Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, October 6, 2018

शिवस्मारकाचे बांधकाम रखडणार?


जाणकारांच्या मते या स्मारकाच्या आराखड्यात केलेल्या बदलामुळे पावसाळ्यात समुद्राला येणार्‍या उधाणाच्या काळात स्मारक परिसरात जाणे धोकादायक ठरू शकते. परिणामी पावसाळ्यात तीन महिने स्मारक बंद ठेवावे लागेल. त्यामुळे तांत्रिक समितीच्या मान्यतेला कमी महत्त्व आहे आणि ती मिळेपर्यंत निविदाच निघणार नसल्याने प्रकल्पाचे काम रखडण्याची शक्यता आहे. विनायक मेटे यांच्याशी याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.
नव्या आराखड्याला तांत्रिक मान्यताच नाही
 मुंबई । प्रतिनिधी
अरबी समुद्रात साकारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बांधकामाच्या नव्या आराखड्याला अद्यापही तांत्रिक समितीची परवानगी मिळाली नसल्याने ऑक्टोबरपासून सुरू होणारे स्मारकाचे काम रखडण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या या सस्मारकाचे काम ऑक्टोबरपासून सुरू होणार होते. स्मारकाचा मूळ आराखडा 3 हजार 826 कोटींचा होता़. राज्य सरकारला या प्रकल्पाची किंमत कमी करायची होती़. त्यासाठी कॉस्ट ऑप्टीमायझेशन प्रस्ताव तयार करण्यात आला. त्याअंतर्गत समुद्रात घालावयाच्या भिंतीची उंची कमी केली. समुद्रात टाकण्यात येणारा भराव कमी करण्यात आला. पुतळ्याचा चबुतरा तसेच पुतळ्याचा आकारही कमी करण्यात आला. त्याचवेळी पुतळ्याच्या तलवारीची उंची साडेसात मीटरने वाढविण्यात आली. या बदलामुळे स्मारकाची उंची कायम राहिली. मात्र प्रकल्पाची किंमत 1000 कोटींनी कमी झाली, असे सूत्रांनी सांगितले.
स्मारकाच्या आणि पुतळ्याच्या रचनेत केलेल्या बदलाला तांत्रिक समितीची मंजुरी घ्यावी लागते. या प्रकल्पासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने तांत्रिक समिती गठित केली आहे़. स्मारकाच्या तांत्रिक बाबींची सर्व जबाबदारी या समितीवर आहे.  या समितीची शेवटची बैठक एप्रिल 2017 मध्ये झाली. फेब्रुवारी 2018 मध्ये प्रकल्प आराखड्यात बदल करण्यात आले. 
त्यानंतर तांत्रिक समितीची बैठकच झाली नाही. त्यामुळे या प्रकल्पाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाली नाही. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या प्रकल्प अंमलबजावणीसाठी देखरेख व समन्वय समितीची मागच्या महिन्यात 5 सप्टेंबरला विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली़.
त्यामध्ये प्रकल्पाच्या कामास अद्याप प्रशसकीय तसेच तांत्रिक मान्यता नसल्याचा मुद्दा समोर आला. त्यामुळे भविष्यात अडचणी निर्माण होऊ शकतात़, असे अधिकार्‍यांनी यावेळी सांगितले.  
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support