Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

...नाहीतर नादुरुस्त घाणेकर नाट्यगृहात दिवाळी पहाट करू!

ठाण्यातील कलाकारांचा घाणेकर मिनी थिएटरची दुरुस्ती लांबली
ठाणे । प्रतिनिधी
दौर्‍या अंतर्गत मिनी थिएटरचा आवाज मुख्य नाट्यगृहात जात असल्याची प्रमुख बाब निर्दशनास आली. तसेच अनेक ठिकाणी नाट्यगृहाला भेगा पडल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी वाळवी लागल्याचे दिसून आले. पाण्याची गळती अनेक ठिकाणी होत असल्याची बाबही समोर आली. त्यामुळे हे नाट्यगृहाची बांधणीच चुकीच्या पद्धतीने आणि निकृष्ठ दर्जाची झाली असल्याचा गंभीर आरोप यावेळी कलाकारांनी केला.

 
मागील वर्षभरापासून दुरुस्तीच्या नावाखाली बंद असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेेकर मिनी थिएटर पुढील एका महिन्यात सुरू न झाल्यास, आहे त्या परिस्थितीत त्याच ठिकाणी दिवाळी पहाट करणार असल्याचा इशारा ठाण्यातील कलाकारांनी ठाणेे महापालिका प्रशासनाला दिला आहे. तसेच या नाट्यगृहाची बांधणी चुकीची आणि निकृष्ठ दर्जाची झाली असल्याचा आरोपही कलाकारांनी केला आहे. 
घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकरमधील मिनी थिएटर 1 ऑक्टोबर 2017 पासून दुरुस्तीसाठी बंद करण्यात आले होते. मंगळवारी महापौर मिनाक्षी शिंदे यांनी ठाण्यातील कलाकारांबरोबर या ठिकाणचा पाहणी दौरा आयोजित केला होता. यावेळी त्यांच्या समवेत सभागृह नेते नरेश म्हस्के, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, क्रिडा व सांस्कृतिक सभापती दिपक वेतकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, नगर अभियंता अनिल पाटील, उपायुक्त संदीप माळवी यांच्यासह दिग्दर्शक विजु माने, उदय सबनीस, महेश शानबाग, श्रीरंग खटावकर आदी कलाकार उपस्थित होते. यावेळी सुरुवातीला एक बैठक घेण्यात आली.
बुधवारपासून दुरुस्तीचे काम सुरू होऊन एका महिन्याच्या आत हे मिनी थिएटर नाट्यरसिकांसाठी खुले केले जाईल असे आश्वासन अतिरिक्त आयुक्त अहिवर यांनी कलाकारांना दिले. 
दुरुस्तीचे काम एक महिन्यात करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. परंतु ते झाले नाही तर कोणत्याही परिस्थितीत आम्ही दिवाळी पहाटचा कार्यक्रम त्याच ठिकाणी - विजू माने, दिग्दर्शक
आमच्यातील उपद्रव्य मुल्य जागे करू नका, नाही तर वेळ पडली तर आम्ही उपोषणाला सुध्दा बसू. त्यामुळे मिनी थिएटर एक महिन्याच्या आत सुरू करा, आम्ही रोजच्या रोज कामाचा अहवालसुध्दा घेणार - उदय सबनीस, कलाकार
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support