Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 8, 2018

24 ते 25 ऑक्टोबरला मिळणार मोबदला


मुंबई बडोदा महामार्गातील बाधित शेतकर्‍यांना दिवाळी बोनस
  टिटवाळा । प्रतिनिधी
मुंबई बडोदा द्रुतगती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 या महामार्गासाठी बाधित झालेल्या शेतकर्‍यांना 24 ते 25 ऑक्टोबर या दोन दिवसात मोबदला देण्यात येणार आहे. त्यामुळे या बाधित शेतकर्‍यांची दिवाळी आनंदात जाईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. या महामार्गाच्या भूसंपादनाचा अंतिम निवाडा 31 मार्च रोजी जाहिर करण्यात आला होता. 24 ऑक्टोबरला कोंढेरी, पिंपळोली, मांजर्लि, गोवेली, आपटी तर्फे बार्‍हे या पाच गावातील शेतकर्‍यांना तर 25 ऑक्टोबरला नांदप, सांगोडे, वाहोली या तीन गावातील शेतकर्‍यांना मोबदला वाटप करण्यात येणार आहे.
कल्याण तालुक्यातून मुंबई नागपूर आणि मुंबई बडोदा असे दोन राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. त्यासाठी कल्याण तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन बाधित होणार आहे. त्यामुळे जमीन संपादित करण्यासाठी शासकीय यंत्रणेला अनेक वेळा शेतकर्‍यांच्या संघर्षाला सामोरे जावे लागले. मुंबई - बदोडा द्रुतगती राष्ट्रीय मार्गासाठी कल्याण तालुक्यातील अंदाजे 160 हेक्टर जमीन बाधीत होत आहे. त्यापैकी 8 गावातील अंदाजे 70 हेक्टर जमिनीचा मोबदला सध्या वाटप करण्यात येणार आहे. एकूण 160 हेक्टर जमिनीकरिता सुमारे 648 कोटी रुपयांचा मोबदला शासनाकडून वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी सध्या 165 कोटी रुपयांचा मोबदला शासनाकडून कल्याण उपविभागीय कार्यालयात प्राप्त झाला असून तो येत्या 24 ते 25 ऑक्टोबरपासून थेट शेतकर्‍यांना वाटप करण्यात येणार आहे.
मोबदला घेण्यासाठी शेतकर्‍यांनी कुणालाही मध्यस्थी न करता थेट उपविभागीय अधिकारी कल्याण यांच्या कार्यालयाशी संपर्क साधत आपल्या जमिनीचा मोबदला घ्यावा अशा प्रकारचे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी शेतकर्‍यांना केले आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support