This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

इथे नाही प्रांतवादाला भीक!

पावसाने वर्दी दिल्यानंतर ज्याप्रमाणे बेडकाचं डराव डराव सुरू होतं तेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सुरू झालं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी इतकी वर्षे मुंबईत संशोधन केल्यानंतर‘उत्तर भारतीय लोक मुंबई चालवितात. त्यांनी काम बंद केल्यास मुंबई काय महाराष्ट्रही ठप्प होईल’, असा जावईशोध लावणारे वक्तव्य त्यांनी केलं आहे. मुंबईतील यू.पी, बिहारींची मते मिळविण्यासाठी त्यांनी केलेला हा खटाटोप धर्मनिरपेक्ष, देशहिताची सदाबहार गाणी गाणार्‍या काँग्रेसला मात्र अडचणीत आणणारा ठरणार आहे.
सर्व जाती-धर्म, भाषा बोलणार्‍या विविध प्रांतातील लोकांना सामावून घेणार्‍या मुंबईने कधीचं कुणाशीही भेदभाव केला नाही. पण, निरुपम यांनी प्रांतवादाची बांग देऊ न पुन्हा वादाच्या भिंती आपसांत उभ्या केल्या आहेत. निरुपम यांच्यासारख्या प्रांतवादी नेत्याला वर्षानुवर्षे गुण्यागोंविदाने नांदणारा मराठी व प्रत्येक प्रांतातील वर्ग भीक घालणार नाही, हेही तितकचं खरं. निरुपम यांच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांच्या प्रतिमेचे सर्वत्र जोड्याने सुरू झालेले पूजन हे त्यांना थेट उत्तर त्यांनी समजावं, हा इशारा मुंबईकरांनी कधीच दिला आहे. आजघडीला काही लाखांच्या घरात गेलेली मुंबईची लोकसंख्या सर्वांना आपल्या पोटात सामावून घेत आहे. हे जरी खरं असले तरी शांतताप्रिय, कमालीचा सहनशील असलेल्या मराठी माणसाने आता हे कुठवर सोसायचं? पाववाला, दूधवाला, पेपरची लाईन टाकणारा, मच्छिवाला, पानटपरीवाला ते अगदी शेतात राबायलाही उत्तर प्रदेश अथवा बिहारमधून आलेली लोक तयार असतात. कठोर परिश्रम करण्याची तयारीही हीच त्यांची जमेची बाजू असली तरी इथला मराठी माणूस अथवा अन्य मुंबईकर काहीच काम करत नाहीत का? मराठी माणूस हा धागा पकडून मुंबईत प्रांतीय राजकारणाच्या डरकाळ्या वर्षानुवर्षे फोडण्यात आल्या. परंतु हे राजकारण कितपत टिकले नी सामान्य मुंबईकरांनी हा भेदाभेद किती पाळला? मुंबईत फक्त उत्तर भारतीय किंवा बिहारीच परप्रांतीय आहेत का? बंगाली, तामिळ, उत्तर भारतीय, गुजराती, राजस्थानी अशा प्रत्येक राज्य व भूप्रदेशातील लोकांनी इथे विविधतेत एकता जपली आहे. ज्या प्रदेशाने आपल्याला भरभरून दिले तिथेच आपली ताकद अथवा बळ दाखवून तिथल्या लोकांना हिणवणे म्हणजेच निरुपमांच्या लेखी विविधतेत एकता आहे का? ज्या निरुपम यांना मुंबईने खासदार बनवून दिल्लीला पाठवले त्यांचा बोजाबिस्तर यानिमित्ताने बांधून त्यांच्या पाठवणीची तयारी तमाम मुंबईकरांनी केल्यास ते त्यांना रूचेल का? गाबरी भरल्यावर माणसाला आबंट-तुरट ढेकरं येऊ  लागतातं तेच निरुपम यांना झाल नसावं ना? शिवसेनेने व त्यापाठोपाठ मनसेने मुंबईत मराठी माणसाचे राजकारण केले असताना त्यांना देशप्रेमाचे पर्यायाने अनेकदा कायद्याचा धाक दाखवण्यात आला आहे. तोच धाक आणि खाक्या प्रांतवादाची नावाखाली राजकारण खेळणार्‍या निरुपम यांना दाखवता येईल का, याची तयारी आता मुंबईकरांनी करायला हवी. मुंबईत उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणावर मते आहेत. यापूर्वी ही मते काँग्रेसला मिळत. पण 2014च्या लोकसभा आणि विधानसभा तसेच गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांची बहुसंख्य मते भाजपला मिळाली होती. उत्तर भारतीय मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळावा म्हणून निरुपम यांनी प्रांतवादाचं राजकारण सुरू केलं आहे. फेरीवाले किंवा अन्य प्रश्न हातात घेऊन उत्तर भारतीय मतदारांना काँग्रेसकडे आकर्षित करण्यासाठी निरुपम यांचा हा पक्षीय कार्यक्रम आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्याने वर्षानुवर्षे इथे एका छताखाली राहणारी मने दुंभगली त्याचे काय? काँग्रेस, भाजप अथवा प्रांतवादाचे राजकारण करणार्‍या अनेक पक्षांचे कार्यक्रम निरुपम यांच्या नागपूरमधील शोनंतर जोषात सुरू होतील. परंतु सकाळी घराबाहेर पडणारा, कोंबोकोंबीत घामघुम होऊ न लोकल पकडणारा आणि प्रांतवाद नेमका कशाशी खातात याचा मागमूस नसलेल्या सामान्य मुंबईकरांना येत्या काळातही निरुपम आणि मंडळीचा हा कावा आता सावध राहून ओळखायला हवा. मुंबईकरांनी कधीही प्रांतवादाला थारा दिला नसला तरी ज्या गुजरात भूमीचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी देशाचे नेतृत्व करत आहेत तेथे प्रांतवाद कमालीचा उफाळून आला आहे. गुजरातमध्ये यूपी-बिहारींविरोधात हिंसक आंदोलनात 342 जणांना अटकही झाली आहे. गुजरातमधील साबरकाठा जिल्ह्यात एका 14 महिन्यांच्या बालिकेवर बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश आणि बिहारी नागरिकांवर हल्ले केले जात आहेत. जिवाच्या आकांताने उत्तर प्रदेश आणि बिहारमधून पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या कामगारांनी पलायन करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ज्या माणसांचा या घटनेशी व प्रवृत्तींशी काडीमात्र संबंध नाही, अशा लोकांना पिटाळून लावणे, मारहाण करणे कोणत्या लोकशाहीच्या चौकटीत बसते? संजय निरुपम यांच्यासारखे लोक परप्रांतीय राजकारण खेळून इथे भावना भडकावत आहेत. तरीही मुंबई शांत आणि सयंमी आहे, हीच मुंबईची खासियत आहे. मात्र आपली पोळी भाजण्यासाठी सामान्य माणसाला वेठीस धरून इथे सहनशीलतेची परीक्षा पाहू नये, हाच मुंबईकरांचा इशारा मानावा.
                                     -  विनोद साळवी
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support