Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

महाडमध्ये धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा


 महाड । प्रतिनिधी
महाड तालुक्यात विजयादशमीदिनी धम्मचक्र प्रवर्तनदिन विविध धार्मिक संस्थांच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत बुंद्धांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर याठिकाणी लाखो दलित समाजाला जागतिक किर्तीचा शांतीचा महामार्ग असलेल्या बौद्ध धम्माची दिक्षा दिली. या दिनाचा स्मृतीदिन धम्मचक्र प्रवर्तनदिन म्हणून साजरा केला जातो. महाडमध्ये विविध संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. बौद्ध धम्माची दिक्षा घेतलेल्या या स्मृतीदिनाचे हे 62 वे वर्ष असून तालुक्यातील विविध बौद्ध विहारांमध्ये बौद्ध पूजापाठ घेवून धम्मचक्रप्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी बौद्ध बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देखील दिल्या. महाडमधील चवदारतळे याठिकाणी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये बौद्धजन पंचायत समिती महाड शाखेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चवदारतळे येथील डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संतोष कुशलवर्धन यांचे व्याख्यान देखिल आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी बौद्धजन पंचायत समितीचे तालुका अध्यक्ष अशोक जाधव, दिपक गायकवाड, केशव हाटे, कुंदन हाटे, सखाराम सकपाळ, जयराम तांबे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाच्या बहुउद्देशीय सभागृहामध्ये देखील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी देखील अ‍ॅड.प्रभाकर जाधव यांचे व्याख्यान आयोजति करण्यात आले होते. यावेळी विश्वनाथ सोनावणे, सज्जन पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support