Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, October 6, 2018

महिलांना असले स्वातंत्र्य नको आहे

हाजी अली दर्गा येथे जाण्यासाठी महिलांना अनुमती, त्याआधी शनी मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून तृप्ती देसाई यांनी केलेला संघर्ष आणि आता शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना जाण्यास परवानगी मिळावी यासाठी प्रदीर्घ न्यायालयीन लढाई.. हे सगळे वाचल्यावर वाटते की जणू काही महिलांचे स्वातंत्र्य, आत्मसन्मान फक्त मंदिर-दर्गा प्रवेशाशीच निगडीत झाला आहे. खरी वस्तुस्थिती काय आहे? आज प्रत्येक क्षेत्रात नेत्रदिपक कामगिरी करणार्‍या, पुरुषांपेक्षाही सवाई ठरलेल्या महिलांना, युवतींना, स्वयंनिर्भर मुलींना, ग्रामीण भागातील तळपत्या सौदामिनींना हे असले स्वातंत्र्य नको आहे. नव्या युगाच्या या विद्युल्लतांना त्यांचा आत्मसन्मान जरूर हवा आहे. जुनाट, बुरसटलेल्या विचारसरणीतून लादल्या गेलेल्या बंधनांतून मुक्तता हवी आहे, परंपरांच्या हीन जोखडांतून स्वातंत्र्य हवे आहे. या तीक्ष्ण सुकन्यांना फक्त मंदिर-दर्गा प्रवेशाचे स्वातंत्र्य अपेक्षित नाही. त्यापेक्षाही अधिक काही समाजाकडून अपेक्षित आहे. महिलांना जे हवे आहे, अभिप्रेत आहे ते न देता समाज त्यांना अद्यापही याच गुंत्यात गुंतवू पाहात आहे, स्वातंत्र्याच्या कल्पना सीमीत करून त्यांचा विकास कोंडू पाहात आहे. महिलांचे अनेक प्रश्न आजही न्यायालयाच्या उंबरठ्याशी प्रलंबित आहेत. कित्येक खटल्यांना तारीख पे तारीख दिली जाते. ज्या प्रकरणात माध्यमांनी हस्तक्षेप केलाय त्याच प्रकरणांचा निकाल त्वरीत लावला जातो. त्यामुळे तळागाळातील महिलांविषयक अनेक समस्यांकडे आजही पाठच दाखविली जाते असेच समोर आले आहे. एकविसाव्या शतकातही महिलांना त्यांच्या हक्कांसाठी, अधिकारांसाठी न्यायालयाची पायरी चढावीच लागतेय. परंपरांगत आलेल्या रुढींमुळे महिलांवर अनेक अन्याय, अत्याचार झाले. त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी, आपल्या हक्कांसाठी नेहमीच झगडावं लागलं आहे, किंबहूना आजही त्या झगडत आहेत. पण स्वतःला उच्चशिक्षित, सुसंस्कृत समजणार्या समाजात महिलांना माणूस म्हणून जगण्याचे अधिकार देणे ही नैतिक जबाबदारी आहे असे का समजले जात नाही? महिलांना खर्‍या अर्थआने आत्मसन्मान द्यायचाच असेल तर तो असा द्यायला हवा. गेल्या डिसेंबरमध्ये तिहेरी तलाक विधेयक न्यायालयात मंजूर झाले. पावसाळी अधिवेशनात या विधेयकावर चर्चा होणं अभिप्रेत होतं, मात्र विरोधी पक्षाने घातलेल्या गोंधळामुळे या विधेयकावर आता हिवाळी अधिवेशनात चर्चा होणार आहे. त्यामुळे मुस्लिम समाजातील महिलांचं आता या हिवाळी अधिवेशनाकडे लक्ष लागून राहिलं आहे. मुळात ज्या विषयावर त्वरीत निर्णय घेणं गरजेचं होतं, तो विषय इतका लांबवण्यामागचं कारण काय असेल? या एका विधेयकामुळे कित्येक महिलांना न्याय मिळणार आहे याची कल्पना न्यायालयाला आणि सरकरला असेलच अशी अपेक्षा बाळगुया. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बलात्कारी आरोपींचा. 14 वर्षांखाली मुलींवर बलात्कार केल्यास आरोपींना फाशीची शिक्षा असा कायदा मध्यंतरी करण्यात आला. मात्र हा कायदा तयार होण्याकरता असंख्य मुलींना अत्याचाराच्या महादिव्यातून जावं लागलं, कित्येकींनी जीव गमावला, कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाली. आणि ज्यावेळी ही प्रकरणं वाढू लागली तेव्हा न्यायालयाला कायद्यात बदल करून कठोर कायदा तयार करावा लागला. मात्र त्यानंतरही या कायद्याची भिती कोणालाही उरली नसल्याचंच पहायला मिळतं आहे. कारण हा कायदा तयार झाल्यानंतरही कित्येक चिमुकलींवर असे अत्याचार झाले. आजही शहरातील अनेक गल्लीबोळात अनेक चिमुरडींचं आयुष्य कुस्करलं जातं. गाव-पाड्यात तर बलात्काराच्या घटनांमध्ये वाढच होत असल्याचं दिसून येत आहे. विनयभंग, अश्लिल छायाचित्र प्रसिद्ध करण्याची धमकी, अश्लिल संदेश पाठवून त्रास देणे, एकतर्फी प्रेमातून छेड काढणे अशी कृत्य समाजात खुलेआमपणे होताना दिसतात. हे जेव्हा थांबेल तेव्हा महिला खर्‍या अर्थाने स्वतंत्र होतील. पोलीस जेव्हा महिलांना न्याय मिळावा यासाठी आग्रही होतील, पीडितांच्या बाजूने उभे राहातील तेव्हा महिलांना सन्मान मिळेल. स्त्री पुरुष समानता मिरवणार्या देशात पुरुषप्रधान संस्कृतीचीच छाप अधिक दिसते. मध्यंतरी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील स्त्री अत्याचाराचे जवळपास 91 टक्के प्रकरणे प्रलंबित असल्याची बाब समोर आली होती. आता नवरात्र येत आहे. ज्या महिलांना आपण देवीचे, मातेचे रुप देतो, त्यांचे पूजन करतो त्यांचेच शोषण करताना आपल्या समाजाला जराही लाज वाटत नाही. हा दुटप्पीपणा किती काळ चालणार? समाजाची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत महिलांना प्रवेश स्वातंत्र्य देणारे केवळ कायदे करून उपयोग नाही. लोकांची मानसिकता बदलायला हवी. आणि यासाठी सामाजिक अभिसरण मोठी प्रक्रिया आहे. केवळ महिलांना प्रवेशाचा हक्क मिळाला एवढ्यावर ही बाब संपणारी नाही. या अभिसरणाची सुरुवात तुमच्या आमच्या घरातून झाली तरच महिलांना खरे स्वातंत्र्य मिळेल. त्यासाठी नवरात्रीचा मुहूर्त चांगला आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support