Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

घणसोलीतील विकासकामांचे 25 प्रस्ताव मंजुरीसाठी सादर

  नवी मुंबई । प्रतिनिधी
गेली अनेक वर्षे विकासापासून वंचित असलेल्या घणसोली विभागातील गटारे, पदपथ रस्ते आदी कामे करण्यासाठी 25 प्रस्ताव प्रभाग समितीत मंजुरीसाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने ठेवण्यात आले आहेत. 
घणसोली गावठाण वगळता सिडको विकसीत संपूर्ण विभाग सुरुवातीपासून सिडको अख्त्यारित होता. 30 वर्षापुर्वी सिडकोने तयार केलेले मुख्य अंतर्गत रस्ते, पदपथ, गटारे आदी सुविधांची सध्या मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. महापालिकेला आम्ही टॅक्सचा भरणा करतो, परंतु महापालिका घणसोली विभागात कोणत्याही सुविधा पुरवित नाही अशी भावना येथील नागरिकांची झाली होती. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत घणसोली विभागातून अनेक नगरसेवक निवडून गेले तरी देखील महापालिकेने गेली 25 वर्षे एकही रुपयांचे विकासकामे घणसोली विभागात केलेली नाहीत. 
घणसोली विभाग सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेकडे नुकताच हस्तांतरण करण्यात आला आहे. गेल्या वर्षी घणसोली विभागातील सर्व रस्ते, गटारे व पदपथाचे काँक्रीटीकरण करण्याचे एकत्रित सुमारे 80 कोटीचे निविदा प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. महापालिकेच्या या निविदांना ठेकेदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने वर्षभरानंतर पदपथांची सुधारणा, रस्त्यांची दुरुस्ती, गटारांची दुरुस्ती, दिवाबत्ती सुधारणा अशी 1 लाख ते 5 लाख खर्चाचे एकूण 25 विविध कामे घणसोली विभागात करण्याचे प्रस्ताव शहर अभियंता विभागाच्यावतीने सोमवार 22 ऑक्टोबर रोजी होणार्‍या फ प्रभाग समितीपुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. महापालिका प्रशासनाने घणसोली विभागातील विकासकामांना सुरुवात केल्याने नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असल्याचे नगरसेविका उषा पाटील यांनी सांगितले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support