Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

पाण्यासाठी पोलिसांच्या कुटुंबांचा मोर्चा


शिवाजीनगर पोलीस लाईनला रविवारी सकाळी अडीच तास पाणी पुरवठा केला होता़ मात्र, तो अत्यंत कमी दाबाने झाल्याने अनेक ठिकाणी पाणी पोहचले नाही़  त्यामुळे  शिवाजी नगर पोलीस लाईन येथे 3 टँकर पाठविण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.
  पुणे । प्रतिनिधी
शिवाजीनगर येथील पोलीस वसाहतीत गेल्या 3 ते 4 दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या पोलीस कुटंंबियांनी वसाहतीबाहेर रास्ता रोको आंदोलन केले. तसेच यातील काही नागरिक थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा घेऊन गेले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़.
खडकवासला कालवा फुटीनंतर शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे़  त्यामुळे शहरातील हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत़  शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये अगोदरपासून अपुरा पाणीपुरवठा होत होता़ त्यात गेल्या तीन दिवसांपासून जलसंपदा विभागाने पालिकेचे पंप बंद केल्याने एसएनडीटी टाकीतून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने शिवाजीनगर, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी या परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे़.
शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये तर अत्यंत कमी दाबाने गेल्या 4 दिवसांपासून पाणी येत आहे़  त्यामुळे अनेक इमारतीमध्ये पाणीच येत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या पोलीस कुटुंबांनी रविवारी सकाळी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. महिलांनी पुढाकार घेऊन वसाहतीबाहेरील रस्त्यावर बादल्या, हंड्यांसह ठाण मांडले होते.
तर दुसरीकडे काही महिला व पुरुष थेट पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरी मोर्चा घेऊन गेले होते. त्यांनी आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या़ त्यानंतर गिरीश बापट यांनी सायंकाळपर्यंत टँकरने पाणी पुरविले जाईल, असे आश्वासन दिले़ त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले़
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support