Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

धम्मचक्र प्रवर्तनाची गती

माणसाचं माणूसपण नाकारणार्‍या व्यवस्थेला 14 ऑक्टोबर 1956 साली नागंवशीयांच्या नागपुरात लाखो वंचित, शोषितांनी हादरा दिला. जगातील सर्व धर्मांचा अभ्यास करून मानवी आचरणावर आधारित बुद्ध धम्म वंचितांचे मुक्तीदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह स्वीकारला. ही धम्मक्रांती जागतिक स्तरावर एक ऐतिहासिक घटना म्हणून नोंदवल्या गेली. या धम्मचक्र प्रवर्तनाला 14 ऑक्टोबर 2018 रोजी सुमारे 62 वर्षांचा काळ लोटला. भारतात रूजलेला, वाढलेला आणि अखंड विश्वासाठी मार्गदीप ठरलेल्या या विज्ञानाधारित बुद्ध धम्माने वंचितांच्या जीवनात आजवर कोणता क्रांतीकारी बदल घडवला? याची चर्चा कायमच होत आली आहे. परंपरेचं गाडगं, मडकं झुगारून देत विज्ञानवादी बुद्ध धम्माचे सर्वार्थाने पालन करणार्‍यांनी त्यांना याचे कधीच उत्तर देऊ न टाकले आहे. परंतु, धम्मदिक्षा घेतल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत 6 डिसेंबर 1956 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्याने आपल्या अनुयायांत, भारतीयांत बुद्ध धम्म रूजविण्यासाठी बाबासाहेबांना पुरेसा वेळ मिळालाच नाही, यावर फारसा उहापोह होताना दिसत नाही. समाज परिवर्तनाचा रथ पुढे नेण्याची व तो पुढे नेता आला नाही तर मागे न नेता तिथवरच ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर सोपवण्यात आली त्यांनी काय केले? असे असंख्य प्रश्न आजही उपस्थित होत आहेत.‘ज्यांचे आचरण शुद्ध त्यांच्या मनी वसेल बुद्ध’ हा बुद्ध धम्माचा पाया असल्याने बाबासाहेबांनीही 22 धम्मप्रतिज्ञा देताना आपल्या अनुयायांकडून त्यांचे तंतोतंत पालन व्हावे, असे वचन घेतले. परंतु, बाबासाहेबांचे हे आग्रही वचन 14 ऑक्टोबरला दरसाल येणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन, जयंती, महापरिनिर्वाण दिन वगळता कितपत आठवणीत राहते? ज्या भिक्खु संघाच्या खांद्यावर आचरणावर आधारित बुद्ध धम्म जनसामान्यांत रूजविण्याची जबाबदारी होती ती त्यांनी पेलली का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती आदी संस्थांनी धम्मकार्य गतिमान करण्यासाठी कोणते व किती व्यापक कार्यक्रम राबविले? मंगल परिणय, साक्षगंध, स्मृती दिन, नामकरण सोहळे यापलीकडे लहान-थोरांत विचार प्रसविण्यासाठी विहार तेथे ग्रंथालये उभारली का? गाव, वस्तींत महापुरूषांच्या विचारांचा जागर पोहोचला का? बुद्ध धम्मातील आचार विचारांचे अनुसरण करण्यासाठी किती समाजव्यापी कार्यक्रम आपण राबवले? 62 वर्षांचा हा कालखंड डोळ्यांपुळे ठेवताना ही बेरीज-वजाबाकी आपल्याला‘अत्त दीप भव’ मी स्वयंप्रकाशित आहे!.. याची पदोपदी आठवण करून देण्यासाठी उपयोगी ठरावी. ज्ञानसूर्य, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व अशा अनेक उपाध्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरव करताना आपल्या प्रत्येकाची छाती गर्व आणि अभिमानाने फुलून जाते. मात्र अभ्यास, अखंड वाचन, सत्याचे आचरण, स्वाभिमान, विद्या, शील, यांना जीवनात कायम सर्वोच्च स्थान देणार्‍या बाबासाहेबांचा कोणता गुण वा विचारधन आपण दैनंदिन जीवनात अंगिकारले? हा प्रश्न जर जयांमुळे घास घेतो आणि जयांमुळेच श्वास घेतो, अशी  विचारश्रद्धा असलेल्या प्रत्येकाला का नाही पडावा? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने बुद्ध धम्माच्या आचरणाने अनेकांनी आजघडीला विविध क्षेत्रांत गरूडझेप घेतली आहे. काहींनी स्वतःच्या घरापुते पुढारलेपण वाढवून बाबासाहेबांच्या धम्म, सामाजिक, आर्थिक क्रांतीकडे किती गांभीर्याने पाहिले? आपण आपला उत्कर्ष साधल्यानंतर गरिबी, दारिद्य्राच्या खायीत खितपत पडलेल्या किती समाजबांधवांना बाहेर काढण्यासाठी मदतीचा हात दिला? माझा जयजयकार करण्यापेक्षा माझ्या विचारांचा जयजयकार करा, हे कायम सांगणार्‍या बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण आपण करत आहोत का? दरसाल बाबासाहेबांची जयंती थाटात साजरी करत असताना ज्ञान कमी आणि मनोरंजन भरपूर हे बाबासाहेबांच्या विचारांना अभिप्रेत आहे का? जयंत्यांवर वारेमाप पैसा खर्च करण्यापेक्षा एखाद्या गरीब कुटुंबातील मुला-मुलांनी शिक्षणासाठी, उद्योगासाठी मदत केल्यास हे धम्मचक्र अधिक गतिमान होणार नाही का? धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने हा दिवस अशोका विजया दशमीला तिथीनुसार साजरा करावा की 14 ऑक्टोबरला? अशी मूर्खाच्या नंदनवनात वावरणारी सोशल चर्चाही सुरू व्हावी, यापेक्षा दुर्दैव ते काय? हा अज्ञानाचा अंधकार दूर लोटून संपूर्ण मानवजातीचे प्रथम कल्याण, मध्यम कल्याण आणि अंतिमही कल्याण साधणारा बुद्ध धम्म अनुसरण्यासाठी आपण वर्ष, महिना दिवसाची वाट का पाहावी? दैववाद, कर्मकांड, अंधश्रद्धा, देवभोळेपणाला कुठेही थारा नसलेला बौद्ध धम्म महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतात पुनर्जिवित केला. या बुद्धत्त्वाची, प्रज्ञेची, करूणेची, प्राप्ती कोणताही मानव करू शकतो, हे देवत्त्व नाकारणारे सिद्धार्थ गौतम बुद्ध सांगतात. मग, याच बुद्धांना आणि बाबासाहेबांना आचरणाऐवजी देवघरात बसविण्याचा प्रयत्न झाल्यास किंबहुना विहारांची मंदिरे झाल्यास हे धम्मचक्र खरोखरचं गतिमान होईल का? यावर विचार आणि अमंल झाला पाहिजे!
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support