Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

मुंबईलाही व्हायचंय हागणदारीमुक्त...


गेल्या काही वर्षापूर्वी मराठी भाषेत ’येड्याची जत्रा’ या नावाचा चित्रपट येऊन गेला. आणि या चित्रपटात मुख्य पात्राच्या शेतात गावकरी शौचास बसतात. यामुळे त्याची शेती वाया जात असते. यावर तोडगा काढण्यासाठी तो तरूण शासकीय कार्यालयाबाहेर उपोषणाला बसतो, अखेर शासकीय अधिका-यांना त्याची दया येते. ते त्याचे शेत हागणदारीमुक्त करण्यासाठी त्याला साथ देतात. तसेच शासनाच्या योजनेअंतर्गत या गावात शौचकुपी बसवल्यामुळे हे गाव तसेच मुख्य पात्र असलेल्या तरुणाचे शेत हागणदारीमुक्त झाल्याचे दाखविण्यात आले आहे. लेखाच्या सुरुवातीलाच चित्रपटाची माहिती का देण्यात आली आहे, असा प्रश्न येथे उपस्थित होऊ शकतो. पण हे सांगण्या मागचा मुख्य हेतू म्हणजे मुंबई महापालिकेचा ढिसाळ कारभार. आणि त्यामुळे पालिका सभागृहात आरोप प्रत्यारोपांचा रंगणारा कलगीतुरा.
गेल्या वर्षी मुंबई महापालिकेला हागणदारीमुक्तचा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. पण, मुंबईच्या गल्लीबोळात किंवा ज्या ठिकाणी गरीब वस्ती आहेत, अशा ठिकाणी फेरफटका मारला तर गाजावाजा करत देण्यात आलेल्या पुरस्कार प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. असो, पण या परिस्थितीला जबाबदार असणारे पालिकेचे काही फसवे अधिकारी आणि बहुमतांनी विजयी करून दिलेले लोकप्रतिनिधी यांचे काही सोयरसुतक नसल्यासारखेच वाटते.  पालिकेच्या अधिका-यांना कोणत्याही योजनेत आकडे वाढवून स्वतःचे कौतूक करून घेण्याची सवयच झाली आहे. यामुळे, सर्वस्वी मुंबईकरांचे नुकसान होत आहे.  
हागणदारीमुक्त मुंबई या योजनेवर करोडो रुपयांचा चुराडा करूनही मुंबई लोकलच्या किंवा छोट्या रस्त्यांच्या आणि मोठ्या गटाराच्या शेजारी शौचास बसणारे नागरिक सर्रास दिसतात. तरीही पालिकेला किताब मिळतो, ही कौतुकाचीच बाब म्हणावी लागेल. कारण पालिका अधिकार्‍यांना कामात नाहीतर मोठेपणा करण्यात समाधान वाटते. आणि ते हे वेळोवेळी सिद्ध करतात. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या विविध विभागाचे लोकप्रतिनिधी असलेल्या नगरसेवकाना त्यांच्या कर्तव्याची जाणीव झाली. आणि त्यांनी चक्क, मुंबईतील शौचालयांच्या स्थितीवर श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. मात्र, नगरसेवकांच्या या मागणीला केराची टोपली दाखवत प्रशासन पुन्हा हवालदिल झाले. प्रशासनाकडून मिळाणार्‍या या वागणुकीमुळे नगरसेवक संतप्त होऊन त्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवत स्थायी समितीची सभा तहकूब केली.  पण, सत्ताधारी असो वा विरोधक यांच्या मागणीला प्रशासकीय अधिकारी गांभीर्यपूर्वक का घेत नाही असा प्रश्न उपस्थित होताच नगरसेवक त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात कमी पडले असल्याचेच समोर येते. 
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीला स्वच्छ आणि हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेच्या वतीने गेल्या अडीच वर्षात 5300 शौचालये बांधण्यात येणार होती. पण प्रशासनाच्या धीम्या गतीच्या कारभारामुळे अवघ्या 2353 शौचालये बांधण्यात आली.तर उरलेल्या शौचालयांच्या बांधकामासाठी प्रशासनाच्यावतीने तीन महिन्याचा कालावधी मागण्यात आला. परंतु, प्रशासनाला दिलेला कालावधी संपला. पण शौचालय उभारणीचा मुहूर्त काही केल्या पालिका प्रशासनाला सापडलेला नाही.  यावर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरताच प्रशासनाचे अधिकारी यांनी कारणांची पोती खोलायला सुरुवात केली.  यावेळी अधिकार्‍यांनी नवीन शौचालय बांधण्यास विविध अडचणी येत असल्याचे  जाहीर केले. त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रशासनाला 5300 शौचालय अद्याप बांधता आलेली नाहीत. मग लॉट अकरा मधील 22 हजार 400 शौचालये पालिका कशी बंधू शकते, असा सवाल उपस्थित करत प्रशासनाची कोंडी केली. 
पालिकेच्यावतीने 10 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या शौचालयांना 25 वर्षाची हमी देण्यात आली होती, मात्र या शौचालयाच बांधकाम 10 ते 12 वर्षातच कोलमडलेले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने आणि स्वच्छ भारत अभियानाच्या नियमानुसार, प्रत्येक 30 जणांमागे एक शौचकूपी असणे बंधनकारक आहे. तरीही झोपडपट्टीत राहणार्‍या सुमारे 63 टक्के लोकांकरिता 60 हजार शौचकूपींची आवश्यकता आहे. पण पालिकेला दिलेले काम पूर्ण करता येत नाही, तर ते सोईनुसारचा आकडा कधी गाठणार, असा प्रश्न येथे उपस्थित होते. परिणामी, फुटक्या आणि अस्वच्छ शौचालयांमुळे सर्वसामान्य आणि झोपडपट्टीमध्ये राहणारया नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.  
मुंबई महापालिकेला केंद्राकडून हागणदारी मुक्त गौरविण्यात आले. परंतु मुंबईची लोकसंख्या पाहता पालिका किती प्रमाणात यशस्वी होईल याचा अंदाज बांधणे म्हणजेच येड्याला शहाण्याची पदवी दिल्यासारखे होईल. मुंबईत येणा-या प्रत्येक गाडीतून निदान 100 एक परप्रांतातले लोक आश्रयासाठी येतात. यातील अनेकजण डोक्यावर छप्पर मिळवण्यासाठी दिसेल त्या जागेवर अनधिकृत झोपड्या उभारून मुंबईत स्थायिक होतात. या सर्वाना प्रातःविधी करण्यासाठी शौचालय उपलब्ध नसल्याने त्यांच्याकडून उघड्यावरच प्रातविधी उरकला जातो. दहिसर च्या गणपत पाटील नागरापासून वांद्रे , जोगेश्वरी, भांडुप रमाबाई नगर, तुळशेत पाडा, तानाजी वाडी, विक्रोळी टागोर नगर ,पूर्व द्रुत गती महामार्ग, कुर्ला ,गोवंडी ,बैंगणवाडी शिवाजी नगर ,चेंबूर वडाळा ,बरकत अली नका ,शिवडी, रे रोड, कुलाबा अशी एक नाही अनेक नावे घेता येतील. आदी सर्व ठिकाणी मोठया प्रमाणावर झोपडपट्टया आहेत. येथील परिस्थितीचा पालिका अधिकार्‍यांनी सकाळच्या सुमारास येऊन आढावा घेतला तर त्यांना त्यांच्या कामचोरीचा निकाल मिळेल.  
काही महिन्यापूर्वी मुंबईतील विद्याविहार येथे सार्वजनिक शौचालय खचल्यामुळे दोन जणाना प्राणाला मुकावे लागले होते. यानंतर शौचालयांचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे समोर आले. मुंबईच्या विविध भागात असलेल्या अश्या शौचालयाचा प्रश्न ऐन पावसाळ्यात अशा शौचालयांचा प्रश्न ऐरणीवर येतो. झोपडपट्टीमधील अनेक शौचालये सध्या धोकादायक स्थितीत उभी असून अशी शौचालये अनेकांचे जीव घेण्याच्या तयारीत असली तरी हजारो कोटींचा अर्थसंकल्प असला तरी पालिकेच्या कामचुकार अधिकार्‍यांमुळेच आणि त्यांचे प्रश्न मांडण्यात कमी पडलेल्या त्यांच्या लोकप्रतिनिधीमुळे नागरिकांवर ही वेळ ओढावत आहे. उपरोल्लेखित चित्रपटाच्या उदाहरणात चित्रपटाचा शेवट गोड झाला होता, मात्र पालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे मुंबईकरांनाही तसे अच्छे दिन येतीलच याची शाश्वती नाही.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support