This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Wednesday, October 10, 2018

नवरात्रोत्सवात कमळाऐवजी वॉटर लिली फुलांची विक्री

धार्मिक कार्यासाठी कमळाचे अनन्य साधारण महत्व आहे. नवरात्रीच्या दिवसात कमळ पुष्पला मोठी मागणी आहे. सध्या कमळ पुष्प हे 10 रुपयांना विकले जात असून नवरात्रीमध्ये हे फुल 15 ते 20 रुपयांना विकले जाते. मुबई ठाण्यात नवीमुंबई आणि गुजरात राज्यातून ही फुले विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर येतात.

 ठाण्यात फुले विक्रेत्यांची बनवाबनवी
 ठाणे । प्रतिनिधी
शारदीय नवरात्रौ उत्सवाची धूम आजपासून सुरू होत आहे. कमळ हे फुल देवीचे आवडते फुल आहे. ठाण्यातही अशी फुले विक्रीला आली आहेत. पण ग्राहकांनी सावधान राहायला हवे, कारण कमळांच्या नावे फुल विक्रेत्यांकडून  वॉटर लिली (निंफिया) फुलांची सर्रासपणे विक्री होत आहे. त्यामुळे हुबेहूब कमळासारखी दिसणारी फुले विकून फसवणूक करून ग्राहकांच्या भक्तीशी खेळण्याचा प्रकार काही फुल विक्रेत्यांकडून होऊ शकतो.
ललीचे फुल हुबेहुब कमळासारखेच असते, नवरात्राच्या काळात महालक्ष्मी, दुर्गा आदी देवींच्या देवळात कमळ विक्रेत्यांची मोठी संख्या असून कमळा ऐवजीलिलीचे फुले त्यांच्याकडे विक्रिसाठी असतात. परंतु कमळाचे फुल हे लिली फुलापेक्षा  मोठे असून मध्यभागी पिवळ्या रंगाचा (टोरस) फुगीर भाग, लालसर नारंगी रंगाचा देठावरुन कमळाचे फुल पटकन ओळखता येते, तर लिलीचा देठ हा हिरव्या रंगाचा असतो.
लिली आणि कमळ या दोन्ही वनस्पती पानथळ चिखलात वाढणा-या वनसप्ती आहेत. लिलीची पानं पाण्याच्या पृष्ठ भागाला चिकटलेली असतात, तर कमळाची पान पाण्याच्या वरच्या बाजुने पसरुन त्यांचा देठ दिसतो. लिली फुला पेक्षा कमळपुष्पाच्या पाकळ्या आकाराने मोठ्या असतात मध्यभागी पिवळसर (टोरस) असतो. कमळाचे सर्वाधिक परागसिंचन हे भुंग्याच्या माध्यमातून होत असल्याची असल्याचे वनस्पतीतज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांचे म्हणणे आहे.
उष्ण भागातील गोड्या उथळ पाण्यात लाल कमळांची वाढ मोठी होते, लाल कमळाची पाने गुळगुळीत देठाची असून खाली लवदार असते. लाल रंगाची फुले ही सप्टेंबर आक्टोबर महिन्यात उमलतात. उपल्या कमळाची पाने वर्तुळाकार असून, पानाच्या खालच्या बाजूला ठिपके असतात. या जातीतील फुंलं जांभळी, फिकट निळी, पांढरी, गुलाबी रंगाची असून मंद सुगंधाची असून लिली अनेक रंगात उपलब्ध असते.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support