Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 12, 2018

संभाजी महाराजांना पुन्हा ठरवले मद्यपी

‘सर्व शिक्षा अभियाना’च्या पुस्तकात राजांची बदनामी

 मुंबई । प्रतिनिधी
सर्व शिक्षा अभियानातंर्गत पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक मजकूर छापण्यात आल्याने राज्यभरातील जनतेत संतापाची लाट उसळली आहे.‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या डॉ. शुभा साठे लिखित पुस्तकात ‘संभाजी राजा हा दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता’,असा उल्लेख करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेड संघटनेने या पुस्तकावर आक्षेप घेत लेखक आणि सरकारच्या करंटेपणावर हल्ला चढवला आहे. तसेच याप्रकरणात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. 

सर्व शिक्षा अभियानात समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकाचा समावेश असून हे पुस्तक डॉ. शुभा साठे यांनी लिहिले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन नागपूरमधील लाखे प्रकाशनाने केले आहे. यात पान क्रमांक 18 वर संभाजी महाराजांविषयी बदनामीकारक उल्लेख आहे.रायगडावरून संभाजीराजांनी केलेल्या अनेक खर्‍या-खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारूच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तीळतीळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले, असा उल्लेख या पुस्तकात आहे.
शुभा साठे यांनी समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात शिवछत्रपती संभाजी महाराज यांची बदनामी केली आहे. त्यांचे हे  वादग्रस्त पुस्तक महाराष्ट्र सरकारने सर्वशिक्षा अभियानातून मागे घ्यावे व शुभा साठे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. साठे यांनीही महाराष्ट्राची माफी मागावी.-आमदार जितेंद्र आव्हाड, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
सर्व शिक्षा अभियानाच्या पुस्तकात कोणताही पुरावा नसताना छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करण्यात आली आहे. हा निव्वळ करंटेपणा असून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, असा हा भयंकर मजकूर शालेय प्राथमिक पुस्तकात छापला जातो हे राज्य सरकारचे दुर्दैव आहे.- संभाजी ब्रिगेड
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support