This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

अष्टमीच्या प्रसादातून 150 जणांना विषबाधा


  सांगली । प्रतिनिधी
जत तालुक्यातील निगडी बुद्रुकमध्ये प्रसाद खाल्ल्याने दीडशे जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. दुर्गामाता देवीच्या अष्टमी यात्रेतील शिरा खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. विषबाधा झालेल्या ग्रामस्थांना परिसरातील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
जिल्ह्यातील निगडी बुद्रुकमध्ये गुरुवारी नवरात्र निमित्ताने गावात दुर्गादेवीच्या  यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील मंडळाकडून अष्टमीच्या निमित्ताने बुधवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या महाप्रसादतील शिरा शिल्लक राहिला होता. तो शिरा गुरुवारी सकाळी मंडळाकडून गावातील ग्रामस्थांना वाटप करण्यात आला होता.
प्रसाद खाल्ल्यानंतर, नागरिकांना उलट्या, पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला.  तर काहींची प्रकृती अत्यवस्थ झाली. यामुळे गावात मोठी खळबळ उडाली. यानंतर गावातील इतर नागरिकांनी रुग्णांना परिसरातील खासगी व शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रसादामुळे सुमारे 150 जणांना विषबाधा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. यामध्ये लहान मुलांसहित महिला व पुरुष यांचाही समावेश आहे.
निगडी बुद्रुकमध्ये गुरुवारी नवरात्र निमित्ताने गावात दुर्गादेवीच्या  यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील मंडळाकडून अष्टमीच्या निमित्ताने बुधवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्या महाप्रसादतील शिरा शिल्लक राहिला होता. तो शिरा गुरुवारी सकाळी वाटण्यात आला.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support