Visit Us At MaharashtraDinman.in

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Tuesday, October 16, 2018

सुरक्षा यंत्रणा उभी न करताच डोंगराचे फोडकाम

  महामार्गालगत केले जाणारे काम वाहनचालकांकरीता धोक्याचे
महामार्गावर सुरू असलेल्या कामाबाबत ठेकेदार कंपनीचे सुरक्षा अधिकारी आहेत. त्यांच्याकडून काम करताना सुरक्षा यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. ज्याठिकाणी हे काम सुरू आहे त्या ठिकाणी पत्रे उभे करण्यात आले आहेत.

महाड ।  प्रतिनिधी

मुंबई गोवा महामार्गाचे काम पावसाने उसंत घेताच पुन्हा जोराने सुरू झाले आहे. महाडजवळ नडगाव गावाजवळ असलेला डोंगर फोडकाम आणि खोदकाम करताना कोणतीच सुरक्षा यंत्रणा उभी न केल्याने डोंगराजवळून ये जा करणार्‍या वाहनचालकांचा प्रवास धोक्याचा बनला आहे. महामार्ग विभाग आणि ठेकेदार कंपनीच देखील याकडे दुर्लक्ष आहे.
महाडजवळ नंडगाव गावाजवळ माती आणि दगडाचा डोंगर आहे. एकीकडे नदी आणि दुसरीकडे डोंगर असल्याने डोंगर भागाकडून खोदकाम करून महामार्ग चौपदरीकरणाचे काम केले जाणार आहे. याकरीता हा डोंगर फोडणे गरजेचे आहे. पावसाने उसंत घेताच या कामाला पुन्हा जोर धरला आहे. डोंगराच्या वरील बाजूने खोदकाम केले जात असून डोंगरावरील दगड फोडण्याचे काम देखील केले जात आहे. हे खोदकाम केले जात असताना खालच्या बाजूने जाणार्‍या वाहनांच्या सुरक्षेचा मात्र विचार केला गेलेला नाही. याठिकाणी असलेल्या खराब रस्त्यामुळे वाहनांचा वेग देखील कमी असतो. यामुळे वरील बाजूने एखादा दगड वेगाने खाली आल्यास वाहनचालकांकरीता धोक्याचा बनू शकतो.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात या भागातील काम हे एल अ‍ॅन्ड टी कंपनीने घेतले आहे. या कंपनीच्या कामाबाबत आणि सुरक्षेबाबत कायम स्तुती होत असली तरी याठिकाणी होणारे काम हे वाहनचालकांसाठी असुरक्षित आहे. महाड औद्योगिक परिसर नडगाव गावाच्या हद्दीतूनच सुरू होत असल्याने महामार्गाच्या या टप्यात कंपनी कामगार दुचाकीने प्रवास करणारी संख्या अधिक आहे. तर महाडकडे येणारा विद्यार्थी वर्ग देखील आहे. यामुळे नडगावमध्ये डोंगर खोदकाम करताना संरक्षक यंत्रणा असणे गरजेेचे आहे. याठिकाणी लावण्यात आलेले पत्रे हे वरून येणारे दगड थांबवण्यास अकार्यक्षम आहेत. यामुळे वरील भागातून आलेला दगड हा थेट महामार्गावर येण्याची शक्यता आहे.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support