Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

कल्याण, डोंबिवलीत मोकाट कुत्र्यांची दहशत

 मेट्रो मॉल परिसरात तोडले वृद्धेचे लचके  
कल्याण डोंबिवली शहरात रात्री कामावरून परतणार्‍या  नागरिकांना भटक्या कुत्र्यांचा जाच सहन करावा लागत आहे. शहरातील कचरा कुंड्या,  उकिरडा,  रेल्वे स्टेशन,  मंदिर परिसर, शाळा पटांगण, सोसायटी, सार्वजनिक ठिकाणी व  संपूर्ण शहरात ही कुत्री फिरत असतात. कधी कोणत्या बाजूने आलेला कुत्रा चावा घेईल याचा काहीच नेम नसतो.

 कल्याण । प्रतिनिधी
कल्याण, डोंबिवली परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढू लागली असून, कल्याण पूर्वेला मेट्रो मॉल परिसरात रविवारी संध्याकाळी एका वृद्ध महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढवून तिचे अक्षरशः लचके तोडले. गंभीर जखमी झालेल्या या महिलेला उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
गेल्या महिन्यात घराबाहेर खेळणार्‍या दोन लहान मुलींवर कुत्र्यांनी हल्ला केला होता. लागोपाठ घडणार्‍या या घटनांमुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
नागरिक आपला जीव मुठीत घेवून घर गाठतात. लहान मुले, नागरिकांना लक्ष्य करीत असल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातवरण पसरले आहे. गेल्या महिन्यातच मलंग रोड अमरदीप कॉलनी व चक्की नाका परिसरात दोन लहान मुलींचे या कुत्र्यांनी चावे घेतले होते.
पालिका प्रशासन नेहमीच श्वान नसबंदीचा दावा करत असले तरी या श्वान दंशाच्या वाढत्या घटनांमुळे हा दावा फोल ठरला आहे.

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support