This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

लुटमारीच्या घटनेत कंपनीच्या सेल्स मॅनेजरसह दोन विद्यार्थ्यांचा सहभाग

  
औरंगाबाद । प्रतिनिधी
एका परप्रांतीय अभियंत्याला जिवे मारण्याची धमकी देत एटीएम कार्ड हिसकावल्यानंतर एटीएममधून 16 हजार 500 रुपये काढून नेणार्‍या तीन जणांना एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. आरोपींपैकी एका जण मोठ्या कंपनीत सेल्स मॅनेजर, तर अन्य दोघे अभियांत्रिकीचे विद्यार्थी असल्याचे समोर आले.
यात सेल्स मॅनेजर संकेत रावसाहेब करपे (24, रा. आयोध्यानगर, सिडको एन-7), अभियांत्रिकीचा विद्यार्थी अमित सुनील बुटवले (21, रा. विशालनगर) आणि नहुश पाडळकर (21, रा. सिडको एन-5) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, जी. एस. राहुल (रा. एन-1 सिडको, मूळ रा. छत्तीसगढ) हा चिकलठाणा डीएमआयसीमधील एका खाजगी कंपनीत दोन महिन्यांपासून अभियंता म्हणून कार्यरत आहे. 7 ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जेवण करून फिरण्यासाठी मोटारसायकलने घराबाहेर पडला. त्यानंतर तो त्याच्या कंपनीच्या बाजूला असलेल्या पायर्‍यासमोर येऊन बसला. तो मोबाईलवर बोलत असताना एक अनोळखी तरुण त्याच्याजवळ आला आणि तू येथे कशासाठी आला, असे म्हणाला. त्याचवेळी त्याचे आणखी दोन साथीदार तेथे आले. त्यांनी पकडून राहुलच्या खिशातील एटीएम कार्ड आणि पाकिट बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर जिवे मारण्याची धमकी देत पिन नंबर विचारून घेतला.
आरोपीपैकी एक जण एटीएममधून पैसे काढण्यासाठी राहुलची मोटारसायकल घेऊन एटीएमवर गेला आणि त्याने त्याच्या एटीएम कार्डचा वापर करून 10 हजार आणि 6 हजार 500 रुपये असे एकूण 16 हजार 500 रुपये परस्पर काढून घेतले. यावेळी अन्य दोन आरोपींनी राहुलला पकडून ठेवले होते. या घटनेनंतर राहुलने एमआयडीसी सिडको ठाण्यात धाव घेतली होती.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support