Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

निसर्गरम्य सापुतारा


महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर नाशिकलगत असलेल्या सापुतारा या पर्यटन स्थळाने अल्पावधीतच पर्यटकांनी मने जिंकली असून इथल्या हॉटेल उद्योग संघटनेने गुजरात सरकारकडे पाठपुरावा करून 200 कोटी रुपयांची विकासकामं करून घेतली आहेत. त्यामुळेच बहरलेले यंदाचे पर्यटन पर्यटकांना साद घालत आहे. असे असले तरी हे सापुतारा स्थळ जगाच्या पर्यटन नकाशावर अग्रणी आणण्याचा निर्धार असल्याचे हॉटेल उद्योजक अण्णा उर्फ बळवंत पाठारे यांनी म्हटले आहे.
सापुतारा हे 3 हजार 600 फूट उंचीवर आहे. वर्षभरात हजारो पर्यटक सापुताराला भेट देत असतात. प्रत्येक ऋतुत सापुतारा तितकचं मनमोहन रूपधारण करतं. सनसेट पॉइण्टपासून ते रोझ गार्डनपर्यंत अनेक पॉइण्टस् इथे आहेत. तसंच सापुतार्याहून जवळपास असलेली इतर काही ठिकाणंही पर्यटकांना भावतील अशी आहेत. गुजरातचं एकमेव आणि प्रसिद्ध हिलस्टेशन म्हणजे सापुतारा. गुजरातच्या दक्षिण सीमेवर डांग जिह्यात सह्यादी पर्वताच्या रांगांमध्ये सापुतारा समुद्रसपाटीपासून 3600 फूट उंचीवर आहे. अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आणि उत्तम पॅनोरॅमिक व्हू साइट्स असल्याने वर्षभरात पर्यटक तिथे खूप मोठ्या संख्येने भेट देत असतात. उन्हाळा असो, थंडीचे दिवस असो किंवा अगदी पावसाळा, प्रत्येक सीझनमध्ये पर्यटकांना इथलं वाइल्ड लाइफही प्रसिद्ध आहे. द्राक्षं-स्ट्रॉबेरीची शेती असल्याने ही फळं इथे उत्तम मिळतात. बांबूपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करायलाही तिथे एकच झुंबड उडते. सापुतारा हे मुंबई, पुणे, नाशिक, सूरत या शहरांना मध्यवर्ती असलेले थंड हवेचे ठिकाण आहे. इथले आल्हाददायी वातावरण, साधारणत 20 ते 22 अंश सेल्सिअस तापमान, नयनरम्यन निसर्ग यामुळे त्याचे मिनी काश्मीर अशी ओळख झाली आहे. गुजरात राज्यातील एकमेव हिल स्टेशन असल्यामुळे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी मोठ्या जिद्दीने त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला आणि तिथे पर्यटकांसाठी सर्व सोयी-सुविधा करून दिल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी दरवर्षी समर फेस्टिवलचे आयोजन केले जाते. वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, डांग आदिवासींचे पारंपारिक नृत्य, मुलांसाठी खेळ, वेगवेगळी प्रदर्शने, कला कुसर असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, रोषणाई, आतषबाजी, पर्यटनस्थळी विविध सोयी-सुविधा अशी रेलचेल येथे दिसून येते. या महोत्सवात अनेक मान्यवरदेखील भेट देत असतात. पर्यटकांच्या स्वागतासाठी चित्रकूट रिसोर्ट, वैती हॉटेल, पतंग, पुरोहित, गोकुळ, वैशाली, सवशांती, आकार, शिल्पी इन इत्यादी हॉटेल्स सज्ज असतात. विशेष म्हणजे शासनाच्या वतीने विशेष प्रकल्प राबवून सापुतारा येथील सर्व जनता तसेच पर्यटकांना मिनरल वॉटर पुरवले जाते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतील हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून साकारताना बळवंत पाठारे व त्यांचे स्नेही मोरेश्वर वैती यांनी सर्वप्रथम आपली हॉटेल्स या ठिकाणी सुरू केली. चित्रकूट रिसोर्टपासून त्यांनी पर्यटन व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करताना प्रारंभीच्या काळात या ठिकाणचे रस्ते तसेच पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी प्रयत्न केले. सापुतारा येथे रोप वे, बोटिंग, पॅराग्लायडिंग, हॉस आणि कॅमल रायडिंग, सनसेट व सनराईज पॉईंट्स, इको पॉईंट, विविध प्रार्थनास्थळं, अष्टविनायक मंदिर, मध संकलन केंद्र, गीरा फॉल, बॉटनॅकिल गार्डन, शबरीधाम, माहोल फॉरेस्ट, वनस्पतींचे उद्यान, वस्तु संग्रहालय, स्टेप गार्डन, खोल दरी आदी बघण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्याचबरोबर शिवरायांच्या वास्तव्याने पावन झालेला हतगड किल्ला, वणीची सप्तशृंगी देवी, असेनानाविध पर्यटन स्थळं विकसित झाली आहेत. त्यासाठी केवळ महाराष्ट्र किंवा गुजरात नव्हे तर भारतातून तसेच परदेशातूनदेखील पर्यटक येत आहेत.
या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी विशेष उपक्रम गुजरात टुरिझमकडून राबवले जातात. गुजरात पर्यटन विकास महामंडळाने आयोजित केलेल्या पतंग महोत्सवाला देश-विदेशातील पर्यटकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर हे ठिकाण विकसित करण्यावर आणि त्याचा प्रचार करण्यावर त्यांनी भर दिला आहे. रोड शो तसेच अन्य उपक्रमदेखील ते त्यानिमित्ताने नियमितपणे राबवत असतात. हिरवाई, सहयाद्रीच्या पर्वत रांगा, वनसंपदा, आदिवासी संस्कृती याबरोबरच सापुतारा समर फेस्टिवल म्हणजे प्रेक्षकंसाठी मोठी पर्वणीच असते.या महोत्सवाला दीड लाखांहून अधिक देशी विदेशी पर्यटकांनी हजेरी लावतात. महोत्सवात आदिवासी संगीत, नृत्य, कलाकूसर, खाद्य संस्कृती तसेच साहसी पर्यटनाचा आंनद घेता येतो. या फेस्टिवल मुळे सापुतायाच्या संस्कृती शी एकरुप होण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध झाली आहे.याबरोबरच वन पर्यटनाचा आनंद ही लुटता येतो. मनसोक्त फिरल्यानंतर पोटपुजा ही हवी त्यासाठीच इथे फुड कोर्ट तयार करण्यात येते. गुजराती पकवान्ना बरोबरच आदिवासी खाद्य पदार्थावर ही ताव मारता येतो. क्राफ्ट व्हिलेज म्हणजे कलाकारांचं खेडं. इथं पर्यटक स्थानिक कलाकुसर बघू शकतात आणि खरेदीचा आनंद ही लुटू शकतात. बांबू पासुन बनवल्या जाणार्या विविध कलाकूसरीच्या वस्तू या बाजारात विक्री साठी ठेवण्यात येतात.इथं फोटो गॅलरी ही आहे यात गुजरात मधल्या अनेक पर्यटन स्थळांचे फोटोज बघयाला मिळतात. सापुतार्‍याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इथं असलेले साहसी खेळ. थ्रिल अनुभवयाला आवडणार्‍या पर्यटकांसाठी रॉक क्लायमिंग, पॅरासिलिंग, वॉटर स्पोर्टस्, हाय रोप हे क्रिडा प्रकार पर्वणीच आहे. रोप वे ने सापुतार्‍याच्या एका कड्यावरुन दुस्रर्‍या कड्यावरचा प्रवास चित्तथरारक वाटतो. याशिवाय बोट कल्बला बोटिंग ही करता येते. सापुतार्‍यामधल्या आदिवासी संस्कृतीला कुठेही धक्क न लावता गुजरात टुरिझमने सापुतार्‍याचा केलेला विकास उल्लेखनीय आहे. आउटिंग साठी सापुतारा स्वस्त आणि उत्तम पर्याय आहे.
या ठिकाणी असलेल्या हतगड किल्ल्याचे ऐतिहासिक वेगळेपण आहे. शिवाजी महाराजांनी ज्यावेळी सूरतवर स्वारी केली. त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य केले. नंतरच्या काळात त्याची पडझड झाली होती. तत्कालीन पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष निधी उपलब्ध केल्यामुळे या किल्ल्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण झाले आहे. या ठिकाणी असलेले 13 छोटे-मोठे तलाव आणि विहीरी यांचे नूतनीकरण करण्यात आले. तसेच वर गडावर जाण्यासाठी रस्तादेखील तयार झाला आहे. महाराजांचा हा ऐतिहासिक वारसा जपण्याचे काम सापुतारा हॉटेल ओनर्स असोसिएशन व शिवराय हॉटेल असोसिएशनच्या वतीने अण्णा पाठारे यांनी करून घेतले. त्यांच्या या कार्यामागे त्यांचा सामाजिक दृष्टीकोन कारणीभूत ठरला आहे. कारण मुंबई, नाशिक वसापुतारा परिसरात अण्णा एक ज्येष्ठ समाजसेवक म्हणून ओळखले जातात. कुठल्याही कामातून रोजगार व स्वयंरोजगार परिसरातील नागरिकांना कसा उपलब्ध होईल, तसेच या ठिकाणी येणार्‍यांना समाधान कसे मिळेल, अशा भावनेतून ते हे कार्य करत असतात. साई प्रसाद मोटेल, केसर, प्रसाद, आनंदो, महादेव अशा हॉटेल्सबरोबरच आणखी 10-15 हॉटेल उद्योग इथे सुरू झाले आहेत.
सापुतारा हॉटेल ओनर्स असोसिएशन तसेच शिवराय हॉटेल्स असोसिएशनच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि गुजरात राज्य सरकारचा एक दुवा प्रस्थापित झाला आहे. त्याचबरोबर गुजरात राज्य पर्यटन विकास महामंडळाने राबवलेल्या धोरणाचा पुरेपूर उपयोग करून घेत, सातत्याने पाठपुरावा करून, जिल्हाधिकारी व पर्यटन महामंडळ यांच्याशी समन्वय साधून 200 कोटींचा निधी संघटनेने मिळवला होता. पर्यटन विकासामुळेच आज या भागाचा तसेच इथल्या आदिवासींचा विकास होण्यास तसेच त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास फार मोठी मदत झाली 
आहे. 
चित्रकूट रिसोर्टने हॉटेल व्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना उभा केला आहे. शाकाहारी रुचकर भोजन, मुलांसाठी खेळण्याची उद्याने व साहित्य, वैविध्यूपर्ण रचना व नक्षी, फुलांची सजावट, वातानुकूलित खोल्या यामुळे या ठिकाणी येणार्‍यांना राजमहाली आल्यासारखा अनुभव येतो. जाण्या-येण्यासाठी मुंबई, ठाणे, नाशिक येथून वातानुकूलित वाहन व्यवस्था, सुट्टीत मुलांना तसेच त्यांच्या पालकांना, नोकरदार मंडळी, व्यावसायिक, वरिष्ठ नागरिक आदींसाठी पर्यटन अधिकाधिक सुसह्य व्हावे, हा त्यामागचा हेतू असून आहे.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9, पटेल शॉपिंग सेंटर, साईनाथ रोड, सबवे जवळ, मालाड (पश्चिम) येथे किंवा मुंबईत दूरध्वनी - 28812202, 28883943 वर तसेच सापुतारा येथे 02631-237221, 237237 वर अथवा ई मेल hotelchitrakoothotmail.com व वेबसाईट www.chitrakootresort.comसंपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support