Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

घरपोच दारू सेवेची सरकारी बाटली आडवी

कडाडून विरोधानंतर उत्पादन शुल्क मंत्र्यांची तारांबळ

 मुंबई । प्रतिनिधी
सरकारमान्य देशी दारू दुकानाचे फलक आपण वर्षानुवर्षे बघत आलो आहोत. मात्र सरकारमान्य देशी दारूचे ऑनलाईन दुकान जे तुम्हाला पिझ्झा, बर्गर किंवा इतर फास्ट फुड पदार्थांची ऑर्डर केल्यानंतर लागलीच मिळते. त्याच धर्तीवर घरपोच दारू सेवा देण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्यातील फडणवीस सरकारने देण्याचा संकल्प सोडला आहे. (ड्रंक अँड ड्राईव्ह) मद्य प्राशन करून गाडी चालविल्याने राज्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्यासाठी सरकार घरपोच दारू सेवा धोरण राबवण्याच्या विचाराधीन आहे, असे सकारात्मक संकेत देणारे राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता त्यांच्या घरपोच सेवेवर कोलांटउडी घेतली आहे. सरकार दारूड्यांना घरच्या घरी दारूचा पुरवठा करणार आहे, अशा चुकीच्या बातम्या सर्वत्र फिरत आहेत. यामुळे सरकारकडे ऑनलाईन मद्यविक्री करण्यासाठी अर्ज आले आहेत. मात्र अशाप्रकारे ऑनलाईन दारू विक्रीचा सरकार अद्याप विचार करत नसल्याचा खुलासा करत ते ऑफलाईनवर गेले.
यापूर्वीही मुंबईत 35 दुकानदारांनी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून दारू विक्री करायला सुरुवात केली होती. मात्र सरकारने याविरोधात कारवाई केली होती. ऑनलाईन पद्धतीने मद्यविक्रीचे प्रकरण न्यायालयात सुरू असल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले आहे.
दारू ऑनलाईन मागविण्यासाठी वयाचा दाखला, ग्राहकांच्या आधार नंबरसह त्याची संपूर्ण माहिती घेऊन ओळख पटवली जाईल, असेही बावनकुळे यांनी म्हटले होते. अगदी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या आकडेवारीचा हवाला देताना बावनकुळे यांनी 2015 मध्ये एकूण रस्ते अपघातांच्या 1.5 टक्के अपघात हे ड्रंकन ड्राइव्हचे होते. हे प्रमाण 4 लाख 64 हजार इतके होते. तब्बल, 6,295 जण या अपघातांत जायबंदी झाल्याचीही नोंद आहे.
दिवसाला सरासरी 8 जणांचे मृत्यू हे दारू पिऊन गाडी चालवल्याने होतात. सरकारच्या या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना उच्च न्यायालयातले वकील श्रीरंग भंडारकर म्हणाले, ड्रंक अँड ड्रायव्हचे गुन्हे यामुळे कमी होतील, शिवाय अशी ऑनलाइन सेवा सुरू झाली तर युवकांसाठी रोजगारही वाढेल, असे म्हटले होते.

उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी एका आघाडीच्या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना, ‘दारू पिऊन गाडी चालवल्याने होणारे अपघात टाळणे हा घरपोच दारू सेवेमागील प्रमुख उद्देश आहे. नशेत गाडी चालवल्याने अनेक जण मृत्युमुखी पडतात. त्यामुळे ई-कॉमर्स संकेतस्थळावर ज्या पद्धतीने भाजी, फळे घरपोच येतात, तशी दारूही घरपोच येईल’, असे म्हटले होते.

या, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?

एकीकडे गोरगरिबांना रेशनवर धान्य मिळत नाही. 12 ते 18 तास वीज गायब आहे. पाण्यासाठी लोक पायपीट करत आहेत. या मूलभूत गरजा भागवण्याऐवजी तसेच राज्यात निर्माण होत असलेल्या दुष्काळी स्थितीवर नियोजन करण्याऐवजी हे सरकार लोकांना घरपोच दारू पुरविण्याचे धोरण आखत आहे. दारू पाजून लोकांना सरकारचा नाकर्तेपणा विसरायला लावणार्‍या या सरकारचे डोके खरंच ठिकाणावर आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support