Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

डिजिटल अध्यापनासाठी संदीप गुंड प्रयत्नशील

 ऑपरेशन डिजिटल बोर्डसाठी ठाण्याच्या शिक्षकाची निवड

ठाणे । प्रतिनिधी
सध्याच्या घडीला विविध क्षेत्रात डिजिटल क्रांती होत आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही डिजिटल क्रांती घडावी याकरता ऑपरेशन डिजिटल बोर्ड ही योजना केंद्र सरकारकडून आखण्यात आली आहे. या योजनेचा आराखडा तयार करण्यासाठी देशभरातील आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्रातून ठाणे जिल्ह्यातील संदीप गुंड या शिक्षकाची नेमणुक करण्यात आली आहे. 
ऑपरेशन डिजिटल बोर्ड योजना तयार करण्यासाठी मानवसंसाधन विकास मंत्रालयाच्या विशेष सचिव रिना राय यांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये एन. सर्वणकुमार, मद्रास आयआयटीचे प्रा. अशोक झुनझुनवाला, मद्रास आयआयटीचे संचालक प्रा. भास्कर रामामूर्ती, कानपूर आयआयटीचे प्रा. अभय कर्नंदीकर, मुंबई आयआयटीचे प्रा. कन्नन मौदगल्य, अझिम प्रेमजी फाउंडेशनचे जी. अनंत पद्मनाभन, बंगळूरूच्या एकस्टेप संस्थेचे सीईओ शंकर मारवाडा, अक्षरा फाउंडेशनचे अशोक कामत या तज्ज्ञांनासह या कमिटीमध्ये देशभरातून महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील (पष्टेपाडा) येथील संदीप गुंड या एकमेव शिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात आला आहे.
खडू फळा योजनेप्रमाणेच ऑपरेशन डिजिटल बोर्ड देशपातळीवर राबविण्यात येणार आहे. पहिल्या वर्षी 15 लाख शाळा डिजिटल होण्याची शक्यता असून येत्या पाच वर्षात देशातील प्रत्येक शाळा डिजिटल करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या समितीच्या बैठक चेन्नई येथे येथील शास्त्री भवनात झाली. त्यात तंत्रस्नेही शिक्षक संदीप गुंड यांनी डिजिटल अध्यापनाबाबत सादरीकरण केले. कमीत कमी खर्चात मेन्टनंन्स फ्री स्मार्ट क्लासरूम उभारून डिजिटल अध्यापन कसे करता येईल, यावर गुंड यांनी भर दिला. त्यात नुकतीच तज्ज्ञांच्या समितीची अंतिम बैठक चेन्नई येथे मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडली. तसेच ऑपरेशन डिजीटल बोर्ड संदर्भातील अहवाल पंतप्रधान यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच ऑपरेशन डिजिटल बोर्डची देशभरात अंमलबजावणी करण्यात येणार आहे.  
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support