This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

मंत्रालयात मुख्य सचिवांची स्वच्छता मोहीम

 कपाट, कागदपत्रे, पडीक साहित्य हटविण्यावर भर
मंत्रालयाच्या कोरिडॉरमध्ये ज्या विभागांनी कपाट, कागदपत्रे, फर्निचर ठेवले आहेत त्यांची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने करून ती दोन ते तीन दिवसांत सादर करावी, जेणे करून संबंधित विभागांना हे सामान हटविण्याबाबत निर्देश देता येतील, असे मुख्य सचिव यावेळी म्हणाले. 
 मुंबई ।  प्रतिनिधी
स्वच्छता पंधरवड्यानिमित्त मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी रविवारी मंत्रालय परिसर आणि मंत्रालय विस्तारित इमारतीची पाहणी करून संपूर्ण परिसर, मंत्रालयातील कॉरिडॉर स्वच्छ ठेवताना स्वछतागृहांच्या साफसफाईवर देखील भर देण्याच्या सूचना दिल्या. ज्या विभागांचे लाकडी सामान, फर्निचर, रद्दी आणि बांधकाम साहित्य मंत्रालयातील कॉरिडोर व  परिसरात आहे त्याची यादी सार्वजनिक बांधकाम विभागाने येत्या दोन ते तीन दिवसांत द्यावी त्यानुसार संबंधित विभागांना हे सामान हटविण्याबाबत कळविण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी यावेळी सांगितले.
मंत्रालयाच्या आवारात पडून असलेल्या सामानाबाबत दर आठवड्याच्या शेवटी आढावा घेऊन पडीक साहित्य हटविण्याची कार्यवाही करावी, असेही जैन यांनी सांगितले.
विस्तारित इमारतीत स्वछतागृहांचे नूतनीकरण करण्यात येत आहे. 25 पैकी 15 स्वछतागृहांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित नोव्हेंम्बर अखेरपर्यंत पूर्ण करावे अशा सूचनाही मुख्य सचिवांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या. 
यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, कामगार विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत विभागाचे सचिव अजित सगणे, कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर यांच्यासह  विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सचिवांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन आपल्या कार्यालयाची स्वछता केली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support