Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 8, 2018

उल्हासनगरातील शासनाच्या ताब्यातील भूखंड पालिकेकडे येणार


नव्या महापौरांचे पहिलेच यशस्वी पाऊल
 उल्हासनगर । प्रतिनिधी
 महापौर पंचम कलानी यांनी पदभार स्विकारण्याच्या दुसर्‍या दिवशीच उल्हासनगरातील शासनाच्या ताब्यात असलेले तीन शासकीय भूखंड पालिकेला हस्तांतरित करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्याकडे केली आहे. गिरासे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे भूखंड विकसित करण्यासोबत रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या व्यापार्‍यांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला आहे.
बोटक्लब, इंदिरा गांधी मार्केट व बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल (पूर्वीचे व्हिटीसी मैदान) या तिन्ही भूखंडावर पालिकेने बांधकाम केलेले आहे. मात्र हे भूखंड शासनाच्या ताब्यात असल्याने त्याचा भव्य प्रमाणात विकास पालिकेला करता येत नाही. याशिवाय कल्याण बदलापूर या महामार्गाच्या रुंदीकरणात शेकडो व्यापारी बाधित झाल्याने जर्जर अवस्थेत झालेले इंदिरागांधी मार्केट तोडून व त्याजागी भव्य व्यापारी संकुल उभारून व्यापार्‍यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आलेला आहे. मात्र इंदिरा गांधी मार्केटच्या भूखंडाचा ताबा शासनाकडे असल्याने व्यापार्‍यांच्या पुनर्वसनाचा मार्ग खडतर बनू लागला होता.
पंचम कलानी यांनी महापौरांचा पदभार हाती घेताच, त्यांनी आमदार ज्योती कलानी, युथ आयकॉन ओमी कलानी, नगरसेवक राजेश वधारिया, नरेंद्रकुमारी ठाकूर यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांची भेट घेतली. शासकीय भूखंडांना उल्हासनगर पालिकेकडे हस्तांतरित करण्याची मागणी गिरासे यांना निवेदनाद्वारे केली. गिरासे यांनी सकारात्मक आश्वासन दिले. त्यानंतर गिरासे यांनी पालिका आयुक्त गणेश पाटील, महापौर पंचम कलानी यांची पालिकेत महापौरांच्या दालनात भेट घेतली आणि येत्या दहा पंधरा दिवसात या भूखंडांना सनद देण्याची पालिकेला हस्तांतरित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार अशी माहिती दिली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support