Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

देवीमंत्रांचं सामर्थ्य जाणणार्‍या डॉ. पुष्पलता धुरी

महिलांनी विविध क्षेत्रात क्रांती केली आहे. पण अशीही एक आदिशक्ती आहे जिने केवळ एकच क्षेत्र पादक्रांत केले नाही तर विविध क्षेत्रात तिने आपले पाय घट्ट रोवले आहेत. डॉ.पुष्पलता धुरीही त्यातीलच एक. वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना गायत्री मंत्र, ॐकार मंत्राच्या साहाय्याने त्यांनी अनेक रुग्णांना बरे केले आहे. शिवाय विद्यार्थ्यांना समुपदेशन करणे, नैराश्यग्रस्तांना मार्गदर्शन करणे, व्यसनाधिन लोकांना व्यसनमुक्त करण्याचेही कार्य केले आहे.
एखादा व्यक्ती आजारी पडला, त्याला अनन्यसाधारण आजार झाला की त्याची जीवनाप्रतीची आस्था संपते. डॉक्टरांच्या औषधांमुळे त्याचे शरीर पूर्वस्थितीत येईलही, मात्र त्याची मानसिक स्थिती पूर्ववत आणण्यासाठी गायत्री मंत्र, आपल्या संस्कृतीत मंत्र, जप यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. गायत्री मंत्र, ॐकार मंत्रांचेच सहाय्य घ्यावे लागते.  म्हणूनच डॉ.पुष्पलता धुरी यांनी आपल्या समृद्ध संस्कृतीतील या मंत्रांचा वापर वैद्यकीय क्षेत्रात करण्याचेही ठरवले.
डॉ.पुष्पलता धुरी यांनी वैद्यकीय क्षेत्रातही या मंत्राचा वापर करत रुग्णांवर उपचार केले आहेत. सध्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा प्रचंड वाढली आहे. प्रत्येक पालकाच्या आपल्या मुलांप्रती वेगवेगळी स्वप्ने असतात. मात्र या स्वप्नांचं त्या मुलाला ओझं होतं. आणि नेमकी हीच गोष्ट पालकांना कळत नाही. या पालकांच्या स्वप्नांचा ताण जाणवू लागला की मुलांना नैराश्य येतं, काहीजण आत्महत्येचा मार्ग अवलंबतात. मात्र अशा मुलांना योग्य मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. त्यांना त्यांच्या जीवनाचा मार्ग दाखवणं गरजेचं आहे. म्हणूनच डॉ.पुष्पलता धुरी यांनी या क्षेत्रात भरीव काम करायला सुरुवात केली. निसर्गात उपलब्ध असलेल्या औषधांसोबतच त्यांनी पुराणात सांगितलेल्या जप आणि मंत्रांचाही आधार घेतला. या गायत्री मंत्र, ॐकार मंत्र, हवाला मंत्र, ध्यान आदी माध्यमातून त्या विद्यार्थ्यांवर उपचार करतात. स्मरणशक्ती वाढवण्यापासून ते विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवण्यापर्यंतचे सारे गुण या मंत्रात असल्याचे पुष्पलता धुरी सांगतात. एवढंच नव्हे तर, व्यसनाधिन झालेल्या पीडितांनाही त्यांनी ध्यानसाधनेद्वारे व्यसनमुक्त केलं आहे.
डॉ.धुरी म्हणतात की जिथं वैद्यकशास्त्र संपतं, तिथे इश्वरी तत्व सुरू होतं. इश्वराचे जप केल्याने, त्याची मनापासून आराधना केल्याने आपले मानसिक स्वास्थ्य टिकतं. पण परमेश्वराचं नामस्मरण करत असताना ते नुसतंच न करता ते नामस्मरण गाऊन केलं पाहिजे. एवढेच नव्हे तर घरातील प्रत्येकाने समुहाने हे नामस्मरण केल्यास घरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. परमेश्वर, आदिमाया, आदिशक्ती ही आपल्यातच सामावलेली असते. प्रत्येक मानवामध्ये इश्वरीशक्ती वावरत असते. फक्त या शक्ती आपल्यात जागृत करण्यासाठी त्याचे नामस्मरण केले पाहिजे. कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये रुद्रग्रंथी आहे, ब्रह्मग्रंथी आहेत. ज्या ज्यावेळी या मंत्रांचे गायन केलं जातं त्या त्या क्षणी ते ज्वाज्वल्य स्वरुपात येतात. एक वेगळ्याच प्रकारचे तेज मानवाला मिळते. त्याच्या आयुष्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायला लागतात.
वैद्यकीय क्षेत्राला या मंत्राचा आधार दिल्याने जुने आजार बरे झाले असल्याचे डॉ.पुष्पलता धुरी सांगतात. कर्करोग पीडित रुग्णांना औषधांची गरज तर आहेच, औषधांशिवाय त्याचा रोग बरा होणारच नाही, मात्र या रुग्णांमध्ये जगण्याची शक्ती वाढवण्याची ताकद गायत्री मंत्रात असल्याने या रुग्णांना मी नेहमी गायत्री मंत्र गायन करण्यास सांगते, असे डॉ. पुष्पलता धुरी सांगतात. सामुदायिक मंत्र गायन केल्याने त्याची अधिक शक्ती मिळते, या गायनाने आदिमाया कवेत घेते, अलिंगण देते, तिचं प्रेम मिळतं. आणि हेच प्रेम आपल्याला अधिक ऊर्जा देते असं डॉ. धुरी सांगतात.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support