Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

सफाई कामगारांच्या नरकयातना

तुडुंब घाणीने भरलेलं गटारं- नाला. त्यातून डोक वर काढून श्वास घेण्यासाठी धडपडणारा सफाई कामगार. या नाल्याशेजारीही कुणी 
उभं   राहू शकणार नाही इतकी प्रचंड दुर्गंधी, कमालीच्या नरकयातना. जिवावर उदार होऊ न उपसली जाणारी नाल्यातील ही न्हाणी फक्त वीतभर पोटासाठी. डोंबिवली एमआयडीसी खंबाळपाडा परिसरात सफाईसाठी नाल्यात उतरलेल्या त्या तीन कामगारांपुढेही हीच मजबुरी होती. तीही हाडामांसाची, तुमच्या-आमच्यासारखी बोेलणारी, चालणारी माणसं होती. कंत्राटदाराने दाखवलेल्या नाल्यात उतरायचं तिथली घाण उपसायची, एवढचं त्यांना ठावुक. या नाल्यात माणसानेच सोडलेल्या रसायनाची दुर्गंधी आहे, त्यामुळे आपला श्वास गुदमरेल प्रसंगी जीवही जाईल, याचा त्यांना मागमूस असेल? अखेर घडले तेच. नाले, गटारे किंवा शौचालयाची सफाई करणारे लोक माणसचं नाहीत, हा मूर्खपणा ही बेपर्वाई डोंबिवली एमआयडीसीतील कंत्राटदाराने दाखवली अन् तीन कामगारांचा हकनाक बळी गेला. त्याच्याविरोधात आता गुन्हा दाखल झाला आहे. त्याला काही काळ अटकही होईल. पण, ज्या कामगारांचे संसार, बायको मुले सर्व काही उघड्यावर पडलं, त्याचं पुढं काय होणार? आता आक्रोश आणि हळहळ याशिवाय तुम्ही, आम्ही कुणी काहीच करू शकत नाही. कारण आजला जग कितीही यांत्रिक आणि तांत्रिक झालं असलं तरी आपल्याकडे आजही घाणं करण्यासाठी माणूस आहे नि घाण उपसण्यासाठीही माणूसचं आहे. फक्त समाज त्याला मैला साफ करणारा, करणारा नाले साफ करणारा, कचरा सफाई करणारा कामगार म्हणून वेगळ्या नजरेने बघत असतो. काही जण तर आजही या कामगारांकडे बघताना जातीचाच चष्मा लावतात. त्याने एक दिवस आपल्यातील माणसांची घाण न उपसण्याचे व्रत अंगिकारले तर माणसालाच माणसाची घाणं, घ्यावीशी वाटणार नाही. हे सत्य कोण नाकारेल? पण, हा सफाई कामगार व्यसनाच्या आहारी गेला आहे तो बायको मुलांचा नीट सांभाळ करत नाही, असे त्याच्याबद्दल बोलून बरेच जण मोकळे होतात. परंतु, या कामगारांच्या जीवनात, अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न आजही होताना दिसत नाही. डोंबिवलीत मॅनहोलमध्ये नालेसफाईसाठी उतरलेल्या तीन कामगारांची एकवेळची हजेरी साधारण 200 ते 300 रुपये असेल. पण, जिवावर उदार होऊ न काम करणार्‍या देशातील अशा असंख्य कामगारांच्या सुरक्षेविषयी किंबहुना त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याविषयी माणुसकीच्या भावनेतून सरकारला कधी पाझरं फुटेल का? त्यांना किमान वेतन, सुरक्षा कुणी देईल का? मुंबई, ठाणे, कल्याण किंवा आसपासच्या परिसरातील महापालिकांत काम करणारे किती सफाई, कंत्राटी कामगार सुरक्षित आहेत? या कामगारांची किमान वेतनश्रेणी काय, त्यांच्या आरोग्याविषयी काय काळजी घेतली जाते? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या सफाई कामगारांना नरकयातना उपसताना पाहिल्यावर आपसुकच मिळतात. क्षयरोग, त्वचारोग, श्वसनाचे विकार पोटासाठी जगाची घाण उपसणार्‍या या कामगारांच्या पाचवीलाच पुजलेले आहेत. या सफाई कामगारांना उघडी गटारे व मॅनहोलमध्ये उतरवू नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे असले तरी ते ठिकठिकाणी कसे पायदळी तुडवले जातात, याचे जिवंत उदारहरण डोंबिवलीतील घटना आहे. गेल्या तीन वर्षांत तब्बल 212 कंत्राटी व नऊ मॅनहोल अशा एकूण 221 सफाई कामगारांचा क्षयरोग, दमा, त्वचारोग अशा विविध श्वसनाच्या आजाराने मृत्यू झाला आहे. कामगारांना मरणाच्या दारात ढकलणारे हे धोरण कंत्राटदार बिनधोक राबवत आहेत. माणसांच्या सेवासुविधांसाठी खुलेआम माणसे मारली जात असताना त्यावर कुणाचेही बंधन वा नियंत्रण नाही, हे पोटासाठी नरक उपसणार्‍या कामगारांचे दुर्दैव. दरवर्षी 1 मे रोजी कामगार दिन झोकात साजरा केला जातो. कामगार नावाची तळपती तलवार एका दिवसापुरती का होईना, सर्वत्र मिरवली जाते. मात्र, या कामगारासाठी आता कामगारच एकजुटीने, एकदिलाने आवाज देईनासा झाला आहे. मुंबईत ब्रिटिशकालीन मलनि:सारण आणि पर्जन्य जलवाहिन्यांचे भूमिगत जाळे विस्तारलेले आहे. या जाळ्यात उतरण्यासाठी हजारो मॅनहोल आहेत. आजही येथे सफाईसाठी यांत्रिक नव्हे तर कामगारांचा वापर केला जातो. या मॅनहोलमधील विषारी वायूमुळे शेकडो सफाई कामगारांचे आजपर्यंत बळी गेले आहेत नि जात आहेत. देशपातळीवर मॅनहोलमध्ये, गटारे, नाल्यात उतरून मरणार्‍या या कामगारांच्या हालापेष्टा, यातना कधी कुणाला कळणार? कामगार हा बळी जाण्यासाठीच? देशपातळीवर दर पाच दिवसांत एका सफाई कामगाराचा मॅनहोल अथवा गटारात उतरल्याने बळी जातो, हे विदारक वास्तव आहे. मुंबईत 2015 ते 2017 दरम्यान विविध आजाराने 212 कंत्राटी सफाई कामगारांचा सफाई कामगारांचा मृत्यू झाला आहे. पण, माणसांचा मैला उपसताना दररोज मरणार्‍या या माणसांच्या सुरक्षेसाठी आपण त्यांना माणुसकीच्या चष्म्यातून कधी बघणार? सरकार, व्यवस्था, प्रशासन नावाची गोष्ट आपल्या देशात कुठेतरी शिल्लक असेल तर माणसांसमोर माणसांचे बळी जात असताना आपण किती वर्षे फक्त हळहळ नि शोक व्यक्त करणार?
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support