This is testing Header

Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Buy Maharashtra Dinman Diwali Ank 2018

Monday, October 15, 2018

निवडणुकांची नांदी नेत्यांना लागले ‘प्रवेशा’चे वेध!


भारतीय जनता पार्टीचे नागपूर जिल्ह्यातले काटोलचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी नुकताच पक्षाचा राजीनामा दिला. त्याआधी त्यांनी पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सोपवला होता. त्याआधी त्यांनी पत्र पाठवून आपला राजीनामा दिला होता. ज्या दिवशी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला त्याचदिवशी म. गांधीजयंती होती आणि हेच औचित्य साधत काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधी, माजी अध्यक्षा व संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षा सोनिया गांधी महाराष्ट्रातल्या वर्ध्यात होत्या. डॉ. आशिष देशमुख यांच्या मते त्यांनी गांधीजयंतीच्या पावन दिवशी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपाच्या आमदारकीच्या जोखडातून ते मुक्त झाले. त्याचदिवशी देशमुख वर्ध्याला राहुल गांधींच्या जाहीर सभेच्या व्यासपीठावर पोहोचले. तेथे त्यांनी राहुल गांधी यांच्याशी दीर्घ चर्चा केली. परंतु त्यांच्या उपस्थितीत किंवा त्यानंतर अजूनही काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची घोषणा केलेली नाही.
तसे पाहिले तर आशिष देशमुख हे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांचे पुतणे. काटोल मतदारसंघात त्यांचाच पराभव करून ते आमदार झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संस्कृतीत तयार झालेले डॉ. देशमुख 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच भाजपात दाखल झाले होते. कौटुंबिक वाद आणि राजकीय महत्त्वाकांक्षा यांचा परिपाक काका-पुतण्यात निवडणूक झाली आणि पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत पुतण्याने काकांवर मात केली. गेल्या दीड-दोन वर्षांपासूनच त्यांनी भाजपा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीर टीका करण्यास सुरूवात केली होती. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले आणि मोदी लाटेत विजयी झालेले भंडारा-गोंदियातले खासदार नाना पटोले यांच्याप्रमाणे. कालांतराने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला व पुढे काँग्रेसमध्ये दाखल झाले. देशमुख यांची पावलेही त्याच दिशेने पडत आहेत. पण, प्रश्न आहे तो त्यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीचा. काँग्रेसमध्ये दाखल झाले तर त्यांच्या विधानसभेच्या तिकीटाचा प्रश्न येऊ शकतो. मागच्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी झाली नाही तर राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख आणि काँग्रेसकडून त्यांचे पुतणे आशिष देशमुख परस्परांविरूद्ध लढू शकतात. पण आघाडी झाली तर दोन्ही पक्षांसाठी हा मतदारसंघ काही काळ तरी प्रतिष्ठेचा राहील.
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये हीच परिस्थिती आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत तेथे काँग्रेसचे माजी मंत्री व इंदापूरचे आमदार हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे दत्तामामा बरणे यांच्यात सरळ लढत झाली. भाजपातर्फे बाबासाहेब चवरेही या निवडणूक रिंगणात होते. पण, त्यांची उपस्थिती नाममात्र राहिली. या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील पराभूत झाले. आता पुढच्या निवडणुकीत काँग्रेस त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असतील. त्याचवेळी राष्ट्रवादी विद्यमान आमदार दत्ता बरणे यांच्या जागेसाठी हट्ट धरेल. अशावेळी दोन्ही बक्षात आघाडी होताना काटोल आणि इंदापूरच्या जागेसाठी अदलाबदल होऊ शकेल. मात्र, सध्यातरी आशिष देशमुख यांनी आपण लोकसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे सांगितले आहे. आपल्याला राज्याच्या राजकारणापेक्षा देशाच्या पातळीवर काम करण्यात स्वारस्य असल्याचे म्हटले आहे. भाजपाचा राजीनामा देताना त्यांनी भाजपा सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विदर्भ, मराठवाडा व राज्याच्या इतर भागातील 15-16 जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती असून शेतकर्‍यांची अवस्था बिकट आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा त्या-त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी कोणतीही बैठक घेऊन उपाययोजना आखल्या नाहीत. त्यामुळे शेतकर्‍यांनी जायचे कुठे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोंडअळी, हरभरा, तूर इत्यादी पिकांची नुकसानभरपाई सरकारने अजूनपर्यंत शेतकर्‍यांना दिली नाही. स्वामिनाथन आयोग लागू झाला नाही. मेक इन इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र, स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया, अशा अनेक योजनांचे फलित कुठेही दिसत नाही. विदर्भातील एकाही एमआयडीसीमध्ये एकसुद्धा नवीन उद्योग आला नाही. मिहानमध्येही नवीन गुंतवणूक नाही. त्यामुळे रोजगाराची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जीएसटी व नोटबंदीमुळे व्यापार्‍यांचे नुकसान होऊन हजारो युवकांचा हातचा रोजगार गेला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भरमसाठ दरवाढीमुळे महागाई जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे. राफेलसारखा मोठा भ्रष्टाचारपण झाला आहे. दलित व अल्पसंख्यांकांमध्ये अस्थिरतेची भावना निर्माण झाली आहे. शिक्षणात मराठा, धनगर व मुस्लीम समाजासाठी पाच टक्के आरक्षण लागू न केल्यामुळे त्यांच्यात भेदभाव होत असल्याची भावना निर्माण झाली आहे. समाजातील सर्व घटकांचे विविध प्रश्न मी सातत्याने सरकारसमोर मांडले. परंतु सरकारने काहीच पावले उचलली नाहीत. त्यामुळे जनता नाराज आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार असूनसुद्धा जनतेसाठी मी काहीच करू शकत नसेन तर आमदारकीचा राजीनामा देणे मी उचित समजतो. महात्मा गांधींच्या विचारसरणीवर व मार्गावर चालण्याची माझी तयारी आहे. जनतेचा भाजपावरचा विश्वास उडाला असून त्याचे परिमाण येत्या निवडणुकीत भाजपाला भोगावे लागतील, असे आशिष देशमुख म्हणाले. तेथेच त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची नांदी झाली. पण, पुढच्या राजकीय भवितव्याची खात्री मिळत नसल्याने त्यांनीही याबाबत सावध भूमिका घेतली असावी.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सातार्‍याचे खासदार उदयनराजे भोसले यांचेही तसेच आहे. खासदारकीची मुदत संपत आली पण आजही ते पक्षाध्यक्ष शरद पवार यांना जुमानत नाहीत. छत्रपती  शिवरायांचे वंशज आणि सातारकर जनतेचे प्रचंड समर्थन लाभलेले उदयनराजे यांनी अलीकडेच झालेल्या गणेशोत्सवात डीजेविरोधातील न्यायालयाच्या आदेशालाही जनतेच्या अदालतेत आव्हान दिले होते. डीजोला कोणी रोखू शकत नाही. आपणच वाजवणार आहोत. कोणात हिम्मत असेल तर रोखा असे राजेशाही थाटातले आव्हान त्यांनी दिले होते. मात्र, प्रत्यक्षात अनंत चतुर्दशीच्या श्री गणेश मूर्तींच्या मिरवणुकीत राजे डीजेच्या भानगडीतच पडले नाहीत. सार्वजनिक ठिकाणी बोलणे आणि प्रत्यक्षात वागणे यातले राजकीय चातुर्य त्यांनीही दाखवले.
पुढच्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक नुकतीच झाली. यात संभाव्य उमेदवारांच्या नावांची चाचपणी झाली. काँगसबरोबरची आघाडी लक्षात घेऊन राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 25 मतदारसंघांचा आढावा यावेळी घेण्यात आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यावेळी उपस्थित होते. सातार्‍याचा विषय
चर्चेला आला तेव्हा उदयनराजे गैरहजर होते. पक्षाचे नवे कार्यलयच शोधण्यात त्यांचा वेळ गेला, असे ते म्हणतात. याचाच अर्थ त्यांना पक्ष आणि पक्षाचे मुख्यालय याच्याशी काडीचाही संबंध नव्हता. त्यांच्या अनुपस्थित या बैठकीत उदयनराजे यांना सातार्‍यातून लोकसभेची उमेदवारी देण्यास टोकाचा विरोध झाला. कोणालाही उमेदवारी द्या पण, उदयनराजेंना नको, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. राजे तेथे हजर असते तर यापैकी किती जणांनी तोंड उघडले असते, अशी चर्चा सातारकर करत आहेत. उदयनराजे यांच्याऐवजी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी द्यावी, असा आग्रह झाला. या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तव जात नाही. राजघराणातल्या या नेत्यांच्या भाऊबंदकीने सातारकर हैराण आहेत. उदयनराजेंनी त्यानंतर थेट शरद पवार यांनाच अप्रत्यक्ष आव्हान दिले. शरद पवार यांचे जसे सर्व पक्षांमध्ये मित्र आहेत तसेच आपलेही आहेत, असे सांगून त्यांनी आपल्याला उमेदवारी नाकारल्यास आपल्याला अन्य कोणत्याही पक्षाची उमेदवारी मिळेल, हे त्यांनी सुचविले. इतकेच नव्हे तर जोपर्यंत आपल्याला जनतेचे समर्थन आहे तोपर्यंत आपण निवडणूक लढवणार आणि ज्यांना जिंकण्याची खात्री आहे त्यांनी फक्त मताधिक्याचा आकडा सांगावा, आपण त्यांचा प्रचार करू असे सांगत रामराजे किंवा शिवेंद्रराजे यांना अप्रत्यक्षपणे हिणवले.
यापाठोपाठ त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची व त्यांच्या काही सहकार्‍यांची मंत्रालयात भेट घेऊन पुढच्या राजकीय खेळीचीही चाचपणी केली. नजीकच्या काळात सातार्‍याचेही चित्र स्पष्ट होईल  यात शंका नाही.
Share:

0 comments:

Post a Comment

Blog Archive

This is default featured slide 1 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 2 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 3 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 4 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

This is default featured slide 5 title

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.This theme is Bloggerized by Lasantha Bandara - Premiumbloggertemplates.com.

Definition List

Unordered List

Support