This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 22, 2018

शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर

केडीएमसीचा श्रीमंतांना वेगळा न्याय, गरिबांना वेगळा न्याय?

  कल्याण । प्रतिनिधी
शिवाजी चौक, महम्मद अली चौक ते महात्मा फुले चौक दरम्यानच्या रस्ता रुंदीकरणाच्या कामात बाधित झालेल्या कॅनरा बँकेच्या इमारतीला प्रशासनाने चक्क 200 स़्केअर मीटर जागेच्या बदल्यात तब्बल 700 स़्केअर मिटरचा भूखंड दिला. तसेच नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांनी व भाजपने पाच कोटीची सुपारी घेतली असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी  यांनी केला.
मात्र हा विरोध डावलून महापौर राणे यांनी हा प्रस्ताव तांत्रिक बाबी तपासून घेण्याचे आदेश देत मंजूर केल्याने संतापलेल्या शेट्टी, कासिफ ताणकी यांनी सभागृहात महासभेचा अजेंडा फाडून फेकत निषेध व्यक्त केला. दरम्यान, या मुद्दयावर शिवसेनेचे दोन गट एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पहायला मिळाले.
कल्याण पश्चिमेकडील शिवाजी चौक ते महम्मद अली चौक या रस्त्याचे रखडलेले रुंदीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त इ रवींद्रन याच्या कार्यकाळात पार पडले. या कामात  कॅनरा बँकेची देवराज भवन ही इमारत बाधित झाली होती. यामुळे बँकेचे कामकाज इतरत्र इमारती मधून सुरु होते. दरम्यान, या इमारतीच्या बदल्यात आपल्याला मोक्याची जागा मिळावी अशी मागणी बँक व्यवस्थापनाकडून करण्यात आली होती. मात्र, बाधितांच्या पुनर्वसन धोरणानुसार या बँकेचेदेखील पुनर्वसन केले जाईल, अशी भूमिका तत्कालीन आयुक्तांनी घेतल्याने याविरोधात व्यवस्थापनाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. 
उच्च न्यायालयाने याप्रकरणी महासभेने जागा देण्याबाबत उचित निर्णय विहित मुदतीत घेण्याचे आदेश दिले होते. यानंतर या प्रस्ताव न्यायालयाच्या आदेशानुसार पटलावर ठेवण्यात आल्याचे सांगत या प्रस्तावाला मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली. प्रस्ताव चर्चेला येताच नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी  या बँकेची केवळ 200 स्क्वेअर मीटर जागा बाधित होत असताना पालिका प्रशासनाने त्यांना 700 स्क्वेअर मीटर जागेची खिरापत देण्याचा घाट का घातला जात आहे. 12 वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या सामान्य नागरिकांना वेगळा न्याय आणि श्रीमंतांना  वेगळा न्याय का? असा सवाल  उपस्थित केला होता. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support