Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 8, 2018

शिवसेनेवर निष्ठा आणि शिंदेसाहेबांवर पूर्ण विश्वास : देवराम भोईर मैदानातविधानसभेसाठी माझी तयारी सुरू!
विधानसभेसाठी माझी तयारी कधीच सुरू झालीय. मी सीट नक्कीच निवडून आणीन आणि शिवसेनेचा भगवा डौलाने फडकवीन. पक्षावर माझी निष्ठा आहे आणि पालकमंत्री, आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेबांवर अतूट विश्वास आहे. पक्षप्रवेशाच्या वेळी मला दिलेला शब्द ते नक्कीच पूर्ण करतील याची मला खात्री आहे, असे सांगत ठाणे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर तथा नाना यांनी विधानसभेच्या उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत.
या मतदारसंघात माझी अडीच लाख मतं पक्की आहेत. शिवाय माझी 5 जणांची टीम मतदारसंघात काम करते आहे. मतदारांची नोंदणी सुरू आहे. शिवसेनेचा भगवा मी फडकवणार यात शंकाच नाही. बाकी इतर गोष्टींची चर्चा मी आता करणार नाही. जर-तर च्या गोष्टी आता नकोतच. वेट अँड वॉच, असे सांगत नाना दिलखुलास हसले.  शिंदेसाहेब, खासदार राजन विचारे, आमचे लोकप्रतिनिधी सर्वांशीच माझे चांगले संबंध आहेत. शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही पक्ष वाढवतो आहोत, असे सांगत त्यांनी खासदार विचारे यांनी त्यांच्या मतदारसंघात दिलेल्या निधीचा आवर्जून उल्लेख केला.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत राहू, पक्षाला आणखी चांगले दिवस यावेत यासाठी सर्वोतोपरी झटत राहू, असे त्यांनी सांगितले.
ठाण्याच्या विकासात्मक भरारीविषयी त्यांनी एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना सर्व श्रेय दिले. गेल्या 3 वर्षांत ठाणे शहराचा जयस्वाल यांनी कायापालट केला आहे. कोणालाही न जमणारे काम आयुक्तांनी करून दाखवले आहे, असे सांगताना त्यांनी शहरांतील रस्ते रुंदीकरणाचा खास उल्लेख केला.
 स्वार्थासाठी मी कधीच कोणासमोर हात जोडले नाहीत. भोईर कुटुंबियांमुळे ठाण्यात शिवसेनेला एकहाती सत्ता मिळाली, असे सांगत शिवसेनेचा ठसा उमटावा यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पण त्यासाठी सभागृह नीट चालले पाहिजे, लोकांची कामे व्हायला हवीत. गटचर्चा हवी, प्रस्तावपूर्व चर्चा हवी, अधिकारी-नगरसेवक यांच्यात चर्चा घडवून आणायला हवी. ज्येष्ठ नगरसेवकांचे म्हणणेही विचारात घ्यायला हवे, असे ते म्हणाले.माझी भूमिका ही नेहमीच रोखठोक असते, मला जे पटत नाही ती गोष्ट मी कधीच करत नाही. या परखडतेमुळे कधी कधी कटुताही येते, मात्र सभागृहात अपमान कधीही सहन करणार नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
चणेशेंगदाणे खाऊन सभागृह चालवू नये
सभागृह वेळेत सुरू व्हायला हवे तरच कामकाज नीट होईल. चणे शेंगदाणे खायचे आणि सभागृहातील चर्चेकडे दुर्लक्ष करायचे, अशाने शिवसेनेचा ठसा उमटणार तरी कसा? असा घरचा अहेर देवराम भोईर यांनी दिला. लोकप्रतिनिधी ही ताकद आहे. ती जनसेवेसाठी वापरली तरच शिवसेनेचा अमीट ठसा उमटेल, याचं भान ठेवायला हवं, असे ते म्हणाले.
महापालिकेत गोल्डन गँग पुन्हा सक्रिय
बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणानंतर ठाणे महापालिकेत गोल्डन गँग अस्तित्वात असल्याची माहिती समोर आली होती. परमार प्रकरणाला दोन वर्षे उलटली असली तरी आताही ठराविक नगरसेवकांची गोल्डन गँग कार्यरत असून त्यांच्यामार्फतच सगळा कारभार हाकला जातो, असा खळबळजनक आरोप देवराम भोईर यांनी केला. महापालिकेत ठरावीक नगरसेवकांची चलती असते, ही गँग ठरवेल तीच पूर्व दिशा असा कारभार महापालिकेत सुरू आहे. त्यामुळे महापालिकेचे जे काही वाटोळे झाले त्यास जबाबदार गोल्डन गँगच आहे, असा ठपका त्यांनी ठेवला.

Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support