Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

स्ट्रोक आजाराविषयी ठाणेकर अनभिज्ञ

  डिजिठाणेच्या सर्वेक्षणात उघड

ठाणे । प्रतिनिधी
जागतिक स्ट्रोक दिनाच्या पूर्वसंध्येला स्ट्रोकबाबतची जनजागृती करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने ज्युपिटर हॉस्पिटलच्या सहाय्याने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाण्यातील नागरिकांना स्ट्रोकबाबत किती प्रमाणात माहिती आहे, याबाबत डिजिठाणेने ज्युपिटर हॉस्पिटलसोबत एक सर्व्हेक्षण हाती घेतले होते.
या सर्व्हेक्षणानुसार, बहुसंख्य ठाणेकरांना स्ट्रोकची खरी कारणे तसेच स्ट्रोक आल्यानंतर काय करावे, याबाबत माहिती नसल्याचे आढळून आले असल्याची माहिती ठाणे पालिकेचे उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिली.
ठाणे महापालिकेची डिजिटल बाहू असलेल्या डिजिठाणेने आयोजित केलेल्या या आरोग्यविषयक जनजागृकता मोहिमेमध्ये ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी स्ट्रोकबाबतची अत्यंत महत्वाची माहिती, त्याची लक्षणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयीची माहिती उपस्थितांना दिली. 
ब्रेन अटॅक किंवा स्ट्रोकमुळे मेंदूला होणारा रक्तपुरवठ्यात अडथळे निर्माण होतात. रक्तवाहिन्यांमधे ब्लॉक निर्माण झाल्यामुळे स्ट्रोक येतो. इश्मिक स्ट्रोक आल्यास पहिल्या साडेचार तासांत उपचार केले, तरच अपरिवर्तनीय ब्रेन डॅमेज टाळता येतो. सामान्य लोकांना मात्र या चार तासांच्या ‘गोल्डन विंडो’ची माहिती नसल्याचे डिजिठाणेच्या पाहणीत आढळून आले. 

स्ट्रोकचे कोणतेही लक्षण दिसताच रुग्णाच्या कुटुंबियांना तत्काळ सुसज्ज स्ट्रोक युनिट असलेल्या रुग्णालयाकडे धाव घ्यावी. बहुसंख्य ब्रेन स्ट्रोक्सवर यशस्वी उपचार केले जातात आणि स्ट्रोक आल्यानंतर पहिल्या साडेचार तासात योग्य उपचार केल्यास अपंगत्व येण्याची शक्यता कमी होते. सुवर्ण काळात म्हणजे पहिल्या साडेचार तासात वैद्यकीय उपचार सुरू झाल्यास अत्यल्प अपंगत्व किंवा पॅरालिसिससह रुग्ण बचावण्याची शक्यताही वाढते.- डॉ.योगेश गोडगे, कन्सल्टिंग न्युरोलॉजिस्ट, ज्युपिटर हॉस्पिटल
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support