This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

महापौर चषक शालेय कॅरम स्पर्धेत जतीन गोहिल अजिंक्य


 मुंबई । प्रतिनिधी
 व्हीएलएन हायस्कूलच्या जतीन गोहिलने शालेय 206 मुलामुलींच्या पहिल्या मुंबई महापौर चषक कॅरम स्पर्धेचे अजिंक्यपद चँम्पियन सिस्का कॅरम बोर्ड पुरस्कारासह पटकाविले. अंतिम आठव्या फेरीत जतीन गोहिलने आयईएस-दादर हायस्कूलच्या सिद्धांत शिंदेचे आव्हान 2-0 असे संपुष्टात आणले.  स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन, अभ्युदय स्पोर्ट्स-वेल्फेअर असो., आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व श्री सावता माळी भुवन ट्रस्ट यांच्यावतीने झालेल्या या स्पर्धेत टिळकनगर मनपा मुंबई पब्लिक स्कूलने टॉप-32 मधील सर्वाधिक पुरस्काराच्या बळावर मुंबई महापौर चषकाचा आंतर शालेय विशेष पुरस्कार पटकाविला.
उदयोन्मुख सबज्युनियर कॅरमपटू जतीन गोहिल विरुद्ध सिद्धांत शिंदे यामधील अंतिम लढत स्पोर्ट्स असोसिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेनचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर यांच्या वतीने शुभेच्छा देत टॉसद्वारे ब्रेकचा कौल दिला.  दोन्ही सेटमध्ये जतीनने सुंदर फटक्यांसह अचूक खेळ करून आघाडीचे सातत्य राखले. त्यामुळे जतीनने प्रतिस्पर्धी सिद्धांत शिंदेचा 16-5, 25-8 असा पराभव केला. सिद्धांत शिंदेला उशिरा सूर सापडल्यामुळे अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या शालेय महापौर चषक स्पर्धेनिमित्त शाळांमध्ये तज्ञांचे मोफत मार्गदर्शन कॅरम शिबीर देखील घेण्यात आले होते. मनपा शारीरिक शिक्षण उपविभाग, एल.आय.सी., राष्ट्रीय मिल मजदूर संघ व श्री सिद्धिविनायक मंदिर न्यास आदींचे स्पर्धेला सहकार्य लाभले होते.
पुरस्कार वितरण मुंबई-म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाण यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कॅरमपटू सुहास कांबळी, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, विजय झांजुरे, संयोजक नरेंद्र वाबळे व लीलाधर चव्हाण आदींच्या उपस्थितीत पार पडले.





Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support