This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 12, 2018

संभाजीराजे हे तळपता सूर्य होते!

छत्रपति शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून वागलेले संभाजी महाराज यांचे चारित्र्यहनन करण्याची मोहीम आजची नाही ती पार चिटणीस बखरीपासून सुरू आहे. कवी बी, राम गणेश गडकरी अशा प्रतिभावंतांनी साहित्यनिर्मितीच्या आवेशात या बदनामीला कळत नकळत, विचाराने वा अविचाराने खतपाणी घातले आणि ही चिटणीस बखर व साहित्यातील संभाजी म्हणजेच संभाजी महाराजांचे आयुष्य, बदनाम चरित्र असे शिक्कामोर्तब होऊन गेले. संभाजी ब्रिगेडने हा मुर्खांचा कल्लोळ दूर कऱण्यासाठी आक्रमक पावले उचलली आणि डॉ. जयसिंगराव पवार आणि अन्य काही इतिहाससंशोधकांनी संभाजी महाराजांवरील भलत्यासलत्या आरोपांचे किटाळ दूर करण्यासाठी बंद्या रुपयांसारखे पुरावे समोर आणले आणि जनतेला खरे संभाजी महाराज कोण होते ते हळुहळू कळू लागले. तरीही अधूनमधून ही मुर्ख मंडळी संभाजी महाराजांविषयी विषारी प्रचार वेगवेगळ्या माध्यमांतून पेरण्याचा प्रयत्न करत असतात. या द्वेषमूलक विचारांची कुणीतरी केलेली उलटी अचानक पुढे येते तेव्हा संताप अनावर होतो. हे सर्व हेतूत: होत असताना शिवतेज उगाळणारे गुरुजी गप्प बसतात. आताही संभाजी महाराज दारुच्या कैफात असायचे, असा बिनबुडाचा उल्लेख ‘सर्व शिक्षा अभियाना’च्या पुस्तकात समाविष्ट आहे. लक्षात घ्या हे काही साधे दोन पैशांचे पुस्तक नाही. सर्व शिक्षा अभियानासाठी छापलेले समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात ’संभाजी राजा हा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’ असे हे वाक्य आहे. लेखिका आहेत नागपूरच्या डॉ. शुभा साठे. जे संपूर्ण असत्य आहे ते या साठे मॅडमनी कोणत्या कैफात लिहिले असा प्रश्न येथे उपस्थित होतो. हा खोडसाळपणा किंवा अनावधानाने झालेला उल्लेख नाही. ही कुबुद्धी आहे आणि ती विचारपूर्वक कार्यरत आहे. या पुस्तकामुळे मुलांसमोर संभाजीराजांचे खोटे चित्र उभे राहाणार आहे. हे पुस्तक ताबडतोब मागे घ्यावे ही आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी योग्यच आहे. औरंगजेबाला हाय खायला लावणारा हा राजा. पण केवळ साहित्यातच नव्हे तर चित्रपटांतूनही राजांची बदनामी करण्यात आली आहे. या सगळ्याच्या मुळाशी होती मल्हार रामराव चिटणीसाची बखर. संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 122 वर्षांनी रचलेल्या या बखरीतून संभाजीराजांची प्रचंड बदनामी कऱण्यात आली. याच बखरीमुळे पुढे संभाजीराजेंची बदनामी सुरूच राहिली. या मल्हार चिटणीसाचा खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीसला संभाजीराजांनी राजद्रोहाची शिक्षा म्हणून हत्तीच्या पायाखाली दिले होते, याचा राग धरुन त्याने संपूर्ण बखरीत असत्य कथन केले आणि तोच इतिहास मानला गेला हे आता सच्च्या इतिहाससंशोधकांनी समोर आणले आहे. गोदावरी, थोरातांची कमळा, तुळसा अशा स्त्रीयांची नावे घेऊन राजांची बदनामी करण्यात आली आहे. प्रत्यक्षात आज रायगडाच्या पायथ्याला गोदावरीची जी समाधी दाखवली जाते ती गोदावरीची नसून माधवराव पेशवे यांच्या यशोदाबाई पेशवे यांची आहे. तीच गोष्ट कमळा या स्त्रीची. कवी बी यांनी कमळा नावाचे दिर्घकाव्य लिहून आणि त्यानंतर 1941 मध्ये त्यांच्या थोरातांची कमळा या चित्रपटाने ही स्त्री पुढे आली. मग 1951 मध्ये ना.के. सोनसुखार यांचे थोरातांची कमळा नाटक आले. 1965 मध्ये राजा बढेंनी रायगडचा राजबंदी नाटकात गोदावरीला प्राधान्य दिले. पण पन्हाळा गडावरची समाधी कमळेची नसून बाळाजी विश्वनाथ भट यांच्या फौजेशी लढताना धारातीर्थी पडलेल्या यशवंतराव थोरात व तिथेच सती गेलेल्या त्यांच्या पत्नी गोदाबाई थोरात या दांपत्याची आहे. तुळसा ही स्त्रीही तर कोणत्याही ऐतिहासिक साधनात सापडत नाही. नाटककार आत्माराम पाठारे यांनी संगीत श्री छत्रपती संभाजी या नाटकात तिला जन्म दिला. 1922 मध्ये राम गणेश गडकरींनी राजसंन्यास नाटकात तुळसा आणली. 1923 मध्ये वि.वा. हडप यांनी राजसंसार नाटकात तिला उभी केली. हीच तर्‍हा संभाजीराजेंच्या व्यसनाची. गोव्यात पोर्तुगीजांना पराभुत केल्यानंतर त्यांनी तह केला. त्या तहाद्वारे दोन पिंप दारु संभाजीराजांना देण्याचा करार झाला. ती दोन पिंप दारु ही तोफेची दारु होती. पिण्याची दारु नाही. परंतु खाफीखानाच्या फारशी ग्रंथातील सत्तामदाचा कैफ या शब्दाचे भाषांतर ग्रँट डफने intoxicated with the wine of fully and pride असे केले आणि आमच्याकडच्या भुक्कड इतिहासकारांनी त्याचा अर्थ दारुडे असा लावला. संभाजीराजेंनी प्रत्यक्ष पित्यावर विषप्रयोग केला हा आणखी एक भयानक विखारी प्रचार. वा.सी. बेंद्रे, कमल गोखले, डॉ.जयसिंगराव पवारांनी (मराठेशाहीचा मागोवा) हे आरोप सप्रमाण खोडून काढल्यामुळे खरे संभाजीराजे जनतेसमोर आले आणि तोच तळपता सूर्य आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support