Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, October 6, 2018

दादर, माहिम किनारा स्वच्छतेसाठी 11 कोटी 66 लाख


अधिकार्‍याच्या मुलाला चौपाट्या स्वच्छतेचे कंत्राट 
मुंबई । प्रतिनिधी
कचरा आणि निर्माल्यामुळे अस्वच्छ दिसणार्‍या दादर, माहिम चौपट्यांची स्वच्छता करण्यासाठी पालिकेने जल खात्यातील अधिकार्‍याच्या मुलालाच कंत्राट दिल्याने नगरसेवकांत संताप व्यक्त होत आहे. मात्र, स्थायी समिती अध्यक्षांनी नगरसेवकांचा विरोध डावलून प्रस्ताव मंजूर केला. दादर आणि माहिम चौपाट्यांच्या स्वच्छतेसाठी 6 वर्षांसाठी 11 कोटी 66 लाख रुपयाचे कंत्राट देण्यात आले आहे. 
या संदर्भात स्थायी समितीत मंजुरीसाठी प्रस्ताव आला असता, शिवसेना नगरसेवक मिलिंद वैद्य यांनी त्याला विरोध केला. ज्या कंत्राटदाराला दादर आणि माहीम चौपाटी स्वच्छ करण्याचे कंत्राट दिले आहे. त्याने यापूर्वीही स्वच्छता नीट राखली नाही. हे कंत्राट ज्या कंपनीला दिले आहे, त्या कंपनीत एक संयुक्त भागीदार असलेले आदित्य गोडसे यांचे वडील पालिकेत जल खात्यात उपप्रमुख जल अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे कंपनीला कंत्राट द्यायचे की नाही याबाबत पालिका विधी खात्याकडून अभिप्राय मागविण्यात आले होते. त्यावर दोन अभिप्राय आले असून यात उपअभियंता सुनील गोडसे यांचा कंत्राट मिळवून देण्यात कोणताही सहभाग असता कामा नये, त्यांची बदली पाणी खात्यातून घनकचरा खात्यात करता कामा नये, कंत्राट मिळवून देण्यासाठी, त्यांनी दबाव टाकू नये, अशा सूचना असल्याचे वैद्य यांनी सांगत विरोध दर्शवला. यावर प्रशासनाने विधी खात्याकडून अभिप्राय मागवून तो स्थायी समितीच्या बैठकीत सादर करावा, असे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी देत प्रस्ताव मंजूर केला. मात्र, यानंतर नगरसेवकांनी अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली.
अधिकार्‍यांच्या मुलाला कंत्राट देणे चुकीचे असून याबाबत विधी खात्याचे मत पुन्हा मागविण्यात यावे.-प्रभाकर शिंदे, भाजप, नगरसेवक
अधिकार्‍याच्या मुलाला हे कंत्राट देण्यात येणार असेल तर ही गंभीर बाब असून प्रशासन चुकीचा पायंडा पाडत आहे. पालिकेत काम करणार्‍या अधिकारी, कर्मचारी यांच्या नातेवाईकांना कोणतेही कंत्राट काम देऊ नये. पालिकेचा कारभार पारदर्शक असावा.- रवी राजा, विरोधी पक्षनेते, महापालिका
जर नगरसेवकांना व त्यांच्या नातेवाईकांना पालिकेचे कंत्राट घेता येत नाही, त्यासाठी निकष ठरवण्यात आले आहेत. तर मग पालिका कर्मचारी, अधिकार्‍यांना बंधन का नाही.विशाखा राऊत, सभागृह नेत्या
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support