Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

बनावट व्हिडिओच्या माध्यमातून कुणाल पाटील यांची बदनामी

बॅनर फाडल्याचा खोटा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
 कल्याण । प्रतिनिधी
या व्हिडिओमध्ये दोन मुले हात जोडून बॅनर फाडण्यासाठी माफी मागत असून आम्हाला नगरसेवक कुणाल पाटील आणि बसूर यांनी बॅनर फाडायला सांगितले होते. व्हिडियोच्या माध्यमातून तपास सुरू केला असता, या दोन मुलांनी कोणतेही बॅनर फाडले नव्हते, फक्त नगरसेवक कुणाल पाटील यांना बदनाम करण्यासाठी त्यांना मारहाण करत त्याच्या तोंडून वदवून घेत हा व्हिडिओ तयार करण्यात आला.
नगरसेवकाची बदनामी करण्यासाठी खोटा व्हिडिओ बनवत सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक कुणाल पाटील यांच्या सांगण्यावरून आपण राहुल पाटील या व्यक्तीचा वाढदिवसाचा बॅनर फाडला असल्याचा खोटा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. आपल्याला बदनाम करून राजकीय आणि सामजिक कारकीर्द संपुष्टात आणण्यासाठी हा सर्व प्रकार केला असल्याची माहिती नगरसेवक कुणाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दोन मुलांना धमकी देत मारहाण करत त्यांच्या तोंडून हे वदवून घेत हा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडियो पाहून संबंधित नगरसेवक कुणाल पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, या तक्रारी नुसार पोलिसांनी या दोन मुलांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी विशाल पाटील आणि आकाश भोईर या दोघांनी आम्हाला मारहाण करत धमकी देत हे वदवून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी तत्त्काळ विशाल पाटील आणि आकाश भोईर या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी कुणाल पाटील यांनी सदर आरोपींसह हा व्हिडियो व्हायरल करत बदनामी करणारे भाजप पदाधिकार्‍यांसह, शिवसेना नगरसेवक व त्यांच्या साथीदाराविरोधात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support