Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 29, 2018

भिमा-कोरेगाव, मराठा आंदोलन गुन्ह्यांची होणार छाननी!

खटले मागे घेणार की नाही?

 मुंबई । प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव हिंसाचार निषेधाच्या वेळी तसेच मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाच्या वेळी झालेल्या हिंसाचारप्रकरणी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याच्या दृष्टीने छाननी करण्यासाठी राज्य सरकारने अप्पर पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली आहे.
राज्य शासनाच्या गृह विभागाने हा शासन निर्णय जारी केला. तीन सदस्यांची ही समिती असून आखून दिलेल्या काही निकषांवर ही समिती आंदोलकांवरील गुन्ह्यांची समीक्षा करून आपला अहवाल शासनाला सादर करेल. या समितीला निश्चित अशी मुदत देण्यात आलेली नाही.
साठी राज्य सरकारच्या गृह विभागाने अप्पर पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती काही अटींवर दोन्ही घटनांतील आंदोलकांवर खटले मागे घेण्याची शिफारस सरकारला करणार आहे.
पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथे 1 जानेवारी 2018 रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांच्या वाहनांची तोडफोड, दगडफेक व मारहाणीचे प्रकार घडले होते. या घटनेचा राज्यभर आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करण्यात आला होता. जुलै ऑगस्ट 2018 च्या काळात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन झाले होते. त्या दोन्ही आंदोलनात जबर हिंसाचार झाला होता. यानंतर अनेक आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची संबंधित संघटनांकडून करण्यात आली होती.
छाननी समितीच्या कार्यकक्षा
  •  घटनेत जिवितहानी झालेली नसावी. 
  •  खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेची 10 लाख रुपयांपेक्षा जास्त हानी झालेली नसावी.
  •  पोलिसांवर थेट हल्ले करणार्‍यांवरील खटले मागे घेता येणार नाहीत. यासाठी व्हिडीओ फूटेज समितीतर्फे तपासले जाईल.
  •  खटले मागे घेण्यासाठी गठित समिती राज्यातील सर्व पोलीस आयुक्त, सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून माहिती घेईल.
  •  सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेची 10 लाखांपर्यंत हानी झाली असल्यास समितीने स्वतःहून अशा प्रकरणांची तपासणी करावी. 
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support