Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

सेजल, सिध्दांत, जतिन, हर्षित शालेय कॅरम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत


 मुंबई । प्रतिनिधी
बंगाली एज्युकेशन सोसायटी इंग्लिश हायस्कूलच्या सेजल लोखंडेने आयईएस हायस्कूल-वांद्रेच्या रोनक थोरीचे आव्हान 2-1 असे संपुष्टात आणले आणि शालेय मुलामुलींच्या पहिल्या मुंबई महापौर चषक कॅरम स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पोर्ट्स असोशिएशन फॉर स्कूल चिल्ड्रेन, अभ्युदय स्पोर्ट्स-वेल्फेअर असो., एसएएससी, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व श्री सावता माळी भुवन ट्रस्ट यांच्यातर्फे आयोजित शालेय कॅरम स्पर्धेत आयईएस सुळे गुरुजी हायस्कूलचा सिध्दांत शिंदे, व्ही. एल. नपु हायस्कूलचा जतीन गोहिल, आयईएस हायस्कूल-वांद्रेचा हिमांशू देवरुखकर यांनी उपांत्यपूर्व फेरीचे सामने जिंकले.
उपांत्यपूर्व फेरीत शालेय मुलींचे एकमेव प्रतिनिधित्व करणार्‍या  सेजल लोखंडेने पहिला सेट 14-13 असा जिंकल्यावर रोनक थोरीने दुसर्‍या सेटमध्ये 20-4 असा विजय मिळविला आणि 1-1 अशी बरोबरी साधत सामन्यामध्ये रंगत आणली. तिसर्‍या सेटमध्ये पहिलाच बोर्ड 8 गुणांचा घेत रोनकने दमदार प्रारंभ केला. परंतु सेजलने संयमी खेळ करीत तिसर्‍या बोर्डला 11-8 अशी आघाडी घेत निर्णायक सहावा बोर्ड 17-14 असा जिंकला आणि उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केला. ही अटीतटीची लढत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांनी सपत्नीक पाहून दोघांना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यावतीने शुभेच्छा दिल्या.
अन्य सामन्यात सिध्दांत शिंदेने नेहरूनगर मनपा शाळेच्या आयन अन्सारीचा 1-12, 21-6, 16-8 असा; जतीन गोहिलने नपु हायस्कूलच्याच चिराग परमारचा 16-1, 22-4 असा तर हिमांशू देवरुखकरने केनिया-अंकोर स्कूलच्या हर्षित जैनचा 23-0, 25-0 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support