Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

भवानीमातेच्या मंदिरास 358 वर्षे पूर्ण

किल्ले प्रतापगडावर 358 मशालींची आकर्षक रोषणाई

  महाबळेश्वर । प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांच्या देदीप्यमान पराक्रमाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड शुक्रवारी 358 मशालींच्या प्रकाशाने उजळून निघाला. प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास 358 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही रोषणाई करण्यात आली होती. नवरात्र उत्सवात चतुर्थीला राज्यभरातून हजारो शिवभक्तांनी प्रतापगडावर हजेरी लावून हा ‘मशाल महोत्सव’ याची देही याची डोळा अनुभवला.
चतुर्थीदिवशी भवानी मातेची विधिवत पूजा व गोंधळ झाल्यानंतर रात्री आठच्या दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात ‘जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या जयघोषात मशाली प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
किल्ल्याच्या चहुबाजूंनी विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तर भवानी माता मंदिर ते बुरुजापर्यंत लावण्यात आलेल्या मशालींमुळे गड व परिसर उजळून निघाला होता.
प्रतापगडवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास नवरात्रौत्सवातील चतुर्थीला 358 वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने शुक्रवारी किल्ल्यावर 358 मशाली प्रज्वलित करण्यात आल्या होत्या तसेच किल्ले प्रतापगडावर दोन घट बसविण्यात आले होते. एक घट शिवाजी महाराजांच्या नावाने. कारण छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तर दुसरा घट हा राजाराम महाराज यांच्या नावाने बसवला जातो. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support