Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 8, 2018

20 कोटी रुपयांसाठी व्यापार्‍याचे अपहरण करणार्‍या तिघांना अटक


ज्या टेम्पोमधून दर्शनचे अपहरण केले होते त्याचा पत्ता पोलिसांनी शोधला. पोलीस आपल्या मागावर असल्याचा सुगावा लागल्यानंतर आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता खेड-शिवापूर रस्त्यावर पाठलाग करत आरोपींच्या गाडीला घेरले आणि त्यातील तिघांना ताब्यात घेतले.
  पुणे । प्रतिनिधी
टिंबर मार्केटमधून एका व्यापार्‍याचे अपहरण करुन 20 कोटी रुपयांची खंडणी मागणार्‍या तीन जणांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. अपहृत व्यापार्‍याची पोलिसांनी सुखरुप सुटका केली आहे. शनिवारी संध्याकाळी या व्यापार्‍याचे अपहरण करण्यात आले होते. दर्शन महेंद्र निफजिया (27) असे अपहरण झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी शहाबाज फिरोज खान (28), सुयश वाघमारे (28) आणि आणखी एक अशी तिघांना अटक केली. तर त्यांचे आणखी दोन साथिदार फरार आहेत. 
अपहृत दर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ते भवानी पेठेतील घरातून दुकानाकडे जाण्यासाठी निघाले होते. घरापासून काही अंतर गेल्यानंतर आरोपींना त्यांना जबरदस्तीने आपल्यासोबत नेले आणि काही अंतर गेल्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून एका टेम्पोत बसवून त्यांचे अपहरण केले. पुढे आरोपीपैकी एकाने दर्शन यांचा फोन काढून घेतला आणि तक्रारदार महेंद्र यांना फोन करुन ‘तुमच्या मुलाचे अपहरण केले असून त्याला जिवंत पाहायचे असेल तर 20 कोटी रुपये द्या’ अशी खंडणीची मागणी केली.  
याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी अपहृत दर्शनला सोडविण्याची मोहीम हाती घेतली. महेंद्र यांना आरोपींचा दुसरा फोन आल्यानंतर पोलिसांच्या सांगण्यानुसार त्यांनी 15 लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यानुसार कोंढव्यातील ज्योती हॉटेल परिसरात एक इसम पैसे घेण्यासाठी आला असता, पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत आरोपींनी व्यापार्‍याला वडकी येथे ठेवल्याचे सांगितले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support