Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Saturday, October 6, 2018

दरवाढ करून भाजपाने आपले सरकार चालवले


राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांची टिका
 भिवंडी । प्रतिनिधी
अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून मोदींनी जनतेची फसवणूक केली. सत्तेवर येताच त्यांनी इंंधन व गॅस सिलिंडरची दरवाढ करून सर्व सामान्य नागरीकांची पिळवणूक सुरू केली आहे. जिवनावश्यक वस्तूची दरवाढ करून भाजपाने आपले सरकार चालविले आहे, अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भिवंडीत आयोजित केलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्या प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली. 
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शहरातील रिजेन्ट गार्डन सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष खालिद गुड्डू शेख यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजीमंत्री गणेश नाईक, निवडणूक निरीक्षक नसीम सिद्दीकी, महिला अध्यक्ष स्वाती कांबळे, अनिल फडतरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अदानी, अंबानी यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली असल्याने हे सरकार उद्योगपतींचे आहे, अशी टिका माजीमंत्री गणेश नाईक यांनी याप्रसंगी केली. भाजप सरकारची नोटबंदी, जीएसटी यांसारख्या फसव्या धोरणांमुळे देश दहा वर्षांनी मागे पडला असून राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज भाजप सरकारच्या केवळ चार वर्षांच्या काळात झाले असल्याची माहिती देखील याप्रसंगी बोलताना माजी मंत्री नाईक यांनी दिली.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support