Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, October 6, 2018

भिवंडीतील 34 गावांचा पाणी प्रश्न मिटला


34 गावांसाठी 8.49 दशलक्ष लिटर वाढीव पाणीकोटा, खा.कपिल पाटील यांचा पाठपुरावा 
भिवंडी । प्रतिनिधी 
भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागातील ग्रामस्थांची पाणीटंचाईतून मुक्तता झाली असून, भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने जलसंपदा विभागाने 34 गावांसाठी 8.49 दशलक्ष लिटर वाढीव पाणीकोटा मंजूर केला आहे. या निर्णयामुळे हजारो ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, खासदार पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन आभार मानले आहेत.
भिवंडी तालुक्यातील 34 गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी 1982 मध्ये योजना सुरू झाली. त्यावेळी प्रतीमाणशी 40 लिटरप्रमाणे पाणी पुरविण्यासाठी 11 दशलक्ष लिटर पाणीकोटा मंजूर करण्यात आला. मात्र, 2018 पर्यंत लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतरही केवळ 11 दशलक्ष लिटर पाणी पुरविले जात होते. त्यामुळे या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासत होती. वर्षानुवर्षांपासून रखडलेल्या या प्रश्नाकडे खासदार कपिल पाटील यांच्याकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला जात होता. या संदर्भात मंत्रालयात बैठकही झाली होती.  या टंचाईची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. त्यानंतर जलसंपदा विभागाचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्टेमला 8.49 दशलक्ष लिटर वाढीव पाणी देण्याचा आदेश दिला आहे. या संदर्भात 26 सप्टेंबर रोजी स्टेमला निर्देश देण्यात आले. या वाढीव पाणीकोट्यामुळे भिवंडीच्या ग्रामीण भागाची पाणीटंचाई दूर होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे खासदार  पाटील यांनी आभार मानले आहेत.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support