Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 8, 2018

निवडणूक जिंकणे हाच राष्ट्रवादीचा फॉर्म्युला!


मुंबईत लोकसभेसाठी दोन जागा, मनसेशी चर्चा नाही
 मुंबई । प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीत समविचारी पक्षांशी आघाडी गृहित धरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. या उमेदवारांची चाचपणीही करण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी रविवारी सांगितले. मात्र या निवडणुकीत अधिकाअधिक जागा जिंकणे हाच पक्षाचा फॉर्म्युला आहे, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. लोकसभेसाठी मुंबईत दोन जागा मागणार असून एका जागेऐवजी आणखी एक जागा मागा, अशा सूचना कार्यकर्त्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मनसे बाबत कोणतीही चर्चा आम्ही कुणीच केली नाही, असे स्पष्ट केले.
समविचारी पक्षांमध्ये जे पक्ष बसतील त्यांच्याशी आम्ही चर्चा करत आहोत. त्या चर्चा सुरू आहेत आणि मला खात्री आहे की, महाराष्ट्रात सर्व पक्षांना घेऊन एक सक्षम असा पर्याय आम्ही महाराष्ट्रात लोकसभेला देऊ, असेही जयंत पाटील म्हणाले.
गेले दोन दिवस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी पाटील बोलत होते. आम्ही कोणत्या जागा लढवणार आणि कोणत्या नाही याविषयापेक्षा ज्या मतदारसंघात आमची शक्ती आहे, अशा हातकणंगले लोकसभा मतदारसंघापासून ते यवतमाळ मतदारसंघापर्यंतच्या राष्ट्रवादीची ताकद असलेल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना बोलावून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पक्षीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला, असेही पाटील म्हणाले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support