Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

अपघातानंतर 6 तास मृतदेहाची फरफट

 रेल्वेच्या मुर्दाडपणामुळे ‘त्याने’ सोडले प्राण

ठाणे । प्रतिनिधी
 कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्यानंतर रेल्वेने बेपवाई दाखवल्याने या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. त्याहूनही मुर्दाडपणा व असंवेदनशीलतेचा कळस म्हणजे हा मृतदेह दिवा ते ठाणेदरम्यान सोमवारी सकाळी लोकलच्या तुडुंब गर्दीतून ठाणे सिव्हिलमध्ये आणण्यात आला. सहा तासांहून अधिक काळ या मृतदेहाची फरफट सुरू असल्याने रेल्वेच्या मुर्दाडपणावर संताप व्यक्त होत आहे.
कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेनंतर दिवा ते तळोजादरम्यान जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचारासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली असती तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, अशी प्रतिक्रियाही उमटत आहे. 
दिवा ते तळोजा स्थानकादरम्यान रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास कोकणकन्या एक्स्प्रेसच्या धडकेत एक व्यक्ती जखमी झाला. मात्र रेल्वे प्रशासनाला ही माहिती रात्री अडीच वाजता मिळाली. पण, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगत रात्री 2.30 ते सकाळी 6.30 वाजेपर्यंत प्रशासनाने कोणताीच पावले उचलली नसल्याने या व्यक्तीचा मृत्यू झाला.आला.  दिवा स्थानकात मृतदेह आल्यानंतर पुढील प्रक्रियेकरता ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात मृतदेह नेण्यासाठी चक्क लोकलचा उपयोग करण्यात आला. सकाळी सव्वाआठच्या म्हणजेच ऐन गर्दीच्या काळात मृतदेह लोकलने ठाण्यात आणण्यात आला. 
मृतदेहाची परवड
सोमवारी सकाळी सहाला दिव्यातून जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला इमर्जन्सी हॉल्ट देऊन हमाल व रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. तिथे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतरही रुग्णवाहिके अभावी पुन्हा दिवा स्थानकात परत येण्यासाठी रोहा-दिवा पॅसेंजरची वाट पाहावी लागली. अखेर सकाळी साडेआठ वाजता हा मृतदेह दिवा स्थानकात आणण्यात आला.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support