Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 8, 2018

देश मोठ्या परिवर्तनातून जातोय!


 देहरादून । वृत्तसंस्था 
आपला देश मोठ्या सामाजिक आणि आर्थिक बदलांना सामोरा जात असून त्याचा परिणाम म्हणून एक नवा भारत घडत आहे. हाच नवा भारत वैश्विक प्रगतीसाठी प्रेरक ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमध्ये आयोजित ‘इन्व्हेस्ट समिट’मध्ये केले. आम्ही निर्धाराने आणि वेगाने नव्या भारताच्या दिशेने जात आहोत. आगामी दशकात भारत हा जगाच्या प्रगतीचे इंजिन होणार असल्याचा अंदाज जगातील प्रत्येक मोठी संस्था करत आहे. गेल्या वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ही स्थिर झाली आहे. वित्तीय तूट कमी झाली असून महागाई नियंत्रणात आली आहे. तर मध्यमवर्गाचा उदय होत आहे. मोठ्या प्रमाणात व गतीने अभूतपुर्व सुधारणा घडत आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षात राज्य व केंद्र सरकारने केलेल्या 10 हजार सुधारणांचा समावेश आहे. महत्त्वाचे बदल केल्याने उद्योगानुकूलतेबाबत देशाच्या मानांकनात 42 पाँईटची वाढ झाल्याचे पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले. 
पुढे पंतप्रधान म्हणाले, की जीएसटी हा स्वातंत्र्यानंतर करामध्ये केलेला सर्वात  मोठा बदल आहे. यामुळे संपूर्ण देश एक बाजारपेठ झाली असून कराचा विस्तार वाढला आहे. पायाभूत विकास हा विक्रमी गतीने वाढत आहे. गेल्या वर्षात 10 हजार किलोमीटरहून अधिक राष्ट्रीय महामार्गाची कामे करण्यात आली आहेत. याचाच अर्थ 27 किलोमीटरचे रस्ते रोज बांधण्यात आले आहेत. हा रस्त्यांचा विकास पूर्वीच्या सरकारपेक्षा दुप्पट असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support