Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

नवरात्रौत्सवापासून वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये पिंक महिना


नवरात्रौत्सवाला उद्यापासून सुरूवात होते आहे. या काळात नऊ दिवस संपूर्ण महाराष्ट्रात  आदिशक्तीचा जागर असतो. नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याची प्रथा गेल्या दशकभरापासून सुरू आहे. पण मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील महिला  पिंक महिना साजरा करीत आहेत. संपूर्ण जगभरामध्ये ऑक्टोबर महिना हा महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोग जनजागृतीसाठी साजरा केला जातो. स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार केले तर त्या महिलेचा जीव वाचू शकतो. आपल्या आरोग्याबाबत योग्य ती काळजी  न घेतल्यामुळे अनेक महिलाना स्टेज 3 अथवा स्टेज 4 मध्ये स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे कळून येतात व तेंव्हा फार उशीर झालेला असतो याच जाणिवेतून मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटल हा महिना  पिंक महिन्याचे आयोजन करण्यात आले आहे. वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉक्टर , नर्सेस , सुरक्षा रक्षक तसेच साफसफाईचे काम करणार्‍या महिला जास्तीत जास्त पिंक (गुलाबी ) रंगाचे कपडे परिधान करणार आहेत तसेच यासोबत हॉस्पिटलमध्ये येणार्‍या महिला पेशंट व त्यांच्या महिला नातेवाईकांना या पिंक महिन्याचे महत्व समजावून देणार आहेत.
हॉस्पिटलचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी म्हणाले,  जागतिक पातळीवर या महिन्यात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाविषयी जागृती आणण्यासाठी पिंक म्हणजेच गुलाबी रंगाचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देऊन बर्‍या झालेल्या महिलांना पिंक पँथर्स म्हणतात. स्तनाच्या कर्करोगासंबंधी जनजागृतीसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर गुलाबी रंग प्रतिकात्मक म्हणून वापरला जातो. आमच्या हॉस्पिटलमध्ये 70 टक्के या महिला असून त्यांनीच हा महिना साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला असून या निमित्ताने आम्ही एका महिलेचे जरी आयुष्य वाचवू शकलो तरी आमचा उद्देश सफल होईल.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support