This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

72 वर्षीय महिलेला फेसबुक फ्रेंडने घातला 7 लाखांना गंडा


  पुणे । प्रतिनिधी
कोंढवा परिसरात राहणार्‍या एका 72 वर्षीय महिलेला फेसबुकवर अनोळखी व्यक्तीशी मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. अनोळखी व्यक्तीने परदेशातून महागडे रोलॅक्स घड्याळ पाठविल्याचे सांगून 6 लाख 81 हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. 
कोंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे यांना दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या गृहिणी असून त्यांचे पती सैन्यात नोकरीला होते. चार महिन्यांपूर्वी त्यांना फेसबुकवर आकाश अहिरवार याने रिक्वेस्ट पाठवली. ती त्यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांच्यामध्ये चॅटिंग सुरू झाले. आरोपीने त्याचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर फिर्यादी यांना पाठवला. त्यामुळे त्यांचे व्हॉट्सअ‍ॅपवरही चॅटींग आणि व्हिडीओ कॉलद्वारे बोलण होत. व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग सुरू झाल्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली. त्यावेळी आकाशने आपण  इटलीत सिव्हील इंजिनियर असल्याचे सांगितले. 
काही दिवसांनी चॅटिंग दरम्यान आकाशने तक्रारदारांना 8 ऑक्टोंबर रोजी महागडे रोलॅक्स घड्याळ घेतल्याचे सांगितले. घड्याळाचे फोटो देखील त्यांना पाठवले. गिफ्ट पाठवण्यासाठी त्याने तक्रारदारांना पत्ता घेवून त्यावर ते पाठविल्याचे सांगितले. दोन दिवसांनी त्यांना दिल्ली येथून फोन आला. त्यांना इटली येथून भेट आली असून, त्यासाठी कस्टम ड्युटी म्हणून 35 हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी नमूद खात्यावर रक्कम भरली. त्यानंतर तक्रारदांना पुन्हा फोन आला व तुम्हाला आलेल्या पार्सलमध्ये 40 हजार युरो निघाले असून त्याचा दंड म्हणून 1 लाख 13 हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदार यांनी पुन्हा रक्कम भरली.
दोनदा रक्कम भरल्यानंतर पुन्हा अनेक फोन आले व वेगवेगळी कारणे सांगून त्यांना 6 लाख 81 हजार रुपये भरण्यास भाग पाडले. तक्ररादार यांच्याकडून वेळोवेळी रुपये घेऊनही त्यांना भेटवस्तू ताब्यात मिळाली नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support