Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

ज्ञानोपासक महाविद्यालयाचा भुखंड लाटणारा तलाठी अटकेत


  परभणी । प्रतिनिधी
ज्ञानोपासक महाविद्यालयातील कर्मचार्‍यांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी घेतलेला भुखंड खोट्या नोंदी करून भुखंड लाटणार्‍या तलाठी दत्तात्रय कदम याला पोलिसांनी शुक्रवारी (ता.12) रात्री अटक केली. तलाठी कदम याला अटक झाल्यामुळे या प्रकरणातील आरोपी असलेले माजी खासदार गणेश दुधगावकर यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे.
येथील ज्ञानोपासक महाविद्यालय हे माजी खासदार गणेश दुधगावकर यांचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील 135 कर्मचार्‍यांनी गृहनिर्माण संस्था स्थापन करून सर्वे नंबर 613 मध्ये स्वतःच्या पैशातून 16 एकर 8 गुंठे जमीन घेतली होती. ही जमीन मुख्यप्रवर्तक नारायण माधवराव बुलंगे यांच्या नावे खरेदी केली होती. त्यानंतर माजी खासदार गणेश दुधगावकर व महसूल विभागातील तलाठी डी.एस.कदम यांनी महसुल दप्तरी बनावट व खोटे फेरफार नोंदवून ती जमीन माजी खासदार गणेश दुधगावकर यांच्या नावे करून दिली.
या प्रकरणी ज्ञानोपासक महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस. सोळूंके यांनी नानलपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. यावरून माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांच्यासह महसुल विभागातील दत्तात्रय श्रीरंग कदम, निवृत्त तलाठी रावसाहेब भागुजी पाटील, निवृत्त मंडळ अधिकारी तुकाराम पवार, निवृत्त नायब तहसिलदार वि.गो.गायकवाड, निवृत्त मंडळ अधिकारी विजय कुलथे यांच्या विरुध्द ता. 16 डिसेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल केला होता.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support