Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

ठाण्यापुढील पाचवी आणि सहावी मार्गिका जूनपर्यंत


ठाणे । प्रतिनिधी
ठाणे स्थानकापुढील प्रवाशांसाठी जास्त फेर्‍या सोडता याव्यात याकरता बांधण्यात येत असलेली पाचवी-सहावी मार्गिका जून 2019 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर जवळपास 50 हून अधिक लोकल फेर्‍या ठाण्यापासून सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकलमधील गर्दी कमी होण्यास मदत होईल. 
मुंब्रा रेतीबंदर येथे पाचव्या व सहाव्या मार्गिकेसाठी उड्डाणपूल करण्यात येणार असून त्याचे पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. परंतु, दोन दिवसांपूर्वी ओहोटीच्या वेळी येथील जमीन पाण्यासोबत वाहून गेल्यामुळे पाइलिंग रिंग मशिन खाडीत पडली, तसेच पाइलिंगच्या कामालाही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे खासदार डॉ. शिंदे यांनी रविवारी सकाळी एमआरव्हीसीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहाणी केली. सुरक्षिततेची सर्व खबरदारी घेऊन पाइलिंगचे काम करावे, जेणेकरून भविष्यात प्रवाशांचा जीव धोक्यात येणार नाही. 
आवश्यक असेल तर खाडीकिनारी संरक्षक भिंत बांधावी, जेणेकरून खाडीचे पाणी आत शिरून जमिनीला धोका निर्माण होणार नाही, अशी सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी एमआरव्हीसीचे मुख्य प्रकल्प अधिकारी म्हस्के यांना केली.  यावेळी ठाणे महापालिकेचे उपमहापौर रमाकांत मढवी, माजी नगरसेवक बालाजी काकडे, सुधीर भगत, एमआरव्हीसीचे उपमुख्य अभियंते कुलकर्णी आदी उपस्थित होते.

खारेगाव येथील रेल्वेच्या टनेलपासून मुंब्रा स्थानकापर्यंत सुमारे सव्वा किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारण्यात येत असून यात 65 पिलर असणार आहेत. या पिलर्सची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. हा उन्नत मार्ग बांधण्याचा निर्णय रेल्वेने आयत्या वेळी घेतला. रेतीबंदरची जागा या प्रकल्पाला मिळावी, यासाठी खा. डॉ. शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकार्‍यांकडे सातत्याने पाठपुरावा करून ही जागा उपलब्ध करून दिली. 200 मीटरमध्ये कांदळवनांचा भाग असून त्यासाठी वनविभागाची परवानगीही प्राप्त झाली आहे. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support