Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Friday, October 19, 2018

परतीच्या पावसामुळे महाडमधील भातशेती कुजण्याच्या वाटेवर

भात पिकाची मळणी करून उरलेल्या भागाचा पेंढा गुरांचे खाद्य म्हणून वापरला जातो. मात्र हा पेंढा देखील भिजल्याने यामध्ये बुरशी किंवा कुजण्याची प्रक्रीया होण्याची शक्यता आहे. रचलेल्या उडव्यांमध्ये असलेला भात कुजण्याआधी शेतकर्‍यांना पुन्हा बाहेर काढून उन्हात सुकवावा लागणार आहे.

  महाड । प्रतिनिधी
दोन महिन्यांपासून गुडूप झालेल्या पावसाने बुधवारी वीजांच्या कडकटांसह हजेरी लावली. अचानक बरसलेल्या या मुसळधार सरींमुळे भातपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील दासगाव परिसराला या पावसाने चांगलेच झोडपल्याने भातशेतात साचलेल्या पिकावर पावसाचे पाणी पडल्याने हे भात कुजण्याची शक्यता शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. 
बुधवारी बरसलेल्या परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या पिकाचे नुकसान केले आहे. तालुक्यात काही भागात भाताची रोपे कापून उडवी देखील रचली गेली आहेत. काही भागात भात पिक कापणी सुरू झाली आहे. याच दरम्यान हा पाऊस पडल्याने भातपिकाचे नुकसान झाले आहे. दासगाव परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, यामुळे कापण्यात आलेल्या भातपिकावर आणि उभ्या पिकावर पावसाचे पाणी पडल्याने भाताचे नुकसान होणार आहे. महाड तालुक्यात दासगाव प्रमाणेच रायगड, विन्हेरे, बिरवाडी आदी परीसरात देखील पाऊस पडला. 
परतीच्या पावसाने भातपिक खराब होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकर्‍यांचे भातपिक भिजले आहे, त्यांचा पंचनामा करून कृषी विम्यातून त्यांची नुकसान भरपाई मिळेल. - विजय पांढरे, तालुका कृषी अधिकारी महाड

बुधवारी पडलेल्या पावसाने भातजमिनीत पाणी साचले आहे. काही ठिकाणी भात कापणी केली असतानाच पाऊस आल्याने कापून आडवे टाकलेले भात भिजले आहे. रचलेल्या उडव्यात पाणी गेल्याने हे पीक कुजण्याची देखील शक्यता आहे.- किसन पवार, शेतकरी
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support