This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 23, 2018

दिवा स्थानकातही अमृतसर दुर्घटनेची धास्ती

diva station map, diva station to thane station, diva station latest news, diva station east, diva station pin code, diva area, diva station to vasai train timetable, diva station code,ठाणे  (वसंत चव्हाण )।

धावा-धावा गाडी सातवर गेली, ही कोणत्याही उद्घोषणेविना सुरू असलेली घाईगडबड. आपल्या गाडीची वेळ चुकू नये, यासाठी जिवावर उदार होऊ न बिनधास्त रेल्वे रूळ ओलांडायचा. मागून-पुढून येणारी मेल, एक्स्प्रेस कशाचीही तमा न बाळगता दोन गाड्यांमध्ये असलेल्या चिंचोळ्या जागेत शिरून गाडी पकडायची, हा जीवघेणा प्रवास ठाणे शहराला लागून असलेल्या दिव्यातही अमृतसरसारख्या दुर्घटनेची पुनरावृत्ती घडवू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. या आधी घडलेल्या अनेक घटनांवरून दिवेकरांनो सांभाळा गाडी येत आहे, हा सावधानतेचा इशारा दररोज दिवा स्थानकातून लाखोंच्या संख्येने प्रवास करणार्‍या दिवावासीयांसाठी देण्याची गरज निर्माण झाली आहे.
पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहन कार्यक्रमावेळी रेल्वे रूळावर उभे राहून कार्यक्रम पाहणार्‍या नागरिकांना भरधाव रेल्वेने चिरडल्याने 60 हून अधिक जण ठार झाले होते. ही घटना ताजी असताना दिवा स्थानकात दररोज लाखोंच्या संख्येने प्रवास करणार्‍या व पादचारी पूल नसल्याने जीव धोक्यात घालणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवा स्टेशनवर दररोज शेकडो प्रवासी रेल्वेच्या नियमांना फाटा देऊ न रेल्वे रूळ ओलांडतात. त्यांच्यावर रेल्वेचे पोलीस अथवा कर्मचारी कुणाचेही नियंत्रण नसल्याने दिव्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
दिव्यात फलाट क्रमांक 7 वर लोकल पकडण्यासाठी प्रवासी बिनधास्त रेल्वे रूळावरून धावतात. हे दररोज सकाळचे चित्र रेल्वेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद होत असताना रेल्वेकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
दिवा जंक्शन हे ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा परिसरातील एक मध्यवर्ती रेल्वे स्थानक आहे. वसई रोड ते दिवा व दिवा ते पनवेल हे दोन महत्त्वाचे जोडमार्ग दिव्यामध्ये जुळतात. या दोन मार्गांमुळे उत्तरेकडून पश्चिम रेल्वेमार्गे येणार्‍या गाड्यांना मुंबई वगळून परस्पर कोकण रेल्वेमार्गे दक्षिणेकडील राज्यांकडे वाहतूक केली जाते.गेल्या पाच वर्षांत दिव्यात प्रचंड लोकसंख्या वाढली. येथे सकाळ, संध्याकाळ चढ- उतर करणार्‍या प्रवाशांच्या गर्दीनेही उच्चांक गाठला आहे. दिवा हे जंक्शन असले तरी मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा नमुना येथे जागोजाग पाहायला मिळतो. गाडी नेमकी कोणत्या फलाटावर येत आहे, ही उद्घोषणा होत नसल्याने ऐनवेळी लोकल आल्यावर प्रवाशांची धावपळ उडते व त्यांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे दिवा स्थानकात रेल्वे पोलीस विशेष लक्ष देतील का, असा सवाल रेल्वे प्रवाशी संघटना करत आहेत.
लवकरच पादचारी पुलाचे काम करण्यात येणार आहे. त्याची निविदाही काढण्यात आली आहे. या कामाचा पाठपुरावा सुरू आहे. एका महिन्यात कामाला सुरुवात होणार आहे. प्रवाशांनी आपल्या जिवाची काळजी घेतली पाहिजे. जे पादचारी पूल आहेत त्यांचा वापर केला पाहिजे. 
- श्रीकांत शिंदे, खासदार कल्याण लोकसभा
----------------------------------
दिवा रेल्वे स्थानकावर दिवसेंदिवस प्रवाशांची संख्या वाढत आहे. दिव्यात फक्त दोन पादचारी पूल आहेत. एका पादचारी पुलाचे काम सुरू आहे ते देखील संथगतीने सुरू आहे. लोकप्रतिनिधीनी दिवा स्थानकाकडे लक्ष दिले पाहिजे. 
- आदेश भगत, दिवा रेल्वे प्रवासी संघटना

By- Vasant ChavanTAGS: diva station map, diva station to thane station, diva station latest news, diva station east, diva station pin code, diva area, diva station to vasai train timetable, diva station code,

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support