Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

बेसुमार महागाई करून मोदींनी दिले अच्छे दिनाचे गाजर

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश महिलाध्यक्षा चित्रा वाघ यांची टीका
अंबरनाथ । प्रतिनिधी
निवडणुकीपूर्वी सत्तेत येताना अच्छे दिनाचे गाजर दाखवणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फसव्या धोरणांमुळे महिलांना अच्छा फटका बसला आहे. आगामी निवडणुकीत अशा फसव्या सरकारला त्याची जागा दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अंबरनाथमध्ये झालेल्या महिला मेळाव्यात केले. 
दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, तरुणांना नोकर्‍या नसल्याने बेरोजगारी, रेशनवर अन्नधान्याचा खडखडाट, तुरडाळीची बेसुमार भाववाढ अशी बिकट परिस्थिती आणणार्‍या मोदी सरकारची डाळ आगामी निवडणुकीत शिजवू देऊ नका, असेही आवाहन वाघ यांनी केले. 
राष्ट्रवादी महिला काँग्रेस अंबरनाथ शहराच्या वतीने अंबरनाथ पूर्वेकडील  रोटरी सभागृहात महिला पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष सदाशिव पाटील व महिला शहराध्यक्ष पूनम शेलार यांनी केले होते. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ व जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे यांनी उपस्थिती दर्शविली होती. तसेच दशरथ तिवरे, सचिन सदाशिव पाटील, सदाशिव पाटील, पूनम  शेलार, प्रिसिला डिसिल्वा, स्वाती पवार, युवती अध्यक्ष ऐश्वर्या मोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support