डू ठोकण्याला कमालीचा जोर आला आहे. संघ आणि हिंदुत्ववादी संघटना आता एकदम केंद्र सरकारने राम मंदिराबाबत कायदाच करावा असे म्हणू लागल्या असून, तिकडे असदुद्दीन ओवेसीने, राम मंदिरासाठी अध्यादेश आणून दाखवाच असे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. मोदी अर्थातच नेहमीप्रमाणे मौनात आहेत. देशापुढील सर्व प्रश्न, समस्या, कष्टकरांच्या वेदना-व्यथांचे संपूर्णपणे निराकरण झाले असून जणू रामराज्यच अवतरले आहे आणि राम मंदिराची उभारणी हा एकमेव प्रश्नच आता शिल्लक उरला आहे असे काहीतरी वेडगळ जनतेच्या मनात रुजवण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. राजकारण्यांना, राजकीय पक्षांना निवडणुकांच्या दृष्टीने ते सोयीचे आहे. कारण भावनांचे निखारे प्रदीप्त करूनच आजवर आपल्याकडे बहुतेक निवडणुकांमध्ये मतांची बेगमी, ध्रुवीकरण झाले आहे. यात कोण मेले, मारले गेले, किती होरपळले, किती संसार उघड्यावर आले याचा नंतर हिंदुत्ववादी नेतेही विचार करणार नाहीत आणि ओवेसींसारखे मुस्लिम नेतेही. उलट याच दंगलींचे भूत पुढच्या निवडणुकांना या दोन्ही बाजूंना कामी येईल. पण भाजपा आणि एमआयएम यांच्यातील ही नुरा कुस्ती आहे, मतांसाठी कावळ्यांचा गलबला सुरू झाला आहे हे बहुतेक लोकांच्या ध्यानी येत नाही. याच कोलाहलात भावना भडकवल्या जातात, आवेशपूर्ण भाषणे होतात आणि मते मिळवली जातात. हिंदुचे कैवारी म्हणवणारे राजकारणी आणि मुस्लिमांचे तारणहार म्हणवणारे पक्ष यांच्यातील ही पूर्वनियोजित नुरा कुस्ती आहे. विषय राम मंदिराचा आहे. जसे शिवस्मारक राहिलेय, महामानव आंबेडकरांचे स्मारक व्हायचे आहे तसेच राम मंदिरही निवडणुकांमध्ये धार्मिक भावना भडकवण्यापुरता वापरला जाणारा विषय आहे. राजकीय पक्ष याच विषयावर नुरा कुस्ती खेळून मतांचे विभाजन करून सत्तेची उब मिळवतील पण ही उब देण्यासाठी गरीबांची घरे धडधडून पेटवली जातील हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. अध्यादेश आणा आणि राम मंदिर बांधा ही मागणीही मतांच्या विभाजनासाठीच आहे आणि अध्यादेश आणून दाखवाच, हे आव्हानही नुरा कुस्तीतीलच आहे. रामजन्मभूमीचे घोंगडे सर्वोच्च न्यायालयात भिजत राहिलेलेच संबंधित राजकीय पक्षांना फायद्याचे आहे. यामुळेच त्यांना हिंदू आणि मुस्लिम यांच्या भावना चिथावणारी प्रक्षोभक वक्तव्ये सुरू ठेवता येतील. राम मंदिर उभारले जाईल की नाही हे या क्षणाला कुणालाच सांगता येणार नाही. भाजपा तर ते बांधणार नाही असे शिवसेनेचेच म्हणणे आहे. यासाठीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: नोव्हेंबरच्या अखेरीस अयोध्येत जाणार आहेत. आता शिवसेनाही एकला चालो रे या भूमिकेचे शिवधनुष्य पेलण्याच्या मनस्थितीत असल्यामुळे हिंदुत्वासाठी एकवटणार्‍या मतांमध्ये त्यांनाही वाटा हवा आहे. उद्धव ठाकरे यांची राम मंदिराविषयीची अलिकडची वक्तव्ये, भाजपाला दिलेले आव्हान हे सारे खेळ यासाठीच आहेत. लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठीही जानेवारी महिना निवडला आहे. या सुनावणीत न्यायालयाने काहीही सांगितले तरी हंगाम निवडणुकांचा असेल. त्यामुळे शिवसेनाही महाराष्ट्रातील सत्तेसाठी आखाड्यात उतरू शकते. भाजपा आणि कथित हिंदुत्ववादी संघटना, शिवसेना, एमआयएम यांच्यात जर नुरा कुस्त्या रंगल्या तर काँग्रेस आणि इतर पक्षही मागे राहाणार नाहीत. या सगळ्या खडाखडीत मागे लोटले जातील ते फक्त लोकांचे खरेखुरे प्रश्न.
Share:

अखेर बाधित गटई कामगारांना न्याय

कल्याण स्थानक परिसरात होणार पुनर्वसन

 कल्याण । प्रतिनिधी
कल्याण स्टेशन परिसरात गटई कामगारांचे स्टॉल पाडण्यात आले होते. या गटई कामगारांचे पुनर्वसन स्टेशन परिसरात करण्याची परवानगी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी दिल्याने अखेर या गटई कामगारांना न्याय मिळाला आहे. त्यांना न्याय मिळण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम आणि संत रोहिदास समाज गटई कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा मनसे विभाग अध्यक्ष रुपेश चंद्रकांत भोईर यांनी पालिका प्रशासनाकडे पाठपुरवा केला होता.
कल्याण स्टेशन परिसरात चर्मकार गटई कामगारांचे स्टॉल होते. 1995 साली पालिकेने चर्मकार गटई स्टॉलला परवानगी देण्यात आली होती. तर या संबंधित तत्कालीन माजी नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष चंद्रकांत भोईर यांनी महापालिकेकडे प्रस्ताव मांडून मंजूर करून घेतला होता. मात्र 2015 साली पालिकेने कोणतीही पूर्व सूचना न देता स्टेशन परिसरात चर्मकार गटई कामगारांचे स्टॉल पाडण्यात आले होते. त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी कामगार संघटनेकडून पत्रव्यवहार केल्यानंतर पालिकेकडून गोल्डन पार्क, खडक पाडा ह्या भागात पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
चर्मकार गटई कामगारांचे शहराच्या विविध भागात पुनर्वसन करावे अशी मागणी संत रोहिदास समाज गटई कामगार संघटनेचे अध्यक्ष रुपेश भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली होती. त्याचबरोबर मनसेचे माजी नगरसेवक नितीन निकम यांनी देखील या प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला होता. तर कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील याबाबत आयुक्तांशी बोलून पुनर्वसनाचा प्रश्न मांडला होता.

Share:

वांद्रेतील आगीत 80 झोपड्या खाक

दोन लहानग्यांसह 4 जखमी, 7 ते 8 सिलिंडरचा स्फोट
नर्गिस दत्त नगरमधील आगीची चौकशी करा
नर्गिस दत्त नगरमध्ये लागलेली आग ही लावण्यात आली? की लागली? असा सवाल उपस्थित करत स्थानिक आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशिष शेलार यांनी या आगीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच आगीत संसार भस्मसात झालेल्या कुटुंबियांना माणुसकीच्या नात्याने मदत करण्यात यावी अशी मागणी ही त्यांनी या पत्रात केली आहे.
 मुंबई । प्र्रतिनिधी
वांद्रे येथील नर्गिस दत्त नगरला लागलेल्या आगीत सुमारे 70 ते 80 झोपड्या खाक झाल्या असून 2 लहान मुलांसह 4 जण जखमी झाले आहेत.
वांद्रे लालमाती परिसरातील नर्गिस दत्त नगरात मंगळवारी सकाळी 11 वाजून 36 मिनिटांनी आग लागली. या आगीत 70 ते 80 झोपड्या जळून खाक झाल्या. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा संशय आहे. आग लागल्यावर 7 ते 8 गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग झपाट्याने सर्वत्र पसरली.
या आगीच्या घटनेवेळी घरामध्ये बाहेरून कडी लावलेल्या दोन लहान मुलांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आहे. सैफउद्दीन (2 वर्षे) व उमेरा खातून (7 वर्षे) अशी या दोन मुलांची नावे आहेत. या दोन मुलांसह मानसिक धक्का बसलेल्या दोन महिलांनाही  उपचारासाठी पालिकेच्या भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नर्गिस दत्त झोपडपट्टीला 2004 साली मोठी आग लागली होती. या आगीत या विभागातील सर्वच झोपड्या जळाल्या होत्या. त्यानंतर येथे 7 ते 8 वेळा आग लागल्याची माहिती येथील स्थानीक नागरिकांनी दिली. या ठिकाणी असलेली कच्ची बांधकामे व चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली वायरिंग अशा घटनांना कारणीभूत ठरत असल्याचे माजी नगरसेवक रहेबर खान राजा यांनी सांगितले.
10 वर्षांत 48 हजार आगीच्या घटना 
मुंबईत आग लागण्याच्या घटनांत वाढ होत असून गेल्या दहा वर्षांत 48434 लागलेल्या आगींपैकी 1116 आगी या सिलेंडरच्या लिकेजमुळे लागल्या. तर  3151 आगी झोपडपट्ट्यांत लागल्या असल्याची माहिती आरटीआयमधून समोर आली आहे. 2008 ते 2018 या दहा वर्षांत एकूण 48434 आगीच्या दुर्घटनांत 1568 गगनचुंबी इमारतीत 8737 रहिवासी इमारतीत व 3833 व्यावसायिक इमारतीत आगीच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त तब्बल 32516 आगी शॉर्टसर्किटमुळे लागल्या आहेत. तर 11889 आगी अन्य कारणामुळे लागल्या आहेत. या आगीत 609 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 212 पुरुष व 212 स्त्री आणि 29 मुलांचा समावेश आहे. आगीच्याी घटनेत 890486102 रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती आरटीआय कार्येक र्ते शकील अहमद यांना अग्निशमन दलाने दिली.
Share:

संगीतकार, गीतकार, गायक


यशवंत देव यांनी प्रारंभी वडिलांकडूनच संगीताचे धडे गिरवले. तेच त्यांचे पहिले गुरू होते. जी.एन. जोशी आणि गजाननराव वाटवे यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून कारकीर्द सुरू केल्यावर त्यांनी सादर केलेला ‘भावसरगम’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख यामुळेच अवघ्या महाराष्ट्राला झाली.  सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या ‘कथा ही रामजानकीची’ या गदिमांच्या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.
संगीतकार पंडित दशरथ पुजारी नेहमी म्हणायचे, देवसाहेब, तुम्ही जर संगीतातील देव असाल तर मी पण पुजारी आहे आम्हा भक्तांसाठी आता देव ही नाही आणि पुजारीही नाही. मंदिर सुने झाले हेच खरे, अशी श्रद्धांजली या दिग्गजांना जवळून पाहाणार्‍या संगीतप्रेमी कुशल पंडित या ठाणेकर उद्योजकाने वाहिली आहे.
सुरुवातीच्या काळात यशवंत देव यांनी लग्नानंतर रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी केली. त्यावेळी नोकरी सांभाळत ‘शहजादा’ चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यानंतर 1951मध्ये त्यांनी सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले आणि त्यानंतर त्यांनी खर्‍या अर्थाने संगीत क्षेत्रात स्वत:ला वाहून घेतले. गीतातील भावार्थाची लय नेमकी पकडणारे संगीत अनिल विश्वास देतात आणि ते प्रचलित संगीतकारांपेक्षा निराळे आहेत, असे सांगत मराठीतही त्यांनी गुरुच्या पावलावर पाऊल टाकले. आकाशवाणीवरील ‘भावसरगम’, ‘असे गीत जन्मा येते’,‘शब्दप्रधान गायकी’, ‘रियाजाचा कानमंत्र’ आणि स्वत:च्या रचनांचे रंगमंचीय कार्यक्रम यशवंत देव यांनी दीर्घकाळ सादर केले. कविता, विडंबनगीते केली. ‘अक्षरफुले’ आणि ‘गाणारे शब्द’ हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत. याशिवाय, त्यांनी आत्मचरित्रात्मक लेखनही केले आहे. गदिमा पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार असे विविध पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले होते.
Share:

ठाण्यातील बांधकाम मजुरांची सुरक्षा वार्‍यावर!

बांबू परांची दुर्घटनेनंतर अनेक प्रश्नांचा फुटली वाचा
बांधकाम मजूर म्हणजे नेमके कोण ?
ठाण्यात अंदाजे 80 हजारांहून अधिक बांधकाम मजूर आहेत. या मजुरांना बांधकाम ठिकाणी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. हे बांधकाम मजूर नाका कामगार म्हणून ओळखले जातात. प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यांतून हे मजूर आपले पोट भरण्यासाठी येतात. शहराच्या विविध ठिकाणी प्रामुख्याने झोपडपट्टीत आपल्या कुटुंबासोबत स्थायिक होतात. मिळेल तिकडे बिगारी कामे करतात.
  ठाणे । वसंत चव्हाण
ठाण्याच्या रुणवाल गार्डन सिटीत इमारतीच्या रंगरंगोटीसाठी उभारलेली बांबूची परांची कोसळून आठ मजूर जखमी झाले होते. या घटनेतील अनेक कामगारांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे. या दुघर्टनेनंतर ठाण्यातील अनेक इमारतींवर बांधकाम मजूर म्हणून काम करणार्‍या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, बाळकुमर येथील दुर्घनेला कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापक आणि महाराष्ट्र शासनाचा कामगार विभाग जबाबदार असल्याचा आरोप होत आहे.
गेल्या 10 वर्षांत ठाणे शहरात टोलेजंगी इमारतीची संख्या वाढली आहे. या इमारतीच्या देखभालीसाठी नवीन तंत्रज्ञान वापरून विविध पद्धतीने देखभाल केली जाते. तर काही ठिकाणी बिगारी किंवा बांधकाम कामगारांकडून काम केले जाते. या दरम्यान कामगारांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले जाते. मात्र सोमवारी झालेल्या दुर्घटनेत कामगारांची कोणतीही काळजी घेण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. या दुर्घनेनंतर या बांधकाम कामगारांचा विमा काढण्यात आला आहे का ? या मजुरांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्या उपायोजना करण्यात आल्या होत्या? गेली अनेक महिने हे काम का राखडले होते, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

रुणवाल गार्डन सिटी येथे झालेला अपघात दुर्दैवी आहे. याला कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापक तसेच महाराष्ट कामगार विभाग जबाबदार आहे. शासनाची कोणतीही यंत्रणेचे यावर लक्ष नाही. बांधकाम कामगार, बिगारींची नोंदच सरकारच्या कामगार विभागाकडे नाही. घडला प्रकार गंभीर असून कामगारांच्या जिविताशी नेहमी खेळले जाते.- चंद्रभास आझाद, कामगार क्षेत्रातील कार्यकर्ते
Share:

पंकजाताईंच्या महिला बचतगटाची हायटेकवारी!

अमेरिकेतील फेसबुक, टीआयई संस्थेला भेट, ग्रामीण उत्पादनांना जागतिक बाजारपेठ

 मुंबई । प्र्रतिनिधी
नवतंत्रज्ञानाला आपलेसे करून घेण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली महिला बचतगटाने अमेरिकेत हायटेकवारी केली. अमेरिका दौर्‍याच्या पहिला दिवशी सॅन फ्रॅन्सिस्को येथे बचतगटांच्या महिलांसमवेत फेसबुक मुख्यालय, व्हॉट्सअ‍ॅप प्रतिनिधी व टीआयई संस्थेला मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट दिली. ग्रामीण बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी या दोन्ही माध्यमांचा वापर प्रभावीपणे करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सोबत काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राज्यातील युवकांना तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी फेसबुक आणि व्हॉटसअ‍ॅप  एकत्र काम करणार आहेत. दोन्ही समाजमाध्यमांचे प्रतिनिधी डिसेंबर 2018 मध्ये महाराष्ट्राचा दौरा करणार असून दोघांनीही ही भागीदारी पुढे नेण्यासाठी बैठकीत सहमती दर्शविली.
याप्रसंगी  फेसबुकच्या प्रतिनिधी मीरा पटेल, आरती सोमण, ब्रेंडा आणि कोलिन, व्हॉट्सअप प्रतिनिधी बेन्सापल, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, उमेदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला, फिक्कचे प्रतिनिधी रुबाब सूद  आणि बचत गटांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या.
अमेरिकत 15 मिनिटात झाली 35 हजारांची विक्री
ग्रामीण बचतगटांच्या महिलांनी या दौर्‍यात तर कमालच केली. बचतगटांनी तयार केलेल्या भारतीय वस्तू त्यांनी अमेरिकन लोकांना  सॅम्पल (नमुना) म्हणून दाखवल्या पण उपस्थित प्रतिनिधींना त्या वस्तू एवढ्या आवडल्या की त्यांनी तिथेच त्या खरेदी केल्या. तांब्याच्या एका बॉटलला 2100 रुपये तर वारली पेंटिंगला तब्बल 7210 रुपये महिलांना मिळाले. बघता बघता  पंधरा मिनिटांत सुमारे 35 हजार 700 रुपयांची विक्री यावेळी झाली.
Share:

कर्नल पुरोहित, प्रज्ञासिंह दहशतवादी

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आरोप निश्चित

 नवी दिल्ली । 
मालेगावात 2008 साली झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने मंगळवारी आरोप निश्चित केले.  मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, मेजर उपाध्याय यांच्यासह 7 जणांविरोधात दहशतवादी कट व हत्येचा ठपका ठेवण्यात आला आहे. येत्या 2 नोव्हेंबर रोजी यावरील पुढील सुनावणी होणार आहे. मालेगावमधील एका मशिदीत 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाले होते. या प्रकरणात काही वर्षांपूर्वी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा व इतर सहा जणांना यूएपीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. या कलमांच्या वैधतेला आव्हान देत कर्नल पुरोहित यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या वैधतेच्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत एनआयए न्यायालयातील सुनावणी थांबवावी, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. पण, उच्च न्यायालयाने ती फेटाळली होती. एनआयए कोर्टात हा खटला उभा राहिला असून त्यांच्यावर आरोप निश्चिती झाली आहे. 
आम्ही दहशतवाद कसा पसरवू शकतो?
साध्वी प्रज्ञाने मात्र तिच्यावरील सर्व आरोप नाकारले आहेत. हा आमचा देश आहे. हिंदूंचा देश आहे. आमच्याच देशात आम्ही दहशतवाद कसा पसरवू शकतो, असा सवाल साध्वी प्रज्ञा हिने केला आहे. आम्ही राष्ट्रवादी आहोत. दहशतवादी नाही.
Tags:कर्नल पुरोहित प्रज्ञा सिंह दहशतवादी ,कर्नल पुरोहित प्रज्ञा सिंह दहशतवादी
Share:

देवाघरचा सूर लोपला यशवंत देव कालवश

यशवंत देव कालवश facebook, यशवंत देव कालवश hindi

 मुंबई । प्रतिनिधी
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, ‘असेन मी नसेन मी’, तुझे गीत गाण्यासाठी, ‘अखेरचे येतील माझ्या’ ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’ अशा शेकडो गीतांना मधूर संगीतसाज चढवून भावसंगीताचे विश्व समृद्ध करणारे ज्येष्ठ संगीतकार व गीतकार यशवंत देव यांचे मंगळवारी पहाटे दादर येथील सुश्रुषा रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. अशक्तपणा जाणवू लागल्याने देव यांना 10 ऑक्टोबरला सुश्रुषा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. तपासणीदरम्यान त्यांना चिकनगुनिया आणि न्यूमोनिया झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात त्यांचे एक मूत्रपिंडही निकामी झाले होते. अखेर त्यांनी आज पहाटे दोनच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.
मराठी चित्रपटसंगीतबरोबरच अभंग, भावगीत, लोकगीत अशी अनेक गाणी त्यांनी रचली आणि त्याला संगीतही दिले. अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीत दिले होते. देवाघरचे लेणे देवाघरी परतले अशी हळहळ देव यांच्या निधनामुळे मराठी चित्रपट आणि सुगम संगीत क्षेत्रात व्यक्त होत आहे. कुमार विश्वास यांनीही देव यांना ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली आहे.
यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेली काही अजरामर गाणी
 •  या जन्मावर या जगण्यावर  
 • जीवनात ही घडी अशीच राहु दे  
 • भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी  दिवस तुझे हे फुलायचे  
 • येशिल येशिल येशिल राणी 
 •  अशी पाखरे येती आणिक  
 • असेन मी नसेन मी  
 • कुठे शोधिसी रामेश्वर  
 • डोळ्यात सांजवेळी आणू

कवी यशवंत देव यांनी लिहिलेली काही गाणी
 •  जीवनात ही घडी अशीच राहू दे  
 • कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे 
 •  स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी 
 • दिवाळी येणार अंगण सजणार
Tags:यशवंत देव कालवश facebook ,यशवंत देव कालवश hindi
Share:

डोक्यात गोळी झाडून तरुणाचा आत्मघात

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर गोळीबार

 पेण । देवा पेरवी
एकतर्फी प्रेमातून ठाण्यात एका माथेफिरूने भरदिवसा कॉलेज तरुणीची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. समाजमन हादरवून सोडणार्‍या याच घटनेची पुनरावृत्ती पेणमध्ये घडली आहे. तरुणीने लग्नाला नकार दिल्याने घरात घुसून तिच्यावर गोळीबार केल्यानंतर माथेफिरू तरुणाने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना पेण देवनगरी सोसायटीत घडली आहे. सुदैवाने रात्रीच्या अंधारात ही तरुणी गोळीबारातून बचावली असून नेरे गाव पनवेल येथे राहणारा तेजस माया फडके (25) या तरुणाने स्वत:वर गोळी झाडल्याने तो जागीच ठार झाला आहे.
पेणमधील देवनगरी येथे राहणार्‍या तरुणीसोबत गेल्या तीन ते चार वर्षांपासून तेजसची मैत्री होती. तेजसने या तरुणीसोबत लग्न करण्यासाठी सतत तगादा लावला होता. त्यामुळे या दोघांच्या मैत्रीत गेल्या वर्षभरापासून दुरावा निर्माण झाला होता. हा राग मनात खदखदत असलेला तेजस सोमवारी रात्री 9 च्या सुमारास या तरुणीच्या देवनगरी, पेण येथील घरात मद्याधुंद अवस्थेत शिरला. ही तरुणी एकटीच घरात असल्याचे हेरून तेजसने आपल्याजवळील गावठी पिस्तुलातून दोन गोळ्या तरुणीच्या दिशेने झाडल्या. मात्र ती अंधारात पळून गेल्याने बचावली. त्यानंतर दारूच्या नशेत असलेला तेजस आपल्या कारमध्ये बसून निघून गेला. पेण पोलीस ठाण्यात तरुणीच्या पालकांनी या तरुणाविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर लागलीच पोलिसांनी या तरुणाचा शोध घेतला. त्यावेळी हा तरुण मुंबई-गोवा महामार्गावर पेणजवळील पशुसंवर्धन इस्पितळानजीक एका गाडीत रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आला. तेजसने ड्रायव्हिंग सीटवर स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी एक गावठी पिस्तूल आढळले आहे. या प्रकरणी पेण पोलीस निरीक्षक धनाजी क्षिरसागर हे अधिक तपास करत आहेत.
Share:

ज्यांचा पुतळ्यांना विरोध त्याच वल्लभभाईंचा पुतळा

हे वल्लभभाईना तरी कसे पटेल?  राज यांचा व्यंगचित्रातून भाजपवर निशाणा
ज्यांचा पुतळ्याला विरोध त्याचा वल्लभ भाई चा पुतळा, ज्यांचा पुतळ्याला विरोध त्याचा वल्लभभाई चा पुतळा, ज्यांचा पुतळ्याला विरोध त्याचा वल्लभ भाई चा पुतळा,

 मुंबई । प्रतिनिधी
भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरदार पटेल यांचा पुतळे उभारण्याला कायम विरोध होता. पटेलांच्याच सर्वात उंच अशा पुतळ्याचे अनावरण बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असताना हा विरोधभास अधिक प्रखरपणे समोर आला आहे. महात्मा गांधींच्या हत्येनंतर बरोबर दोन आठवड्यांनी म्हणजे 14 फेब्रुवारी 1948 रोजी पटेल यांनी ‘दु:ख करत बसणे पुरे झाले आता कामाला लागा’ अशा मथळ्याखाली लिहिलेल्या लेखात, ‘गांधीजींच्या नावाने मंदिर बांधणे किंवा त्यांची मूर्तीपूजा करणारी स्मारके बांधण्याला माझा सक्त विरोध आहे. अशा प्रकरणांमध्ये मी कायमच माझी मते स्पष्टपणे मांडली आहेत. अशी स्मारके बांधणार्‍यांना किंवा तसा विचार करणार्‍यांना असे न करण्याचा सल्ला मी देईन. त्यांनी अशाप्रकारे स्मारके बांधण्याचे काम करु नये अशी विनंती मी त्यांना करतो’ असे म्हटले होते.
गुजरातमधील नर्मदा नदीजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून पुतळा तयार करण्यात आला असून हा जगातील उंच पुतळा ठरणार आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखल्या जाणा-या या स्मारकाचे मोदी पटेलांच्या जयंतीदिनी लोकार्पण करतील.
या पुतळ्यासाठी करण्यात आलेल्या खर्चावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही व्यंगचित्रातून भाजपाला फटकारले आहे. ‘अरे, तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका अवाढव्य खर्च करुन आमचे पुतळे उभे करण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवा ना !’, अशी कळकळ जणू सरदार वल्लभभाई पटेल व्यक्त करत असल्याचे त्यांनी व्यंगचित्रातून मांडले आहे. स्मारकासाठी 2 हजार 290 कोटी रुपये खर्च झाला आहे. मात्र, पुतळ्यावर इतका खर्च करण्याऐवजी हा पैसा विकासकामांसाठी वापरता आला असता असा एक सूर देशभरातून उमटतो आहे. राज यांनी नेमका हाच धागा पकडून मोदींना टोला हाणला आहे. हे वल्लभभाईंना तरी कसे पटेल?, असा सवाल राज यांनी मंगळवारी साकारलेल्या व्यंगचित्रातून केला आहे.
व्यंगचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मारकाचे लोकार्पण करताना दिसत आहेत. त्यांच्या बाजूला नितीन गडकरी, अमित शहा, अरुण जेटली दाखवण्यात आले आहेत. मोदी वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला हार घालत असून यावेळी वल्लभभाई पटेल यांच्या मनात काय भावना असतील, हे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.
यासंदर्भातच ‘इंडियन एक्सप्रेस ग्रुप’च्या ‘समकालीन’ या वृत्तपत्रामध्ये संपादक आणि सेण्टर फॉर स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च ऑन लाइफ अ‍ॅण्ड वर्क्स ऑफ सरदार वल्लभभाई पटेल (सेरलिप) चे माजी नियंत्रक असणार्‍या डॉ. हरी देसाई यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. ‘काही हजार कोटी रुपये खर्च करुन पटेलांचा हा पुतळा उभारण्यात आला असतानाच आपल्याला ही गोष्टही लक्षात घेणे गरजेचे आहे की, पटेल यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्याकडे केवळ 262 रुपये होते.’ तसेच त्यावेळी सरदार पटेलांकडे असणार्‍या संपत्तीचा 35 लाखांचा धनादेश त्यांची मुलगी मणिबहन यांनी पंडित जवाहरलाल नेहरुंना परत केला होता असेही देसाई यांनी सांगितले.
Tags:ज्यांचा पुतळ्याला विरोध त्याचा वल्लभ भाई चा पुतळा, ज्यांचा पुतळ्याला विरोध त्याचा वल्लभभाई चा पुतळा, ज्यांचा पुतळ्याला विरोध त्याचा वल्लभ भाई चा पुतळा
Share:

शैक्षणिक क्षेत्रातील वीस वर्षांची आराधना


नवरात्रीत आराधना केल्या जाणार्‍या देवीच्या नऊ रुपांपैकी सर्वात लोभसवाणं रुप सरस्वतीचं अर्थात शारदेचं. शारदा म्हणजे ज्ञानाला आधार देणारी शक्ति.  आजच्या  तंत्रज्ञानाच्या युगात शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या अनेक स्त्रिया आहेत.  त्यात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर या शैक्षणिक क्षेत्राला आपलं वेगळं योगदान देऊ पाहणार्‍या  उद्योजिका म्हणजे  वैशाली गव्हाणकर.
शैक्षणिक क्षेत्रात वीस वर्षे शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजालाही व्हावा व मुलांना शिकवण्याची असलेली आवड जोपासावी यासाठी त्यांनी ’ग्यानमुद्रा एज्युकेशन’ ही  संस्था सुरु केली. जिच्या माध्यमातून आज वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असलेल्या घटकांना ज्ञान देण्याचं काम वैशाली गव्हाणकर करत आहेत.
विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या बर्‍याचशा समस्या त्यांच्या नजरेस पडल्या आणि मग विद्यार्थीदशेतील मुलांच्या बौद्धिक व मानसिक क्षमतेवर अभ्यास करायला त्यांनी सुरुवात केली. मुलांमधील उपजत गुणांचा वापर करून लहान वयातच अभ्यासाची गोडी लावण्याचं कसरतीचं काम त्यांनी उत्तमरीत्या निभावलं. तसेच आपल्या  बौद्धिक क्षमता ओळखून अभ्यास कसा करावा हे शिकवण्याचीही क्लुप्ती त्यांनी शोधून काढली.
हे काम सुरु असतानाच ’कामांमुळे मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देता येत नाही’ हि पालकांची रोजचीच गार्‍हाणी कानावर पडल्यावर पालकांना मार्गदर्शन देणारी कार्यशाळा सुरु करावी, हा विचार त्यांच्या मनात आला. सध्याच्या पालकांना असलेली मार्गदर्शकाची गरज त्यांनी ओळखली आणि मग या कार्यशाळेतून आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा? किंवा मुलांच्या अभ्यासाबाबतीत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते? यासंबंधी मार्गदर्शन द्यायला त्यांनी सुरुवात केली. 
 उद्योग क्षेत्राकडे वळून ‘ग्यानमुद्रा’ संस्थेची स्थापना केल्यामुळे  उद्योजिका बनण्याचं स्वप्न पाहणार्‍या स्त्रियांविषयी आधीपासूनच  त्यांना विशेष कौतुक वाटायचं. मात्र चाळीशीत उद्योजिका बनणार्‍या स्त्रियांना आपल्या  व्यवसायाचं विपणन करण्यासाठी सोशल मीडिया कसा वापरतात? हेच ठाऊक नसल्यामुळे त्यांच्या व्यवसायात बर्‍याच समस्या येत आहेत. हे त्यांनी अचूक ओळखलं आणि मग सुरुवात केली ती या उद्योजिकांना सोशल मिडियाचा  फायदा आपल्या उद्योगासाठी कसा करुन घ्यावा? याचं प्रशिक्षण द्यायला.
एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत तर अतिरिक्त ताणावर  आपल्यातील आंतरिक शक्तीच्या साहाय्याने कशी मात करावी? या विषयावरही विशेष मार्गदर्शन द्यायला त्यांनी सुरुवात केली.
सर्वच क्षेत्राचा पाया असलेल्या शिक्षण क्षेत्राला आयुष्यातील वीस वर्षे देऊन, विविध वयोगटातील विद्यार्थीदशेत असणार्‍या पिढीला ज्ञानदान देण्याचं कार्य वैशाली गव्हाणकर करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा एकूणच प्रवास पहिला तर ही एक प्रकारची सरस्वतीची आराधनाच म्हणावी लागेल.
Tags:शैक्षणिक क्षेत्रातील वीस वर्षांची आराधना dj,शैक्षणिक क्षेत्रातील वीस वर्षांची आराधना lyrics,शैक्षणिक क्षेत्रातील वीस वर्षांची आराधना mp3
Share:

कहाणी चाळिशीची, दिव्याच्या अमावस्येची

 कहाणी चाळीशीची दिव्याच्या अमावस्येच्या, कहाणी चाळीशीची दिव्याच्या अमावस्येच्या best कहाणी चाळीशीची दिव्याच्या अमावस्येच्य, कहाणी चाळीशीची दिव्याच्या अमावस्येच्या, कहाणी चाळीशीची दिव्याच्या अमावस्येच्या,

एकदा दोन मैत्रिणी ऑफिसमधून घाईघाईने बाहेर निघाल्या. एक दुसरीला म्हणते, अग आज दिव्याची अमावस्या, श्रावण सुरू होईल. घरी जाताना पुरणाचे सामान, आघाडा दुर्वा घ्यायचे आहे. आघाडा नाही मिळाला तर सासूबाई पुन्हा पाठवतील बाजारात. जातानाच घेते. हल्ली गुढघा दुखतो माझा गाडीवर फिरून.
दुसरी तिच्या हाताला धरून तिला क्षणभर बसवते, बाई, कित्येक वर्षे तुझी धावपळ पहाते आहे. तुला एक व्रत द्यायचे आहे. ऐकशील? बाई बाई, कबुली देणं सोपं नसतं, ठाऊक आहे मला. पण द्यावी गं कबुली कधीकधी प्रांजळपणे.
चाळीशी पार होत आलेली असते. शरीर गप्पा मारायला लागतं, त्याचं अस्तित्व दाखवायला लागतं. कान द्यावेत त्याला क्षणभर अन ऐकावं त्याचं. मुलांच्या शाळा, नवर्‍याचा डब्बा, इगो, घरातल्या वयस्कर लोकांच्या तू समजून घेऊन अंगावर घेतलेल्या जबाबदार्‍या सगळं तस्संच ठेवायचा तुझा आग्रह. अर्थात स्वाभाविक आहे. त्यासाठी तुझी अखंड धडपड सुद्धा! 
ऑफिसमध्ये बाई म्हणून कोणतीही सवलत घेणं तत्वतः तुला पटतच नाही, तशी मानी आहेस तू. त्याचा सगळ्यांना रास्त अभिमानसुद्धा आहे. त्यासाठी प्रत्येक आघाडीवर अटीतटीने लढताना एक क्षणभर थांब जरा. किंचित पॉझ घे.
सकाळी उठून ओट्यापाशी उभे राहणारे तुझे पाय काही सांगू पाहतात तुला.अखंड गाडीवर फिरणार्‍या या झाशीच्या राणीची पाठ कुठेतरी जाणवून देतीये तिचे अस्तित्व. आजकाल कणिक मळताना हात गप्पा मारतात.
अभ्यास घेताना मुलांच्या समोर बसलं की उठताना गुढघा झकास कळ मारतो अचानक. अन घाईघाईत अकारण ओशाळला चेहरा करून तू उठतेस. ओठावर आलेले, आई गं  गिळून टाकतेस. अन कान घट्ट बंद करून पुढच्या तयारीला लागतेस. बाई ग तुलाही एकच जन्म मिळाला आहे. सुपर वुमन बनण्याच्या नादात किती ओढशील शरीराला. थांब जरा. 
यावेळी श्रावणात सणवार करताना नाही पाळलेस फार तरी चालेल. मैत्रिणींचे पुरणपोळ्या केल्याचे, सणवार साजरे केल्याचे फोटो, मेसेज नुसते पाहिलेस तरी चालतील. पण श्रावणात एक व्रत घे, कबुली दे स्वतःला, मी माझ्या शरीराला माझे कान देईल. ऐकेन त्याचे. नाही एखादी गोष्ट जमली तर ते स्पष्ट सांगायचे धैर्य ठेवेन. घरात सांगेन सगळ्यांना की दमते मी ही. नका गृहीत धरू बघ बरं करता येईल का असे. जमेल तुला. हे व्रत तसे सोपे नाही मैत्रिणी.
त्यासाठी काय करावं? मन घट्ट करून आपल्या खोलीत यावे. दहा मिनिटं मांडी घालून बसावे. मनाचा आरसा लख्ख घासून घ्यावा. आपल्याच लहानपणीचा चेहरा समोर आठवावा. किंचित हसू येईल. ते हसू पकडून ठेवावं आणि मग आपल्या अवयवांशी गप्पा माराव्यात. त्यांना बोलतं करावं. त्यांची दुःख जाणून घ्यावीत. पुन्हा एकदा लहानपणीचा चेहरा आठवावा.
खोल श्वास घ्यावा. आपल्या अवयवांना मनापासून सांगावं, बाबांनो मी उतणार नाही मातनार नाही. तुम्ही इतके दिवस न कुरकुरता माझी साथ दिलीत, मी तुमची साथ सोडणार नाही. मग काय करावं? चेहर्‍यावरून दोन्ही तळवे फिरवावेत. चाळीशीच्या बदलाची नोंद करावी.आपले रुटीन थोडेसे बदलावे. ओट्याजवळच्या बेसिनचा नळ सोडावा.
सगळे काही पहिल्यासारखे असावे, असलेच पाहिजे हा अट्टहास त्यात सोडून द्यावा. फक्त आपल्यासाठी आपल्याला हवा तसा एकच कप चहा करावा. इतक्या मोठ्या घरात पहिल्यांदाच स्वतःसाठी एखादा कोपरा धुंडाळावा. मघाशी सांगितलेले चिमूटभर धैर्य घ्यावे, दहा मिनिटं मला हाक मारू नका रे असे जाहीर करावे आणि सावकाश तो कप संपवावा.
श्रावणाच्या चाळीशीचे हे व्रत कोणी करावे? 
स्वतःला दुय्यम स्थान देऊन घरातल्या सगळ्यांच्या हाकेला ओ देणार्‍या सुपरवुमन ने करावे. घरचे आवरून, ऑफिस गाठून पोरांचा अभ्यास घेऊन रात्री ओटा आवरणार्‍या आईने करावे. पेपर वाचत दोन कप चहा पिणार्‍या अन दळण -किराणा देखील न आणणार्‍या नवर्‍याच्या बायकोने करावे. सासूला विचारून ऑफिसातून भाजी आणणार्‍या अन घरातले शिळे चुपचाप खाणार्‍या सुनेने करावे. आपल्यालाही एकदाच हा जन्म मिळाला आहे हे विसरणार्‍या, Adjustment मध्ये धन्यता मानणार्‍या, शरीराचे न ऐकणार्‍या ठार बहिर्‍या प्रत्येक बाईने हे व्रत करावे.दिव्याच्या अमावस्येला सुरवात करावी. श्वास असेपर्यंत ते पाळावे.ही चाळिशीची साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण.
Tags: कहाणी चाळीशीची दिव्याच्या अमावस्येच्या, कहाणी चाळीशीची दिव्याच्या अमावस्येच्या  best कहाणी चाळीशीची दिव्याच्या अमावस्येच्य, कहाणी चाळीशीची दिव्याच्या अमावस्येच्या, कहाणी चाळीशीची दिव्याच्या अमावस्येच्या, 
Share:

तेजोमय दिवाळीचा राजेशाही थाट

थाट राग वर्गीकरण,थाट और राग की उत्पत्ति का ज्ञान

रुबाब, राजेशाही, तेजोमय, राजयोगी, नक्षत्र, कोहिनूर ही आकर्षक नावे कोणत्याही हिरजेडित दागिन्यांची नाही तर दिवाळी प्रकाशमान करणार्‍या आकाश कंदिलांची आहेत. कंदिलांना अशी नावे देणार्‍या आणि नावाप्रमाणेच कंदीलेही तयार करणार्‍या हर्षाभि क्रिएशनने भन्नाट कल्पना लढवत आकर्षक आकाश कंदिले तयार केली आहेत. हर्षदा कोळी-साटम आणि अभिषेक साटम या जोडप्याने तयार केलेल्या या कंदिलांना सध्या प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. 
जरीच्या साड्यांचा काठ, खण, कागद, लोकर, दोरा आदींचा वापर करत कंदिले तयार करण्यात आली आहेत. अभिषेक साटम गेल्या सात वर्षांपासून कंदिले घरीच तयार करतोे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कंदीलनिर्मितीचे शास्त्र शिकून घेतले. त्याचप्रमाणे कल्पकता लढवत त्याने अनेक सृजनात्मक कंदील तयार केले. स्वतःपुरते बनवलेली कंदिले इतरांना प्रचंड आवडू लागली. इतरांनीही त्याच्याकडे अशाच कंदिलांची मागणी केली. म्हणूनच यंदा अभिषेक आणि त्याची पत्नी हर्षदा यांनी मिळून कंदील निर्मितीला सुरुवात केली. आपली पंरपरा जपण्यासाठीच ‘हर्षाभि क्रिएशन’ निर्मित कंदिलांना त्यांनी पारंपरिक टच दिला आहे. कंदीलांना एकदम राजेशाही थाट देण्याकरता त्यांनी भारतीय वस्त्रांचा वापर केला आहे. याविषयी अभिषेक साटम सांगतो की, ‘आपल्या परंपरा आपण जपायलाच हव्यात, पण या परंपरा जपताना आपण पर्यावरणाचेही रक्षण केले पाहिजे. आपल्या परंपरा आणि संस्कृतीतून पर्यावरणाचे रक्षण झाले तरच आपले हे सण सार्थकी लागतील. म्हणूनच प्लास्टिक, थर्माकॉलचे कंदील दारासमोर लावून पर्यावरणाचे तापमान वाढवण्यापेक्षा पर्यावरणपूरक कंदील लावून दिवाळी साजरी केली तरच आपले आयुष्य तेजोमय होईल.’
हर्षदा आणि अभिषेक हे जोडपे पर्यावरणप्रेमी असल्याने त्यांनी नेहमीच पर्यावरणाचा विचार केला आहे. हर्षदाला पूर्वीपासूनच विविध कलाकूसर करण्याची आवड आहे. क्विलिंग पेपरपासून तिने अनेक वस्तू तयार केल्या आहेत. त्यातूनच तिने तिची ही कल्पकता कंदील निर्मितीसाठीही वापरली. 
‘राजयोगी’, ‘तेजोमय’ कंदिलात त्यांनी साडीचा वापर केला आहे. आकाश कंदिलासाठी आजवर कागदाचा किंवा प्लास्टिकचा उपयोग करण्यात आला. मात्र हर्षदा आणि अभिषेकच्या कल्पकतेतून त्यांनी आकाश कंदिलासाठी साडीचा वापर करून घेतला. ‘रुबाब’ आणि ‘राजेशाही’ कंदिलांसाठी त्यांनी खणाचा वापर केला आहे. खण म्हणजे आपल्या पारंपरिक वस्त्रांपैकी एक. म्हणूनच त्यांनी मुद्दाम आकाश कंदिलाच्या मधल्या त्रिकोणांमध्ये खणांचा वापर केलाय. ‘कोहिनूर’ आणि ‘श्रीमंत’ कंदील प्रकारात त्यांनी वुली पेपर म्हणजेच लोकर कागदाचा वापर केला आहे. सोबतच दोर्‍यांचाही वापर करण्यात आलाय. तर, नक्षत्र हा कंदिलाचा प्रकार लहान स्वरुपातला असून त्यासाठी विविध रंगीबेरंगी कागदांचा वापर केला आहे. 
कंदील निर्मितीविषयी माहिती सांगताना हर्षदा सांगते की संपूर्ण एक कंदील तयार करायला आम्हाला दीड दिवस लागतो. अनेक बारीक-सारीक कलाकूसर कराव्या लागत असल्याने दीड दिवसांचा अवधी एका कंदिलाला द्यावाच लागतो.
नक्षत्र कंदिलाची उंची 4 इंचाची आहे, तर इतर कंदिलांची उंची साडेतीन फुट आहेत. हर्षाभि क्रिएशन ग्राहकांना दीड फूट म्हणजेच केवळ आकाश कंदीलाचा वरचा भागही देतात तर ग्राहकांच्या पसंतीनुसार साडेतीन फुटांचा संपूर्ण कंदीलही देतात. ग्राहकांच्या पसंतीनुसारही कंदील तयार करण्यात येत असल्याचे हर्षदा सांगते. 
हे कंदील दीर्घकाळ टिकणारे आहेत. त्यामुळे प्रत्येकवर्षी नवे कंदील घेण्याची गरज नाही. या वर्षात कंदील वापरून झाल्यावर ते व्यवस्थित ठेवल्यास पुढचे बरेच वर्ष हे कंदील वापरता येतात. हे कंदील व्यवस्थित ठेवण्याकरताही हर्षाभि क्रिएशनने ग्राहकांची मदत केली आहे. त्यांनी कागदी पिशवी तयार केली आहे. या पिशव्यांमध्येपुढच्या वर्षासाठी कंदीले व्यवस्थित ठेवू शकतात.
पर्यावरण रक्षणाची ओढ आणि सृजनशक्तीचा केलेला वापर म्हणजेच हर्षाभि क्रिएशनचे कंदील आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

Tags: थाट और राग की उत्पत्ति का ज्ञान, राग वर्गीकरण                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                    
Share:

Monday, October 29, 2018

सतीश कुमार गुप्ता पेटीएम पेमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक


मुंबई । प्रतिनिधी 
पेटीएम पेमेंट्स बँक या भारताच्या सर्वात मोठ्या डिजिटल बँकेने सतीश कुमार गुप्ता यांची व्यावस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. 
पेटीएम पेमेंट्स बँकेत नियुक्त होताना सतीश कुमार गुप्ता यांच्या पाठीशी 35 पेक्षा जास्त वर्षांचा नेतृत्वाचा अनुभव आहे. त्यांनी एसबीआय आणि एनपीसीआयमध्ये वरिष्ठ पदांवर काम केलेले आहे.
पेटीएम पेमेंट्स बँकेचे सतीश कुमार गुप्ता यांनी सांगितले, मी सुमारे चार दशकांपासून बँकिंग आणि पेमेंट उद्योगाशी निगडीत आहे. डिजिटल पेमेंटचा प्रसार करताना भारतीय अर्थव्यवस्थेत आलेला विस्कळितपणा आणि या क्षेत्रातील वाढ हे अनुभवण्याचे भाग्य मला लाभले आहे. बँकिंग आणि पेमेंट्सच्या बाबतीतील माझ्या ज्ञानाचा उपयोग पेटीएम पेमेंट्स बँकेला करून देण्यासाठी आणि डिजिटल पेमेंट्सच्या माध्यमातून आर्थिक क्षेत्रात सर्वसमावेशकता आणण्याचे पेटीएमचे व्हिजन आपलेसे करण्यास मी उत्सुक आहे.
पेटीएमचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा म्हणाले, सतीश कुमार गुप्ताना बँकिंग क्षेत्रातील तब्बल 35 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे आणि पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यावस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आमच्या पेमेंट्स बँकेसाठी आमचे जे व्हिजन आहे, ते साध्य करण्यासाठी त्यांच्या प्रगाढ ज्ञानाचा उपयोग होईल.
Share:

धोनीला वगळण्याचा निर्णय योग्यच!


 नवी दिल्ली । वृत्तसंस्था 
बीसीसीआयने आगामी विंडीज आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. विंडीज व ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 संघामध्ये बीसीसीआयने महेंद्रसिंह धोनीला वगळून ऋषभ पंतला संधी दिली. या निर्णयाला भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकर याने योग्य ठरवले आहे.
2020 साली ऑस्ट्रेलियात होणारा टी-20 विश्वचषक पाहता धोनीला वगळण्याचा निर्णय योग्य असल्याचे आगरकरने म्हटले आहे. एखाद्या खेळाडूची संघात निवड होत असताना तो किती महान खेळाडू आहे, याऐवजी भविष्यकाळाचा विचार करणे गरजेचे आहे. निवड समितीने धोनीचे करिअर संपलेले, नाही असा संदेश दिला आहे, यामधून त्यांना नेमके काय सुचवायचे आहे, मला माहिती नाही. मात्र 2020 साली ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्वचषकात धोनी खेळेल की, नाही याची शाश्वती नसताना त्याला सध्या आता संघात स्थान देण्यात काहीच अर्थ उरत नाही, असे आगरकर म्हणाला.
काळानुरुप तुम्हाला पुढच्या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे. धोनी कर्णधार असताना त्यानेही काही खेळाडूंच्या संघातील स्थानाबद्दल असाच निर्णय घेतला होता. तुम्ही किती महान खेळाडू आहात यापेक्षा सध्याच्या संघात तुमची काय कामगिरी आहे हे पाहणे महत्वाचे आहे. निवड समितीला या निर्णयामुळे कदाचीत चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, मात्र धोनीला संघातून वगळण्याचा निर्णय हा योग्यच आहे, असे तो म्हणाला.
Share:

फ्रेंच ओपनमधील भारताचे आव्हान संपुष्टात


 पॅरिस ।  वृत्तसंस्था
सायना नेहवाल पाठोपाठ बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीत पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडले. फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सर्वच भारतीय खेळाडू बाहेर पडल्यामुळे स्पर्धेतील भारताचे आव्हानदेखील संपुष्टात आले आहे.
महिला एकेरीत जागतिक क्रमवारीतील नंबर दोन खेळाडू पी. व्ही सिंधूचा सामना सातव्या मानांकित ही बिंगजाओ सोबत होता. बिंगजाओने अवघ्या 40 मिनिटांत सिंधूला 13-21, 16-21 फरकासह सरळ दोन सेटमध्ये हरवत उपांत्यफेरीत प्रवेश केला. सायना नेहवालचाही चीनची नंबर एक खेळाडू ताई झू यिंगकडून पराभव झाला. सायनाला 22-20, 21-11ने सरळ दोन सेटमध्ये तिने हरवले.
पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतचा सामना जपानचा नंबर एक खेळाडू मोमोटो बरोबर होता. मोमोटोने श्रीकांतला 21-16, 21-19 ने हरवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पुरुष दुहेरीत उपांत्यफेरीत सात्विकराज आणि चिराग शेट्टीची जोडी बाहेर पडली आहे. इंडोनेशियाची नंबर एक जोडी मार्कस फर्नल्डी आणि केविन सुकामुल्जो यांच्याकडून 21-16, 26-24 ने त्यांचा पराभव झाला. या पराभवासह भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
Share:

भाजप आमदाराचा महिलेवर बलात्कार?


नवी दिल्ली । वृत्तसंस्था 
भारतीय जनता पक्षाचे गुजरात येथील माजी आमदार छबील पटेल यांच्या विरोधात दिल्लीतील एका महिलेने बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. एनजीओ स्थापन करण्यासाठी मदत करण्याचे आमिष दाखवून, 2017 मध्य त्या आमदाराने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. 
एका कार्यक्रमादरम्यान या महिलेची आमदाराशी ओळख झाली होती. मी राजकीय नेता आहे आणि आपल्या उत्पन्नाचे 20 टक्के गरीबांवर खर्च करतो, असे त्या आरोपी आमदाराने तक्रारदार महिलेला सांगितले होते. त्यानंतर तिला एनजीओ स्थापन करण्यासाठी मदत करण्याचेही आश्वासन त्यांने दिले होते.
त्या आश्वासनावरुन मदत मागितल्यानंतर त्याने पीडितेला एका ठिकाणी बोलावून चहामध्ये औषध टाकून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला होता. दरम्यान तिच्या आक्षेपार्ह फोटो काढून तिला तो नेहमी धमकावत होता. या त्रासाला कंटाळून शेवटी तिने त्या आमदाराच्या विरोधात तक्रार नोंदवली. तसेच, आरोपीला एनजीओसाठी 7 लाख रुपये दिले असून त्याने अद्यापही ते परत केले नसल्याचाही उल्लेख तिने तक्रारीमध्ये केला आहे. 
Share:

मोदी म्हणजे शिवलिंगावर बसलेला विंचू

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांची टीका

 नवी दिल्ली । वृत्तसंस्था 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत. तुम्ही त्या विंचवाला हाताने उचलू शकत नाही. कारण, तो चावण्याची भीती असते. तसेच तुम्ही त्या विंचवाला चप्पलनेसुद्धा मारु शकत नाही. कारण त्यामुळे धर्म भ्रष्ट होण्याची भीती आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते बंगळुरू येथे आयोजित ‘लिट फेस्टीवल’मध्ये रविवारी स्वतः लिहिलेल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात बोलत होते.
शशी थरुर यांनी ‘द पॅराडॉक्सिकल प्राईम मिनीस्टर’ या पंतप्रधान मोदींवर लिहिलेल्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशन केले. प्रकाशनाच्या वेळी त्यांनी पुस्तकातील काही किस्से उपस्थितांसमोर मांडले. या पुस्तकामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका संतापलेल्या अज्ञात स्वयं सेवकाचे, पंतप्रधान मोदींबद्दलचे मत नोंदवले आहे. त्यामध्ये त्या व्यक्तीने पंतप्रधान मोदींना शिवलिंगावरील विंचू संबोधले आहे, असे थरुर यांनी सांगितले. 
मी या पुस्तकामध्ये मोदींचे हिंदुत्त्वाबद्दलचे विचार मांडलेले नाहीत. तर, त्यांच्या  वैयक्तीक जीवनाबद्दल मी लिहिले आहे, असे थरुर यांनी या पुस्तकाबाबतचे स्पष्टीकरण दिले. या पुस्तकाच्या पहिल्या भागामध्ये मोदींचे चरित्र रेखाटले आहे. तर, इतर भागांमध्ये पंतप्रधान पदावर असतांना त्यांच्या कार्यकाळाचे वास्तव मांडले असल्याचेही थरुर यांनी यावेळी सांगितले.
Share:

कल्याण नाट्य परिषदेच्या दिग्दर्शन कार्यशाळेचा 12 शिबिरार्थींना लाभ


 कल्याण । प्रतिनिधी 
रंगकर्मीकरीता सातत्याने उपक्रम राबविणारी उपक्रमशील नाट्य परिषद कल्याण शाखेची दिग्दर्शन कार्यशाळा नुकतीच ज्येष्ठानंद भवन येथे संपन्न झाली. कार्यशाळेच्या नियम व अटीनुसार निवडक दिग्दर्शकांनाच यात सहभागी होता होणार होते. त्यानुसार निवडक बारा शिबिरार्थींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला. कल्याणातील ज्येष्ठ रंगकर्मी रविंद्र लाखे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
कल्याण शहरातील नाट्य चळवळीला गती व दिशा मिळावी या हेतुने कल्याणमधील नाट्य परिषद विविध उपक्रम राबवत असते. राज्यनाट्य स्पर्धा नजरेसमोर ठेवून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे कल्याण शाखा अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी सांगितले. दरम्यान या कार्यशाळा समाप्तीनंतर ज्येष्ठ रंगकर्मी अरविंद केळकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Share:

लोकपयोगी उपक्रमांना नेहमीच सहकार्य करू!पेण । प्रतिनिधी 
आजच्या धकाधकीच्या काळात माणसांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. अशा शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याची चिकित्सा व योग्य उपचार होतात. लोकोपयोगी स्तुत्य उपक्रमांना सहकार्य करण्याची जेएसडब्ल्यु व्यस्थापनाची भूमिका राहिली असून भविष्यातही अखंडीत राहिल असे प्रतिपादन जेएसडब्लूचे जनसंर्पक अधिकारी आत्माराम बेतकेकर यांनी वडखळ येथे आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन प्रसंगी केले.
ग्रामपंचायत वडखळ, जेएसडब्ल्यू स्टील व सुयश हाॉस्पिटल नवीमुंबई यांच्यातर्फे वडखळ येथील जय किसान विद्यामंदिर येथे आयोजित मोफत आरोग्य शिबिराप्रसंगी जेएसडब्लूचे जनसंर्पक अधिकारी आत्माराम  बेतकेकर, वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश मोकल, उपसरपंच रंविद्र म्हात्रे, माजी सरपंच योगेश पाटील, सुयश हॅास्पिटलचे डॉ.धवल दिराश्री, डॉ.लता दिराश्री आदिसह ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.
Share:

अंबरनाथमध्ये स्वस्त दरात फराळ साहित्य वाटप


अंबरनाथ । प्रतिनिधी 
ऐन दिवाळीत सामान्य नागरिक महागाईच्या ज्वाळात होरपळत असताना अंबरनाथमध्ये शिवसेना शहर शाखा आणि आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी मदतीचा हात दिला आहे. रविवारी अंबरनाथ पूर्व येथील गावदेवी मैदानात स्वस्त दरात दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जवळपास 5 हजारहून अधिक नागरिकांनी या साहित्य वाटपाचा लाभ घेतला. 
या कार्यक्रमाला खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दूलभाई शेख, गटनेते राजेश शिर्के, माजी नगराध्यक्ष सुनिल चौधरी, विजय पवार, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, उपशहर प्रमुख पुरुषोत्तम उगले, संभाजी कळमकर, संजय सावंत, परशुराम पाटील, गणेश कोतेकर, चंदा गान, मिलिंद गान यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व नगरसेवक, युवासेनेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Share:

महर्षी दयनानंद महाविद्यलयाचा उपक्रम

 महर्षी दयनानंद महाविद्यलयाचा उपक्रम

मुंबई । प्रतिनिधी
आपल्याला केवळ एखादी दुर्घटना घडल्यावरच भारतीय सेनेची आठवणे, मात्र सुखाच्या क्षणात, सणवरांत आपण भारतीय सेनेला विसरतो. या क्षणीही त्यांची आपल्याला आठवण यायला हवी, त्यांच्यामुळेच आपण प्रत्येक दिवस सुखाने घालवू शकतो, असे सैनिकांबद्दलचे कृतज्ञतेचे भाव अकरावीत शिकणार्‍या स्नेहा परब या विद्यार्थीनीने व्यक्त केले. परळच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात आयोजित केलेल्या सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमात ती बोलत होती. 
दिवाळीनिमित्त सैनिकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महर्षी दयानंद कनिष्ठ महाविद्यालय इतिहास विभागाने व अल्टिमेट हायकर्स आणि ट्रॅव्हलर्स संस्थेतपर्फे 27 ऑक्टोबर रोजी सैनिक हो तुमच्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ईशान्य भारतातील सैनिकांना दिवाळीनिमित्त ग्रिटींग पाठवण्यात आली आहेत. एम.डी.महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय, रुईया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून125 ग्रिटींग कार्ड्स बनवली असून अल्टिमेट हायकर्स आणि ट्रॅव्हलर्सच्या माध्यमातून सैनिकांपर्यंत हे ग्रिटींग पोहोचवण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून योगेश अलेकटी व तुषार दुधाने उपस्थित होते.  प्रत्येक भारतीयाला भारतीय सैनिकाबद्दल आदर नक्कीच आहे. आणि हाच आदर व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयाने पुढाकार घेतला असल्याचे प्राचार्या डॉ.छाया पानसे यांनी सांगितले. तर उपप्राचार्या शारदा बिबावे यांनी कवी वसंत बापट यांची कविता सादर करत कार्यक्रमाची रंगत वाढवली. तर महाविद्यलायाच्या पर्यवेक्षक रोहिनी गोडबोलेही यावेळी उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांचा सैनिकांप्रती असणार्‍या भावना सैनिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे कार्यक्रमाचे आयोजक सुशांत भोसले यांनी सांगितले.
Share:

डिजिटल प्रशिक्षणातून घडणार स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी

अंबरनाथमध्ये खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारणार प्रशिक्षण भवन
या भूखंडावरील 6300 चौरस मीटर जागेवर एमपीएससीभवन उभारण्यासाठी नगरोत्थान योजनेतून सुमारे 3 कोटी 11 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी दुमजली इमारतीत गरीब गरजू मुलांसाठी स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण केंद्र, अभ्यासिका आणि अद्ययावत पुस्तकांनी सुसज्ज पुस्तक पेढी उभारण्यात येणार आहे. तसेच, पाच डिजिटल रूम्सही बांधण्यात येणार आहेत.

 अंबरनाथ । प्रतिनिधी
अंबरनाथमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना हक्काचे प्रशिक्षण भवन उपलब्ध होणार आहे. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे या संकल्पनेतून हे प्रशिक्षण भवन साकारण्यात येणार असून रविवारी खासदार डॉ.शिंदे यांच्या हस्ते याचे भूमिपूजन झाले. सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून साकारणार्‍या या एमपीएससी भवनमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शनाबरोबरच सुसज्ज अभ्यासिकाही मिळणार आहे. येत्या तीन महिन्यांत हे एमपीएससी भवन विद्यार्थ्यांसाठी खुले होईल, असे खा. डॉ. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत या प्रकल्पाला निधी उपलब्ध झाला आहे. अंबरनाथ आणि परिसरात स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणार्‍या गुणवान विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे; परंतु येथे प्रशिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांना खासगी कोचिंग क्लासेसवर अवलंबून राहावे लागते. मात्र, त्यांची फी सर्वांनाच परवडणारी नसल्यामुळे गरीब विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. हे लक्षात घेऊन अंबरनाथ नगर परिषद हद्दीत शैक्षणिक सुविधेकरिता आरक्षित असलेल्या वडवली येथील आरक्षण क्र. 121 या भूखंडावर एमपीएससीभवन उभारण्याची संकल्पना खा. डॉ. शिंदे यांनी मांडून त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. रविवारी भूमिपूजन प्रसंगी जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डॉ. बालाजी किणिकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, नगराध्यक्ष मनिषा वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दुल शेख, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, शिवसेना गटनेते राजेश शिर्के, नगरसेवक सुभाष साळुंके आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Share:

पानसरे-दाभोलकर करण्याची छगन भुजबळ यांना धमकी

  नाशिक । प्रतिनिधी
मनुस्मृतीला विरोध केल्यास तुमचा ‘पानसरे-दाभोलकर’ करु, अशा आशयाच्या पत्राद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अज्ञातांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.  
नाशिकमधील ‘भुजबळ फार्म’वर हे निनावी पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे हे पत्र कोणी पाठविले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. दरम्यान, यासंदर्भात राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली आहे.
..तर मनुस्मृती पुन्हा-पुन्हा जाळेन!

मनुस्मृती जाळल्यावर जर कोणी मला धमकावत असेल, तर मी अशा धमक्यांना जुमानत नाही. महात्मा फुलेंनी ज्या मनुस्मृतीला जाळा म्हटले, ती पुन्हा पुन्हा जाळणार. समतेच्या मार्गावर चालतच राहणार. कोणाला काय करायचे ते करत रहावे, असे सडेतोड उत्तर  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे.
छगन भुजबळ यांना निनावी धमकीचे पत्र मिळाले होते. यात संभाजी भिडे आणि मनुस्मृती विरोधात बोललात, तर तुम्हाला ठार करू, असे लिहिले होते.  तुमचाही कुलबुर्गी, पानसरे व दाभोळकर करू, असा आशय या पत्रात होता. 
महात्मा फुलेंनी पाच हजार वर्षे बहुजनांवर अन्याय करणारी मनुस्मृती जाळून टाका, हे जाहीरपणे सांगितले. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही मनुस्मृती जाळली होती. त्यांनी देशाला संविधान दिले. समतेचा विचार दिला. मी देखील त्याच मार्गाने जाईन, असे ते म्हणाले.
Share:

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support