Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

लोकसभेसाठी युती, विधानसभेला काडीमोड!

  शरद पवार यांनी मांडली शिवसेना-भाजपाची गणिते
मुंबई ।  प्रतिनिधी
शिवसेना लाखभले स्वबळाचा नारा देत असली तरी लोकसभेसाठी शिवसेना-भाजपात युती होईल आणि विधानसभेसाठी दोघेही वेगळे लढतील, असे गणित राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिकरिक गप्पा मारताना मांडले. काही दिवसांपूर्वी लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होतील, असे भाकित त्यांनी वर्तवले होते, मात्र यावर बोलताना त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
राफेल प्रकरणावर प्रतिक्रिया विचारता शरद पवार म्हणाले, राफेल विमाने चांगली आहेत, त्याबद्दल दुमत नाही. परंतु खरेदीच्या किमतीबाबत आक्षेप असून लोकांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. सरकारला जनतेचा हा संशय दूर करावा लागेल. भाजपविरोधी पक्षात असताना बोफोर्सवरून सरकारला सळो की पळो करून सोडले होते. टू जी गैरव्यवहाराच्या चौकशीसाठीही भाजपने आक्रमकता दाखवत संसदेचे अधिवेशन बंद पाडले होते. त्यामुळे राफेल विमान खरेदी आरोपाबाबत विरोधक करत असलेल्या चौकशीची मागणी त्यांना मान्य करावीच लागेल. राफेल विमान खरेदीबाबत आरोप होत असतानाच संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन फ्रान्सच्या दौर्‍यावर गेल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

भारिप-एमआयएम युतीचा परिणाम नाही
प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमच्या एकत्र येण्याने राज्यात काय फरक पडेल, असे विचारता शरद पवार म्हणाले, मुस्लिम समाज विचारपूर्वक मतदान करत असल्याने ते दोघेही एकत्र आले तरीही त्याचा राज्यात फारसा परिणाम होणार नाही.

ईव्हीएमबाबत लवकरच बैठक
ईव्हीएम घोटाळ्याबात बोलताना शरद पवार म्हणाले, ईव्हीएमबाबत विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवत बॅलेट पद्धतीने मतदान घ्यावे, अशी मागणी केली आहे. याबाबत 15 दिवसांत विरोधी पक्षनेत्यांची बैठक घेतली जात असून त्यात व्यूहरचना निश्चित केली जाईल.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support