Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

बंद घरांवर चोरट्यांचा डोळा


डोंबिवली । प्रतिनिधी
कल्याण डोंबिवलीमध्ये घरफोडीचे सत्र सुरू असून या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात शनिवारी दिवसभरात डोंबिवलीमध्ये 2 व मानपाडा पोलीस ठाण्यात 1 घरफोडीच्या घटनांची नोंद झाली.
शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील सुरभी हॉटेल बंद करून हॉटेल मालक विकास शेट्टी घरी निघून गेले. हॉटेल बंद असल्याची संधी साधत चोरट्याने हॉटेलच्या टॉयलेटचे ग्रील तोडून दुकानात प्रवेश केला.  मोबाईल, रोकड, लॅपटॉप असा मिळून एकूण 1 लाख 67  हजारांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली  आहे. दुसरी घटना डोंबिवली येथील एका क्लासमध्ये घडली आहे. डोंबिवली पूर्वेकडील पाटकर रोड विजप्रभा बिल्डिंगमध्ये सुनील जोशी यांचे एलन क्लासेस आहे. गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास क्लास बंद करून ते घरी निघून गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या क्लासचे कुलूप तोडून क्लासमध्ये घुसून लॅपटॉप चोरुन नेला. या प्रकरणी जोशी यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. 
तिसरी घटना भोपर गावात घडली आहे. डोंबिवली पूर्वेकडील भोपर गाव कमानीजवळ मुक्ताबाई चाळीत राहणारे कृष्णा भावे हे शनिवारी सकाळी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या खिडकीची ग्रील तोडून घरात प्रवेश करत घरातील 2 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. त्यांनी या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support